कै. सिंधुताई सपकाळ धाडसी आणि खंबीर व्यक्तिमत्व.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याआणि जवळ जवळ १५०० अनाथ मुलांची लाडकी माई म्हणजेच सिंधुताई  सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई ना प्रेमाने लोक  ‘माई’ अशी हाक मारत. वयाच्या विसाव्या वर्षी जेव्हा त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. तेव्हा त्यांना घरच्यांनी घराबाहेर काढले. मार देऊन मरणासन्न अवस्थेत गोठ्यात सोडून देण्यात आले. त्यांची मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जन्माला आली. त्यांनी तिची नाळ तोडली आणि मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराबाहेर पडल्यानंतर जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. सिंधुताईंनी त्यावेळेस जगण्यासाठी अक्षरशः रेल्वेस्टेशन वर भजने गाऊन पैसे गोळा केले. 

   

त्यांच्याकडे उपजत असलेल्या वक्तृत्व गुणांनी त्या लोकांना आकृष्ट करायच्या. त्या  त्यांच्या आयुष्यातील किस्से रंगवून सांगत. कधी स्वतः सहन केलेल्या हालअपेष्टा सांगून लोकांच्या डोळ्यातून पाणी आणत तर कधी मजेदार प्रसंग सांगून हशा पिकवत. माईंचा वक्तृत्व गुण वाखाणण्या जोगा होता सिंधुताई आपल्या अनोख्या शैलीत आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायच्या कधी गाणं गात तर कधी मजामस्ती हास्यविनोद करत. त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग त्यांनी जेवढ्या गंभीर पणे पेलले आता इतक्या वर्षानंतर तेवढ्याच मिश्किल पणे समोरच्याला त्या प्रसंगाचे गांभीर्य जाणवू न देता त्या सांगत असत. माई बोलताना नेहमी संत तुकाराम, नामदेव, बहिणाबाई, तुकडोजी महाराज यांच्या अभंगांचा ओव्यांचा उल्लेख करत. तर कवी सुरेश भटांच्या गजलांचा वापर करताना सहज हिंदी मराठी भाषा वापरत. त्या सुरेश भटांची एक गजल नेहमी म्हणायच्या.

‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’

त्यांनी अनेक ठिकाणी देश विदेशात जाहीर कार्यक्रम केले त्यात त्यांची वक्तुत्व शैली ठळकपणे जाणवत असे. अशा कार्यक्रमातून संस्थेसाठी त्या लोकांना मदतीचे आवाहन करीत लोकही उत्स्फुर्तपणे त्यांना मदत करत. त्यांच्या कार्यक्रमातून स्वतःच्या आयुष्याविषयी सांगताना त्या नेहमी म्हणत. ‘‘तुमच्यासोबत कोणीही नसताना किती एकाकी वाटतं ते मी अनुभवलंय कुठे जाण्यासाठी जागा नाही, घर नाही. ३-४ दिवस खायला अन्न नाही. मला माझ्या या छोट्याश्या कामातून जो आनंद मिळतो तो बघून असं वाटतं की कोणीतरी माझ्या जखमांवर हळुवार फुंकर घालून त्या बऱ्या करत आहे. सगळ्या जखमा काळानुरूप भरून निघतात. पण तुम्ही खमकं असलं पाहिजे. आणि इतरांसाठी जगलं पाहिजे’’.

 

माई म्हणत  ‘‘माझ्यावर असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा मी तसं करायचे तेव्हा कोणत्यातरी अलौकिक शक्तीने मला वाचवलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी वाचत गेले तेव्हा मी ठरवलं की रस्त्यावर भुकेने तडफडणाऱ्या गरीब लोकांसाठी जगायचं.’’ माई म्हणायच्या ‘‘मी आजही गरीब आहे. एवढे सत्कार समारंभ होतात तरीही मी गरीब आहे. पोटातली भूक ही माणसापेक्षा किंवा माणुसकीपेक्षा मोठी आहे. मुळात माणूस वाईट नसतो. पोटातली भूक त्याला वाईट काम करायला भाग पाडते. माझ्याकडे अशी अनेक तान्ही मुलं आहेत ज्यांना रोज खायला लागतं. म्हणून यासारख्या समारंभातून जो काही पैसा येईल किंवा तुमच्यासारखी मोठी माणसं जी काही देणगी देतात ती मी माझ्या मुलांवर खर्च करते. आता मी त्यांची आई झाले आहे. आता तुम्ही या आणि त्यांचे नातेवाईक व्हा त्यांना दत्तक घ्या.’’ 

