बजाज कंपनीच्या विजेवर चालणाऱ्या रिक्षा बाजारात आल्यावर बजाज कंपनी बाजी मारणार?

पेट्रोल, CNG नंतर आता जमाना आलाय तो इलेक्ट्रिक वेहिकल्सचा. मग त्यामध्ये ‘हमारा बजाज’ तरी कशी मागे राहील? पूर्वी साधारणतः ८०- ९० च्या दशकात प्रत्येक घरात एक तरी बजाजची स्कूटर सापडत असे. बजाजची स्कूटर आपल्याकडे असणं प्रतिष्ठितपणाचं मानलं जाई. म्हणजे आता जस रॉयल एन्फिल्डची बुलेट असल्यावर कसं भारी वाटतं तसं. आताही vespa वगैरे सारख्या बजाजच्या स्कूटर बाजारात आहेत. पण पल्सर आणि इतर मोटर सायकल्सच्या दुनियेत आता त्या कमी दिसतात. लवकरच त्या विंटेज वेहिकल म्हणून दिसायला लागल्या तर नवल वाटायला नको.

इलेक्ट्रिक वेहिकल मार्केट मध्ये अजून तरी कोणत्याही कंपनीचा १०% पेक्षा जास्त वाटा नाही. अशा परिस्थितीत बजाज ऑटो या मार्केट मध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल का?

कंपनी जून महिन्यापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षा (विजेवर चालणाऱ्या) बाजारात आणायच्या विचारात आहे. थ्री व्हीलर मार्केटमध्ये बजाज कंपनीचा ६३ % शेअर आहे. त्याच्या जोरावर पुन्हा एकदा कंपनी यशाचा तोच जुना फॉर्मुला वापरून बघणार आहे. कंपनीला कोणीही प्रतिस्पर्धी नाही. त्यामुळे थ्री व्हीलर मार्केट मध्ये सुद्धा बजाज आपली तीच जुनी जादू चालवू शकेल का? हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. इलेक्ट्रिक वेहिकल्सची विक्री जोमाने वाढत आहे.

 

या विक्रीने फेब्रुवारी २०२२ मध्ये १९०५३ युनिट्सचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच एकूण इलेक्ट्रिक वेहिकल मार्केटच्या ४१% (ICE आणि इलेक्ट्रिक एकत्र). सर्वात मोठी विक्री झाली ती YC इलेक्ट्रिक वेहिकल्सची १८३६ युनिट्स आणि मार्केट शेअर १०%. महिंद्रा । महिंद्रा त्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर ७.१% शेअरसह आहे. सहा कंपन्यांचा बाजारातील शेअर ३३% पेक्षा कमी आहे तर बाकीची विक्री लहान मोठ्या प्रादेशिक विक्रेत्यात विभागली गेली आहे.

बजाज कंपनीने बॅटरी स्वॅपइंग (भरलेल्या बॅटरी सोबत रिकाम्या बॅटरीची अदलाबदल करणे ) करण्यापेक्षा इलेक्ट्रिक वेहिकलसाठी चार्जिंगची सोय देण्याचा विचार केला आहे. कारण बॅटरी स्वॅपइंग (अदलाबदल) करणे हे खर्चिक काम आहे. त्याचप्रमाणे कंपनीला मालवाहू, मोठ्या, अशा विविध प्रकारच्या गाड्या इलेक्ट्रिक वेहिकल या श्रेणीत आणायच्या आहेत. तीन चाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती वाढत आहे. मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी पर्यंत विक्रीत ५५% वाढ झाली. राज्यांतर्गत इलेक्ट्रिक वेहिकल्सच्या विक्रीत एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात ४०% ने वाढ झाली आहे.

I.C.E ३ व्हीलर्स या निर्यात केल्या जातात. त्याच वर्षात ४,६१,१९५ इलेक्ट्रिक वेहिकल्स निर्यात झाल्या. ज्या राज्यात झालेल्या विक्री पेक्षा जास्त होत्या. जर या दोन्ही संख्या विचारात घेतल्या तर (राज्यांतर्गत आणि निर्यात) एकूण विक्री २५% पर्यंत खाली गेलेली दिसते. तसे पाहायला गेले तर इलेकट्रीकवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनांची निर्यात अगदीच कमी आहे. पण हे चित्र जून महिन्यात बदलेल जेव्हा बजाज आटो त्यांची स्वतःची तीन चाकी इलेक्ट्रिक वेहिकल बाजारात आणेल. आधीपासूनच बजाज च्या तीनचाकी वेहिकल्स ची निर्यात केली जाते. आता या इलेक्ट्रिक वेहिकलच्या बाजारात येण्यामुळे त्यांची इलेक्ट्रिक ३ चाकीची विक्रीही वाढेल. बजाज कंपनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे. त्यांचं ब्रीदवाक्यच आहे ‘बुलंद भारत की बुलंद तसवीर हमारा बजाज’. आता हळू हळू इलेक्ट्रिक वेहिकल्स प्रसिद्ध होत आहेत. अशा टप्प्यावर कंपनीच्या इलेक्ट्रिक ३ चाकीमुळे कंपनीचं नाव आणखीनच मोठं होईल.

Related posts

Leave a Comment