प्रशिक्षणादरम्यान बॉम्बे सॅपर्स च्या प्रत्येक नियमांचे पालन करणारे सहकारी ते सैन्यदल प्रमुख हा त्यांचा प्रवास पाहिला की माझा उर अभिमानाने भरून येतो. त्यांची मेहनत, कोणतंही काम करण्याची तयारी कौतुकास्पद आहे. कर्नल के थामया त्यांचे सहकारी जनरल श्री मनोज पांडे यांच्या विषयी बोलत होते. श्री मनोज पांडे यांना १ मे रोजी सैन्याचे प्रमुख म्हणून पदभार दिला गेला. शुक्रवार १३ जानेवारी १९८३ रोजी आम्ही नवीन भरती झालेले १६ ऑफिसर बॉम्बे इंजिनीरिंग ग्रुप किरकी (आता खडकी) येथे भारताच्या विविध भागातून येऊन पोचलो. २१ दिवसांची सक्तीची सुट्टी नुकतीच संपली होती. महिन्याभरापूर्वी भारतीय मिलिटरी अकादमी डेहराडून येथे होतो.
१० डिसेंबर १९८२ रोजी खचअ ची स्थापना होऊन ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यादिवशी आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या परेड मध्ये भाग घेतला. प्रधानमंत्री इंदिरा गांधी प्रमुख पाहुण्या होत्या. १४ दिवसानंतर २४ डिसेंबर १९८२ ला फिल्ड मार्शल सॅम माणिकशा आमची शेवटची परेड बघायला आले होते. त्यानंतर आमच्या पैकी ४८४ जणांना भारतीय सैन्यात घेण्यात आले. आणि आमच्यापैकी १६ जणांना बॉम्बे सॅपर्स साठी निवडण्यात आले. इंजिनिर्सच्या तीन ग्रुप्स पैकी एक. आम्ही रेजीमेन्ट सेंटर इथे पोचलो. तिथे आम्हाला १७ दिवस राहायचे होते. म्हणजेच ३० जानेवारी १९८३ पर्यंत. आणि नंतर आम्हाला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग (उचए) पुणे दापोडी इथे जायचे होते.

आम्हाला तरुण ऑफिसर्स (इंजिनिर्सचा) कोर्स ३१ जानेवारी १९८३ ते २३ जुलै १९८३ पर्यंत करायचा होता. त्या १७ दिवसात खरतर आम्हाला आमच्या तुकड्यांबद्दल शिकायला मदत झाली. आणि ग्रुपचा इतिहास आणि परंपरेविषयी शिकायला मिळालं. आम्हाला आमच्या सहकारी सैनिकांच्या प्रशिक्षणाची झलक बघायला मिळाली. फोटो- मिलिटरी इंजिनीरिंग कॉलेज पुणे येथील सन्मान करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी. रौप्य पदकाचे मानकरी. श्री. अ घ सिंग, श्री जसपाल रीन, पंकज मित्तल आणि मी प्रशिक्षणादरम्यान आमची तुकडी एकच होती. श्री अजय शर्मा, श्री अरुण शर्मा, श्री आशिष घोष, श्री ऊ ड दहिया, कड सिंधू, श्री मनोज पांडे,
श्रीहरी ईश्वरन, च श्रीनिवासन, सलील तिवारी, राजीव मलिक हे दुसऱ्या कंपनीतील होते.त्यामुळे त्यांचा आमच्याशी संबंध आला नाही. पण या १७ दिवसाच्या वास्तव्यात आमची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर मात्र आमची डिसेंबर १९८२ ची बॅच कायम संपर्कात होती. लेखक जेम्स थर्बर यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. दोघांची एकमेकांना सोबत असते. ४ जण जमले की मेजवानी असते. आणि तीन जणांची गर्दी असते. आम्ही तर ४ु४ होतो म्हणजे मेजवानीच मेजवानी. आम्ही नव्यानेच नियुक्त झालो होतो त्यात तरुणपणी सळसळता उत्साह असायचा. आमच्या गणवेशांवरील बिल्ल्यांमुळे आम्हाला ऑफिसर म्हणायचे. पण ना तिथे ऑफिस होत ना हाताखाली कोणी काम करणारा होता. आम्ही जिथे राहायचो तिथे खूप दंगामस्ती करायचो. थोडक्यात ’मस्ती की पाठशाला’.
ही सगळी दंगामस्ती करताना प्रत्येकाच्या मनामध्ये मी माझ्याविषयी ठसा उमटवला होता. मला आठवतं आमच्यापैकी एक जण जो लवकरच सैन्य प्रमुख होणार होता. तो नेहमी शांत असायचा. मितभाषी होता.मोजकंच बोलायचा पण मुद्द्याचं बोलायचा. बाकी वेळ शांत. त्याच्या व्यक्तिमत्वाचा पैलू मला काही दिवसानंतर कळला. सैन्यातील प्रथेप्रमाणे जे कोणी नवीन भरती होणारे ऑफिसर असतील त्यांना पार्टी हॉलमध्ये मेजवानी देऊन स्वागत केलं जात असे. त्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्यांसाठी ही पहिलीच मेजवानी असते. बॉम्बे इंजिनियर ग्रुपची खडकी येथील खानावळ प्रेरणादायी आहे.

