भारतातील मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत : ठडडच्या समविचारी पक्षाने केली मतांची मागणी.

मुस्लिम राष्ट्रीय मंच (चठच) या पक्षाने मुस्लिम बांधवांवरील अत्याचार आणि एकूणच दंगलीच्या घटना भाजपच्या कार्यकाळात कमी झाल्याचे मान्य केले आहे. १५ जानेवारी २०२२. रा. स्व संघाचे प्रमुख मोहन भागवतजी फोटो : झढख रा. स्व संघाच्या मुस्लिम बांधवांसाठी असलेल्या पक्षाने शुक्रवारी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपलाच निवडून द्या असे आव्हान केले आहे. कारण मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या म्हणण्यानुसार मुस्लिम बांधव भाजपच्या कार्यकाळात सर्वात सुरक्षित आणि आनंदी आहेत.
तर दुसरी कडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी यांनी मुस्लिम बांधवाना फक्त एक मोठा मत देणारा मतदारसंघ (वोट बँक) इथपर्यंत मर्यादित ठेवले आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच (चठच) ने मुस्लिम बांधवांसाठी भाजप ने (केंद्र आणि राज्य) सरकारने मिळून राबवलेल्या चांगल्या योजनांची माहिती दिली. आणि त्याच बरोबर भाजप हीच मुस्लिम बांधवांची सर्वात मोठी हितचिंतक असल्याचे मान्य केले आहे.

काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी यांनी सत्तेत आल्यावर मुस्लिम बांधवांसाठी कोणतीही चांगली कामे केलेली नाहीत. उलट गरिबी, ट्रिपल तलाक सारखा निर्णय, निरक्षरतेत वाढ असेकाही वाईट निर्णय घेतले आहेत. असा आरोप मुस्लिम राष्ट्रीय मंच (चठच) ने केला.
मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM)चे संस्थापक इंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चठचचे निवेदनपत्र प्रसिद्ध करण्यात आले तसेच ज्या ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे ते वाटण्यातही आले. हे पत्रक उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या राज्यात जिथे भाजप निवडणूक लढवते आहे तिथे वाटले जाईल.
मोदींच्या कार्यकाळात सरकारने मुस्लिम बांधवांसाठी ’नयी रोशनी, नया सवेरा’, नई उडान, सीखो और कमाओ, उस्ताद आणि नयी मंझिल यासारख्या ३६ हुन अधिक योजना सुरु केल्या. मुस्लिम बांधवाना प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांचा लाभ मोदींच्या कार्यकाळात घेता आला.

जर भाजपचे सरकार सत्तेत आले तर मुस्लिम बांधवाना देशाच्या बाहेर हकलले जाईल असा आरोप बहुजन समाजवादी पार्टी, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनी नेहमीच केला. पण किती मुस्लिम बांधव भाजपच्या कार्यकाळात देशाबाहेर गेले आहेत ? चठच ने विचारले.
काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी यांनी मुस्लिम बांधवाना फक्त एक मोठा मत देणारा मतदारसंघ (वोट बँक) इथपर्यंत मर्यादित ठेवले आहे. त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही.
२०१४ पासून मुस्लिम समाजातील दंगली आणि इतर अत्याचार कमी झाल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचने मान्य केले आहे. भाजप हाच मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा हितचिंतक पक्ष आहे. तेव्हा या निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजनसमाजवादी पक्ष यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून त्यांना मत देऊ नका. मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत. आणि यापुढेही तसेच राहतील. योग्य त्या पक्षाला मत द्या.