 

अशाच एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आईबद्दलची आठवण सांगितली होती. त्या म्हणाल्या ‘मी अनाथाश्रम सुरु केला याचा मला अजिबात खेद नाही. उलट बरेच वेळेला मी माझ्या आईला म्हणाले की ये बाई माझ्याबरोबर येऊन राहा. कारण तिला तिथे बघायला कोणी नाही. पण ती माझं ऐकत नाही म्हणते जेव्हा माझ्या आधाराची तुला सर्वात जास्त गरज होती. तेव्हा मी तुला घराबाहेर काढलं. आणि आता मीच तुझ्याकडे राहायला कशी येऊ? मला वाटतं जर आईने मला घराबाहेर काढलं नसतं तर इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला नसता. पण यामुळे माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. रितेपण आलं आहे. या हजारो मुलांचा सांभाळ करून ती पोकळी, ते रितेपण मी भरून काढायचा प्रयत्न करते आहे.’’ 

माई नेहमी म्हणत काळाबरोबर सर्व जखमा भरून निघतात त्या कशा हे सांगताना त्या एकदा म्हणाल्या होत्या ‘एक दिवस अचानक माझा नवरा त्याच्या वयाच्या ८० व्या वर्षी माझ्याकडे आला. त्याला पश्चाताप झाला होता. पण मी त्यांना सांगितले की आता मी त्यांना फक्त एक मूल म्हणूनच स्वीकारू शकते. नवरा म्हणून नाही. कारण एक स्त्री ही थोड्यावेळासाठी पत्नी असते. पण ती अनंत काळाची माता असते. आता इतक्या वर्षानंतर मी माझ्या इतर मुलांना सांगते की आश्रमातल्या या सर्वात मोठ्या मुलाचे आभार माना यांच्यामुळेच आज तुम्हाला तुमची माई मिळाली आहे.

स्वतःची मुलगी तुम्ही अनाथाश्रमात का दिली असं कोणीतरी माई ना विचारलं तर त्या म्हणाल्या मी जर असे केले नसते तर तो बाकीच्या अनाथ मुलांवर अन्याय झाला असता. माईंचं तत्व होतं की सर्वांना समान वागणूक मिळायला हवी मग ती स्वतःची मुलगी असो वा अनाथाश्रमातील इतर मुलं. माईंनी अनेक अनाथाश्रम सुरु करून १००० हुन अधिक मुलांना हक्काचे घर दिले. निराधार असंख्य स्त्रियांना आश्रय दिला.

माईंच्या वैयक्तिक आयुष्यात जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच अडचणी अनाथाश्रम सुरु करतानाही  आल्या. उदा जून २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने सिंधुताईंच्या सन्मती बालनिकेतन मधील मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आणि मुलांना सरकारी अनाथाश्रमात घेऊन जावे म्हणून सिंधुताईंवर दबाव आणला होता कारण सन्मती बाल निकेतनची WCD मध्ये नोंदणी झाली नव्हती.

 

सुचेता दलाल यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन याचिकेनंतर (ज्या मनी लाईफ फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत) त्यांनी त्यांच्या लेखांमधून माईना न्याय मिळवून देण्यासाठी सन्मती बालनिकेतनच्या मुद्द्याला वाचा फोडली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईंच्या अनाथाश्रमाला विशेष दर्जा दिला. मनी लाईफच्या याचिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून सांगणात आले की, देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माईंच्या अनाथाश्रमाला विशेष दर्जा देण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. माईंचे अनेक दशकांपासूनचे काम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

माईंनी ज्या मुलामुलींचा सांभाळ केला ती मुलेमुली आजही त्यांचे मधले आणि शेवटचे नाव अभिमानाने लावतात. मुले सपकाळ म्हणून नाव सांगतात. तर मुली साठे (सिंधुताईंचे माहेरचे नाव) नाव लावतात. आज माईंच्या मोठ्या कुटुंबात त्यांचे ३८० हुन अधिक जावई, ५० हुन अधिक सुना तर १००० हुन अधिक नातवंडे आहेत. त्यातील बरेच जण (अगदी त्यांची स्वतःची मुलगी सुद्धा ) शिकून डॉक्टर, वकील झाले आहेत. त्यांची स्वतःची मुलगी आता बरेचसे अनाथाश्रम चालवते.

माईंचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे ते म्हणतात ‘डॉ सिंधुताई सपकाळ त्यांच्या समाजसेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गरीब, अनाथ मुलांना चांगली जीवनशैली अनुभवता आली. त्यांनी समाजातील मागासवर्गीय लोकांसाठी सुद्धा भरपूर काम केले. त्यांच्या निधनामुळे खूपच दुःख झाले. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’

श्री. अनंत महादेवन ज्यांनी माईंच्या जीवनावरील चरित्रपट दिग्दर्शित केला. आपल्या सिंधुताईबद्दलच्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात ‘सिंधुताई या परिसा सारख्या ज्यांच्या केवळ स्पर्शामुळे अनेकांची आयुष्य बदलली. किंवा आपण असे म्हणू की माईंनी ती घडवली. ‘मी सिंधुताई सपकाळ ’ हा चित्रपट ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. सिंधुताईंची प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी २०१६ मध्ये जागतिक महिलादिनाच्या दिवशी  घेतलेली मुलाखत नक्की पहा. हा कार्यक्रम मनीलाईफ फाउंडेशन ने आयोजित केला होता.

 

त्यांच्या आयुष्यात अनेक कडू, गोड वाईट प्रसंग आले. त्याचप्रमाणे त्या करत असलेल्या कामातही असंख्य अडचणी आल्या. उदा जून २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने सिंधुताईंच्या सन्मती बालनिकेतन मधील मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आणि मुलांना सरकारी अनाथाश्रमात घेऊन जावे म्हणून सिंधुताईंवर दबाव आणला होता कारण सन्मती बाल निकेतनची WCD मध्ये नोंदणी झाली नव्हती. सुचेता दलाल यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन  याचिकेनंतर (ज्या मनी लाईफ फाउंडेशन च्या ट्रस्टी आहेत) त्यांनी त्यांच्या लेखांमधून माई ना न्याय मिळवून देण्यासाठी सन्मती बालनिकेतनच्या मुद्द्याला वाचा फोडली. त्यानंतर लागेचच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईंच्या अनाथाश्रमाला विशेष दर्जा दिला.

मनी लाईफ च्या याचिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस कडून सांगणात आले की देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माईंच्या  अनाथाश्रमाला विशेष दर्जा देण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. माईंचे अनेक दशकांपासूनचे काम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांनी जलदगतीने निर्णय घेतले. मनी लाईफ इम्पॅक्ट मुख्यमंत्र्यानी माईंच्या अनाथाश्रमाला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले. माईंच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ही की त्यांनी अनेक अनाथाश्रम बांधले. १०००हुन अधिक मुलांना हक्काचे घर दिले. निराधार असंख्य स्त्रियांना आश्रय दिला.माई म्हणायच्या आई कधीच हरत नाही. एका स्त्रीला कोणीही हरवू शकत नाही. पण तिने मनाने खंबीर राहायला हवं आणि माफ करायला शिकायला हवं. 

माईंचा वक्तृत्व गुण वाखाणण्या जोगा होता सिंधुताई आपल्या अनोख्या शैलीत आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायच्या कधी गाणं गात तर कधी मजामस्ती हास्यविनोद करत. त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग त्यांनी जेवढ्या गंभीर पणे पेलले आता इतक्या वर्षानंतर तेवढ्याच मिश्किल पणे समोरच्याला त्या प्रसंगाचे गांभीर्य जाणवू न देता त्या सांगत असत. माई बोलताना नेहमी संत तुकाराम, नामदेव, बहिणाबाई, तुकडोजी महाराज यांच्या अभंगांचा ओव्यांचा उल्लेख करत. तर कवी सुरेश भटांच्या गजलांचा वापर करताना सहज हिंदी मराठी भाषा वापरत. त्या सुरेश भटांची एक गजल नेहमी म्हणायच्या.

‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, 

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’

Related posts

Leave a Comment