इथल्या भिंती भिंतीवर सैन्याचा इतिहास कोरला आहे. बॉम्बे सॅपर्स ग्रुप कडे क्रॉस होता. सेकंड लेप्ट.(नंतर लेप्ट जनरल श्री प्रेमिंद्र सिंग भगत, परमवीर चक्र सेकंड लेप्ट मेजर श्री राम राघोबा राणे आणि मरणोत्तर अशोक चक्र नायब सुभेदार गौतम सिंग) नवीन भरती झालेल्यानी हीच परंपरा पुढे चालवावी असे सर्वांना वाटे. त्या संध्याकाळी आम्ही सर्व जण ब्रिगेडियर चड गुसेन इएऋ चे कामाण्डेण्ट यांच्याकडे गेलो होतो. तिथे आम्हाला फार चांगली वागणूक मिळाली. त्यामुळे एक कौटुंबिक वातावरण तयार झालं. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आम्ही आत गेलो. तिथे सर्व साहित्य पद्धतशीर पणे मांडलेले होते. तेवढ्यात काहीतरी विचित्र घडलं. कसलातरी आवाज आला.
मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर खानावळीच्या छताला दोऱ्यांचं जाळ होतं. आणि त्याला एक आडवा खांब होता. त्या खांबाला हुक होते आणि त्यावर पडदा लटकावलेला होता. त्या खानावळीतच जेवणाच्या टेबल वर पंखे होते. जेव्हा वीज नव्हती तेव्हा पंखा बाहेर बसलेला माणूस आपल्या हाताने हलवत असे. पंख्याची दोरी त्याच्या हाती असायची. आता विजेवर पंखे चालतात. मला आलेला आवाज त्या दोऱ्यांचा होता. बाहेर बसलेला माणूस एका विशिष्ट पद्धतीने त्या दोऱ्या हलवत असे. आणि त्या पडद्याच्या खाली बसलेल्या माणसाला वारा लागत असे. आम्ही जेवत होतो तोपर्यंत हे सुरु होतं. जसे कमांडर उठले तस ते बंद झालं. खरतर यामुळे माझ्या जेवणातली मजा गेली. मी नवीन होतो. मला मिलिटरीचा अनुभव नव्हता. त्यात मी मिलिटरीच्या खानावळीत कधीच जेवायला गेलो नव्हतो.
मला कळलंच नाही की बिना विजेचा पंखा हवा कुठून फेकतो आहे. जेवताना मी विचार करत होतो की हवा नक्की येतेय कुठून मग माझी ट्यूब पेटली. मग म्हणलं दोऱ्या नेमक्या जातायत कुठे. तेव्हा कळलं की बाहेर बसलेला माणूस त्या दोऱ्या खेचत होता. मला कसतरी वाटलं. फक्त आपल्याला वारा लागावा म्हणून त्या माणसाला हे लोक एखाद्या गुलामासारखं काम करायला सांगत आहेत. मला अपराधी वाटायला लागलं. जेवण झालं. आम्ही घरी परतलो. मनोज मला म्हणाला. अरे ते लोक फक्त आपल्याला वारा लागावा म्हणून पंखे चालवत होते. मला ते पाहून फार वाईट वाटलं. तेवढ्यात एक जण मागून येऊन म्हणाला. तुम्ही उगाच वाईट वाटून घेताय. त्याच काय आहे की ही खानावळ बांधली तेव्हा विजेचा शोध लागलेला नव्हता. आणि तेव्हा ब्रिटिशांचा काळ होता. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या लोकांना ब्रिटिशांनी किती त्रास दिला ते.
माणसाकडून पंखे हलवून घेणं हा त्या त्रासाचाच भाग होता. पण आता तसे नाही आता पंखे विजेवर चालतात. हे ऐकलं आणि माझा आणि मनोजचा जीव भांड्यात पडला. आपल्या सुखासाठी कोणी जबरदस्तीने काम करतय ही गोष्ट मनोजच्या मनाला खात होती. त्याच्या मनात आपल्या सहकार्यांविषयी सहानुभूती होती. दुसरा असाच प्रसंग घडला. आज सैन्यात करियर करण्यासाठी सर्व नेमणुका या मिलिटरी सेक्रेटरी ब्रांच ऑफिस मधून होतात. अगदी नवीन भरती होणाऱ्यांच्या सुद्धा. पण ८२-८३ साली आम्ही जेव्हा रुजू झालो तेव्हा असं नव्हतं. ब्रांचने आम्हाला आमचे ग्रुप्स नेमून दिले. सुरुवातीची काही वर्ष आम्ही ग्रुप्स मधेच होतो. ग्रुपच्या प्रमुखाची आम्हा सर्वाना तुकड्या वाटून देण्याची जबाबदारी होती. आम्हाला कोणती तुकडी मिळते याची आम्हाला उत्सुकता होती. त्यानुसार मग पुढची तयारी करायची होती.

