हिंदू राष्ट्राचे द्रष्टे डॉ. हेडगेवार
… आणि रामदासी बाण्याप्रमाणे सर्व काही ‘परीक्षून सोडावे’ या दंडाकानुसार त्यांनी सर्व प्रचार-पद्ध-तींतून सुलभ पण परिणामकारक अशी पद्ध-ती शोधून काढली. श्रीसमर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथांतून संघटनेची जी मार्मिक धोरणे सांगून ठेवली आहेत, तशाच धोरणांनी डॉ. हेडगेवार यांनी काम केले. उदाहरणार्थ ‘ओळखीने ओळखी साधावी’, ‘महंते महंत करावे, युक्तिबुद्ध-ीने भरावे’, ‘राखावी बहुतांची अंतरे’, इत्यादी वचनांतून प्रकट झालेली धोरणे नि रा.स्व. संघाच्या प्रसाराची पद्ध-ती ही बहुतांशी एकच होती असे दिसून येईल (प्रस्तुत लेख ‘केशव बळीराम हेडगेवार’, संकलन गोपाळ गोंिवद अधिकारी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. संपा).
– ग. वि. केतकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक नि मुख्य चालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनामुळे ंिहदू राष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातच दु:खोद्गार निघाले. त्या दु:खोद्गारांबरोबरच, त्यांनी १९२५ सालापासून सतत पंधरा वर्षे एकमेव निष्ठेने उभारलेल्या व वाढवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थेविषयी धन्योद्गारही सर्वत्र मिसळलेले होते. त्याचप्रमाणे डॉ. हेडगेवार यांनी ज्या संघटनेकरता इतके परिश्रम केले ती संघटना वाढवून डॉ. हेडगेवारांची अतृप्त आकांक्षा पुरी करण्याचे दायित्व सर्व ंिहदू समाजावर आहे, ही जाणीवही प्रकट झाली.
संघाच्या प्रसाराची पद्ध-ती
संघटना करू इच्छिणाऱ्याने डॉ. हेडगेवार यांच्या संघ प्रचाराच्या कार्यपद्ध-तीचा बारकाईने अभ्यास करावा. देशात वंगभंगापासून तो असहकारापर्यंत जी आंदोलने झाली त्यामध्ये डॉ. हेडगेवार यांनी भाग घेतला, आणि रामदासी बाण्याप्रमाणे सर्व काही ‘परिक्षून सोडावे’ या दंडकानुसार त्यांनी सर्व प्रचार-पद्ध-तींतून सुलभ पण परिणामकारक अशी पद्ध-ती शोधून काढली. श्री समर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथातून संघटनेची जी मार्मिक धोरणे सांगून ठेवली आहेत, तशाच धोरणांनी डॉ. हेडगेवार यांनी काम केले. उदाहरणार्थ ‘ओळखीने ओळखी साधावी’, ‘महंते करावे, युक्तिबुद्ध-ीने भरावे’, ‘राखावी बहुतांशी अंतरे’, इत्यादी वचनांतून प्रकट झालेली धोरणे नि रा. स्व. संघाच्या प्रसाराची पद्ध-ती ही बहुतांसी एकच होती असे दिसून येईल.
सभा, प्रसिद्ध-ी, घटना, समित्या, मंडळे इत्यादी ठरावीक पद्ध-तीमध्ये एक प्रकारचा कृत्रिमपणा उत्पन्न झालेला आपल्याला दिसून येतो. एखाद्या परिषदेमध्ये ंिकवा सभेमध्ये ठराव संमत झाला म्हणजे कित्येकांना हायसे वाटते. परंतु तो ठराव कृतीत आणण्याची पूर्वसिद्ध-ता नसली आणि पुढेही त्याचे दायित्व अंगावर घेऊन कार्य करणारा गट नसला तर ठराव म्हणजे कागदावर लिहिलेले शब्द, या पलीकडे त्याला महत्त्व नाही. ंिकबहुना ठराव मान्य होईपर्यंत निदान तो मान्य करून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक तरी त्या ठरावाविषयी उत्कट असतात. पण पुढे सर्वांचे काम म्हणजे कोणाचेच काम नव्हे, असे होते. म्हणून पुष्कळ वेळा उलट तार खेचून खडबडून सत्यस्वरूप दाखवण्याच्या हेतूने असे उद्गार काढावेसे वाटतात, की एखादा ठरावा पास झाला म्हणजे त्या विषयाचा अंत्यविधी झाला! कारण हा भ्रम असतो, की व्यक्ती सोडून सभा म्हणून काही वेगळी वस्तू आहे, नि सभेत एखादी गोष्ट मान्य झाली म्हणजे ती अमूर्त सभाच काहीतरी करू शकेल! असे भ्रमात्मक समाधान सध्या पुष्कळ लोकांत दिसून येते. मानसिक दृष्ट्या नवसास पावणाऱ्या म्हसोबावर विश्वास ठेवण्याइतपतच या भ्रमाची प्रत ठरवावी लागेल.
