२९ % भारतीय कमी प्रतीचे खाद्यतेल वापरतात कारण किमती वाढल्या आहेत.

गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सगळ्यांनाच अडचणीचं होत आहे. सूर्यफुलाचे तेल, खोबरेल तेल या सगळ्यांच्या किमती कोविड काळात वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे सुद्धा खाद्य तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. एका सर्वेक्षणानुसार देवास, मध्यप्रदेश, येथे सोयाबीनच्या बियांचा साठा बाजारात विक्रीला न आल्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

इतक्या की लोक तेल घेण्यासाठी त्यांची सर्व कमाई खर्च करत आहेत. आता ७६ % लोकांनी तेल घेणे बंद केले असून २९ % लोक कमी प्रतीचे तेल वापरतात कारण ते स्वस्त असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि राजस्थान मधेही तेलाचा साठा आढळून आला. तज्ज्ञांच्या मते खाद्यतेलाच्या किमती वर्षभरात ५०% ते १०० % नी वाढल्या आहेत. सूर्यफुलाचे तेल जे सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात येते ते १८० ते २५० रुपये किमतीने वाढले आहे.फेब्रुवारी २०१९ मध्ये ते ९८ रुपये लिटर होते.  

 

RBI गव्हर्नरने रशिया युक्रेन युद्ध आणि कोविद १९ च्या पार्श्व् भूमीवर खाद्यतेलाच्या किमती आणखी काही महिने चढ्याच राहणार असल्याचे एका बैठकीत सांगितले. सरकारने खाद्यतेलाच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्या साठी विविध उपाययोजना आमलात आणल्या आहेत. उदा. घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांनी आपल्याकडे असलेल्या तेलाच्या साठ्याची योग्य ती माहिती द्यायला हवी लपवून ठेऊ नये. जेणेकरून मागणी आणि पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवता येईल. जो या आदेशांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

खाद्यतेलाच्या बाबतीत बोलायचे झाले तर पुरवठा कमी आणि मागणी जास्त असा प्रकार आहे. खाद्यतेलाच्या जास्त किमती असल्यामुळे प्रत्येकालाच ते घेणे परवडणारे आहे असे नाही. मग काहीतरी पर्याय शोधायला हवाच. म्हणून मग लोक कमी प्रतीच्या खाद्यतेलाची निवड करत आहेत. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हे विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखंच आहे. अगदीच उत्तम प्रतीचे खाद्यतेल विकत जरी घ्यायचे झाले तरी मघाशी सांगितल्याप्रमाणे लोकांचा पूर्ण पगार तेल विकत घेण्यातच जात आहे. मग बाकीच्या घरखर्चासाठी पैसे कुठून आणणार?  अशी सगळी परिस्थिती आहे. खाद्यतेलाच्या किमती लवकरच कमी होतील अशी आशा करूया.

Related posts

Leave a Comment