सौंदर्य प्रसाधने तसेच लॉजिस्टिक्स आणि IT (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात वाढू लागल्या रोजगाराच्या संधी.

नवीन वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यातच रोजगार निर्मिती जोरात सुरु झाली असून कोविड पूर्वीच्या काळात १३.७% असलेले मुलाखतीचे प्रमाण या ३ महिन्यात ३० मिलियन पर्यंत गेले आहे. (माहिती Apana.com रोजगारासंबंधीची वेबसाईट). या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४२% रोजगार निर्मिती झाली आहे. मागच्या वर्षातील कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर इतर क्षेत्रांपेक्षा आरोग्य सेवा, इ-कॉमर्स, या क्षेत्रांना सुगीचे दिवस आले आहेत. २०२२च्या पहिल्या तिमाहीत सौंदर्य प्रसाधने, हॉटेल्स या क्षेत्रातही रोजगार निर्मिती होत आहे. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात ८०% तर हॉटेल्स आणि पर्यटन क्षेत्रात ३०% ने रोजगार निर्मिती होत आहे.  तर IT (माहिती तंत्रज्ञान) आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी हा खूप मोठा बदलाचा काळ आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था कोविडच्या संकटातून बाहेर पडून ‘बाळसे’ धरत आहे. आणि लवकरच आपला देश या महामारीतून बाहेर पडेल, अशी अपेक्षा आहे. मागील ३ महिन्यात आमच्या वेबसाईटचा वापर करणाऱ्या नवीन लोकांमध्ये १४१% ने वाढ झाली असून ४६% लोकांनी वेबसाईट वापरताना इंग्रजीपेक्षा प्रादेशिक भाषेला जास्त पसंती दिली आहे. मार्च मध्ये तर ही संख्या आणखी वाढली. उत्तर भारतात टेलीकॉलर्स, कॉप्युटर ऑपरेटर, सुरक्षा रक्षक यांना जास्त मागणी आहे. दक्षिण भारतात व्यवसाय विकास आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लोकांना संधी आहेत. पूर्व भारतात विक्री आणि माल घरपोच पोहोचवणे या क्षेत्राची चलती आहे. तर पश्चिम भारतात बॅक ऑफिस, आर्थिक, ड्रायव्हर, आणि रिटेल क्षेत्रांत रोजगार निर्मितीला वाव आहे.

अपनाच्या अहवालानुसार आता काम करण्याच्या आवडी निवडीही बदलत आहेत. उदा. व्यवसाय निर्मितीमध्ये ४४% लोकांना आवड आहे. तर ३९% लोकांना विक्री आणि बाहेरची कामे करायला आवडतात. तर २२% लोकांना सामानाची ने आण करायला आवडते. १९% लोकांना बॅकऑफिसमध्ये काम करायला आवडते. तर १६% लोकांनी कॉम्पुटर ऑपरेटरची नोकरी निवडली आहे. १४% लोक इंजिनीअर झाले आहेत. तर ११% लोक शेफ बेकरी व्यवसायात गेले आहेत. प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळया, ध्येय एकच, काहीही करून पोटाची खळगी भरणे. हॉस्पिटल मध्ये काम करणारे ६०% आहेत. तर फ्रिज दुरुस्त करणारे (५७%) केमिकल इंजिनियर (३५%) वेल्डर (३२%) टर्नर फिटर (१९.९६%) ड्राफ्टमन (१४%). व्यक्ती तितक्या प्रकृती तसं व्यवसाय तितक्या व्यक्ती.

५०% मुलाखती या दिल्ली, हैद्राबाद, मुंबई या ठिकाणी होत असल्या तरी दुसऱ्या शहरातील मुलाखतींचे प्रमाण ३०% ने वाढले आहे. १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुलाखती दिल्या आहेत. घरून काम करण्याला सुद्धा लोक पसंती देत आहेत. इथे २% ची वाढ आहे. रोजगारासाठी नवीन उमेदवारांना सुद्धा मागणी आहे. आता जास्त करून महिला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत.

त्यांनी सुद्धा भरपूर मुलाखती दिल्या आहेत. पारंपरिक चौकट मोडून महिला आता सुरक्षा रक्षक, सामानाची ने आण करणे, शेफ, I.T या क्षेत्रात नोकरी करत आहेत. ऍपवर आधारित रोजगारही ९६% ने वाढले आहेत. अपना कंपनीने आताच वोडाफोन आयडियाशी पार्टनरशिप केली आहे. मागच्या वर्षी या ऍपमध्ये २६ शहरातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. आता त्या ७० पर्यंत गेल्या आहेत.

Related posts

Leave a Comment