एखाद्या विषयाची समिती नेमली म्हणजे काही होईल, हा दुसरा एक भ्रम आहे. पण वर उल्लेखिलेल्या उलट बोलण्याच्या दृष्टीने पुष्कळदा असे म्हणावे लागते, की जागता प्रश्न निजवून ठेवण्याचा पाळणा म्हणजे समिती होय! मूल रडत असले ंिकवा दांडगाई करत असले म्हणजे त्याच्या अस्तित्वाची जाणीव सर्व घराला असते. पण ते एकदा का पाळण्यात निजवून ठेवले म्हणजे घरातील मंडळींच्या मनातून तो व्यग्र करणारा विषय बाजूला होतो. तसेच अनेक समित्यांचे होते. निरनिराळ्या वर्षानुवर्षे भरणाऱ्या परिषदांचे वृत्तान्त या दृष्टीने वाचून पाहिल्यास सार्वजनिक कार्यातील लोकभ्रमाचे स्वरूप स्पष्ट होईल.
डॉक्टर हेडगेवार यांची भेदक दृष्टी
मात्र व्यापारी जसा रूपये, आणे, पैच्या दृष्टीने अमुक एका विशिष्ट व्यवहारात आपला निश्चित लाभ किती, या एकाच लक्ष्यावर दृष्टी रोखून असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्य किती घडते याकडे लक्ष असेल तरच हे लोकभ्रमाचे भोपळे फुटतात. रा. स्व. संघाचा प्रसार करताना नि त्याची कार्यपद्ध-ती ठरवताना डॉ. हेडगेवार यांची अशी भेदक दृष्टी होती. लोकशाहीच्या व्यवहारात कित्येक राजकारणी गोष्टींचा ‘प्रसिद्ध-ी’ हाच मूलाधार असतो हे खरे, पण मूळ शरीराला जसा अलंकार तसेच या प्रसिद्ध-ीचे आनुषांगिक स्वरूप असावे लागते. पण कित्येक वेळा असे होते की, ‘नाकापेक्षा मोती जड’ अशा प्रकारे प्रसिद्ध-ीच केवळ विशेष उत्साहाने होते. पूर्वी हरिकीर्तनाच्या संबंधात गायन, अर्थदृष्टी, बुवांचा मानसन्मान, या गोष्टींपुढे मूळ हरिभक्ती ही विसरली गेली, तेव्हा एक प्रकारे प्रतिक्रियेचे दुसरे टोक खेचण्याच्या बुद्ध-ीने तुकारामबुवांनी ‘‘बुक्का लावू नये माळा, हार घालू नये गळा’’, ‘‘उभ्या बाजारांत कथा, हे तो नावडे पंढरीनाथा’’ इत्यादी उलट दंडक घालून दिले; तद्वतच रा. स्व. संघाची कार्यपद्ध-ती व्यर्थप्रसिद्ध-ी टाळून बनवण्यात आली. घटना कागदावर लिहिलेली नाही, भांडण्याच्या वेळीच जे बहुधा प्रथम वाचले जातात, असल्या छापील नियमांचे जंजाल नाही, निवडणूक, व्ययासाठी आगाऊ मान्यता, देणग्यांची पोच, अधिकाराची संघटना उभारावयाची होती त्यामध्ये हे सर्व घटनात्मक भारूड लोढण्याप्रमाणे अडथळा आणणारे ठरले असते. डॉ. हेडगेवार यांच्या प्रसिद्धि-विन्मुख आणि एकमुखी कार्यपद्ध-तीमुळे संघाच्या शाखा या नव्हत्या, जमिनीतून जसे न कळत पण चौफेर गवत उगवते, नि परवा परवा जे रुक्ष रान होते ते थोडक्या दिवसांत हिरवळीने आच्छादित होऊन जाते, इइक्या स्वाभाविकपणे त्यांनी संघाच्या शाखांचे जाळे क्रमाक्रमाने सर्व देशभर पसरवले.
हिंदू राष्ट्र हाच संघटनेचा पाया
हिंदू राष्ट्र की हिंदी राष्ट्र हा पाया धरावा, या संबंधी अद्यापही पर्यक-पंडितांचे वादाचे पवित्रे चालू आहेत. पण हिंदू महासभेमध्ये देखील ‘ हिंदू राष्ट्र’ या शब्दाचा अंतर्भाव उद्देशावलीत होम्याच्या पूर्वी कितीतरी वर्षे डॉ. हेडगेवार यांनी ‘हिंदू राष्ट्र’हाच आपल्या संघटनेचा पाया ठरवला. ंिहदित्वाच्या पायावर चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या नव्हत्या असे नाही. पण तो पाया भुसभुशीत आहे, हे हिंदू जनतेला साधारण समजू लागण्यापूर्वी कित्येक वर्षे त्या संबंधी डॉ. हेडगेवार यांनी निश्चय करून ठेवला होता. म्हणूनच त्यांना ‘ंिहदू राष्ट्राचे द्रष्टे’ ही पदवी यथार्थ ठरते. रा. स्व. संघाची संघटना चालू होऊन एक तप उलटून गेल्यावर पुण्यातील ंिहदू युवक परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी जे भाषण केले, तेच त्यांचे पहिले प्रकट सार्वजनिक भाषण होय. ‘आधी केले मग सांगितले’ या रामदासी उक्तीमध्येही डॉ. हेडगेवार यांच्या संबंधात एक शोध घातला पाहिजे तो असा, की ‘आधी सिद्ध- केले नि एका तपानंतर सांगितले’, काल केले नि आज सांगितले असे नव्हे. ंिहदू राष्ट्र जर स्वतंत्र अशते तर डॉ. हेडगेवार यांची योजकता, कार्यक्षम माणसे हेरण्याची जुळवून घेण्याची आणि एक विचाराने भरण्याची हातोटी, या गुणांमुळे डी व्हॅलेरा वा कमाल पाशा यांच्याप्रमाणे त्यांनी हिंदू राष्ट्र वैभवाला चढवले असते. सध्याच्या स्थितीत केवढे तरी परिश्रम करावे आणि कितीतरी अल्प फल दिसावे या विचाराने डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या कार्यकर्त्यास अंतरंगांत सारखी खंत लागून राहिली असली पाहिजे. विस्कळीत आणि फुटीर ंिहदू समाजाची आज सर्व दिशेने वाताहात होत आहे. ती वाचवावयाची असेल तर ंिहदू राष्ट्रीय ध्येयवादाला शपथबद्ध- असलेले, क्रॉमवेलच्या ‘लोह’ सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे स्थायी सैन्य असावयास पाहिजे.
पहिले सेनानायक
हिंदू राष्ट्राच्या सध्याच्या स्थितीत डॉ. हेडगेवार हे पहिले सेनानायक होत. ंिहदू राष्ट्र हे एकजीव होऊन पुन: पूर्व वैभवास पोचले तर ‘‘तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे’’ हे वचन डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला लागू पडेल. संघाच्या वतीने डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचे यथायोग्य दिग्दर्शन करणारे अधिकृत चरित्र प्रसिद्ध- होणार आहे असे समजते. ते पुढे येईपर्यंत सामान्य ंिहदू जनतेस विशेषत: ंिहदू तरुणांस डॉ. हेडगेवारांच्या कार्याची कल्पना येण्यासाठी हे संकलनामत्मक पुस्तक निघालेले आहे. वृत्तपत्राच्या विशेष अंकाप्रमाणेच याचीही गणना स्थायी साहित्यात करण्यापेक्षा शीघ्र साहित्यातच करावी लागेल. पण चवळवीच्या दृष्टीने जसा स्थायी तसा शीघ्र साहित्याचाही उपयोग आहे. आणि ते स्थान या पुस्तकाला मिळेल एवढी आशा करण्यास काही प्रत्यवाय नाही.