आमचं पुढील आयुष्य आणि कारकीर्द तिथेच घडणार होती. संध्याकाळी लेप्ट कर्नल बोपाई यांनी घोषणा केली. मला १०९ इंजिनीअरची तुकडी मिळाली. माझा आनंद गगनात मावेना. मला पुण्यातच उचए मध्ये राहायला मिळणार होतं. त्याच वर्षी जुलै मध्ये मला रुजू व्हायचं होतं आणि तेव्हाच उत्तर पूर्वेला ऑपेरेशनल रोल साठी जावं लागणार होतं. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही एकत्र. उचए पुण्यात आम्हाला जी जागा दिली होती ती तेव्हा ११० इंजिनियर तुकडीची होती. मनोज त्या तुकडीत होता. पुण्यात पोस्टिंग म्हणजे ऑफिसरना आनंद व्हायचा. पुणे हे भारतातील एकमेव सैनिकी प्रशिक्षण केंद्र होतं. बरेच जण म्हणायचे की पुण्यात जसं सैन्याचं प्रशिक्षण दिलं जातं तस आणखी कुठेही दिलं जात नाही. मनोज तिथे एक दिवसही नव्हता.
तरी त्याला दिलेल्या पोस्टिंग मुळे तो मनातून खट्टू झाला. पुण्यात त्याला आणखी तीन चार वर्ष काढावी लागणार होती. त्यानंतर त्याला लगेचच डिग्रीचा कोर्स करावा लागणार होता. थेरी तर त्याची पक्की होती पण त्याला प्रत्यक्ष मैदानावरील अनुभव घ्यायचा होता आणि त्यासाठी पुण्याच्या बाहेर पोस्टिंग मिळणं गरजेचं होतं. एकदा मैदानावर प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो परत पुण्याला येणार होता. त्याने बोपायांना कसतरी पटवलं आणि २६७ इंजिनियर या प्रत्यक्ष मैदानावर जाणाऱ्या तुकडीत पोस्टिंग मिळवली. करियरच्या सुरुवातीपासून मनोज आपल्या ध्येयाविषयी पक्का होता. जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने बरोबर निर्णय घेऊन इंजिनीअरची पलटण सोडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीचा प्रवास आजवर कोणत्याच ऑफिसरने केला नव्हता. सॅपर्सची चौकात मोडून स्वतःचा प्रवास करणारा मनोज एकमेव होता. मनोजने केलेला हा प्रवास इतर ऑफिसर्ससाठी प्रेरणादायी ठरेल.

दुसरं म्हणजे त्याचं एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं. मनोज कडून तुम्ही काय शिकू शकता तर एखादी गोष्ट मांडण्यासाठी नेहमी मोठ्याने बोलायला हवं असं नाही. तर लहान आवाजात सुद्धा ती गोष्ट समोरच्याला समजावून सांगितली तर समजू शकते. ३० जानेवारी १९८३ ला आमच्या पैकी १६ जणांनी उचए च्या कोर्स साठी नोंदणी केली. जो दुसऱ्या दिवशी सुरु होणार होता. पाच परदेशी ऑफिसर धरून आम्ही ६३ जण होतो. मनोजने पहिल्या दिवसापासूनच आपल्यातल्या हुशारीची चुणूक दाखवायला सुरुवात केली. कोर्स मध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला रौप्य पदक दिलं जायचं. त्यावर्षीचं रौप्य पदक मनोज ने पटकावलं. २३ जुलै १९८३ ला कोर्स संपला आणि आम्ही आपापल्या दिशेने मार्गस्थ झालो. या ४० वर्षात मनोजला मी ५-६ वेळेला भेटलो असेन. धावती भेट असायची.
मी छऊअ मध्ये शिकायला नव्हतो, मनोज आणि मी एका तुकडीतही नव्हतो. त्यामुळे आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. किंवा मी त्याचा जवळचा नातेवाईकही नव्हतो. की ज्याला त्याच्या सगळ्या गोष्टी माहित असतील. पण तरीही एक सहकारी म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. त्याची इथपर्यंतची वाटचाल कौतुकास्पद आहे. १० डिसेंबर १९८२ ला जेव्हा इंदिरा गांधी आमच्या परेड नंतर भाषण देत होत्या. तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की आमच्यापैकी कोणीतरी एक इतक्या मोठ्या पदापर्यंत पोचणार आहे.

ङ्गसैन्यातील नेतृत्व म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि नेता म्हणून चारित्र्याचा आरसा असतो. जो त्या व्यक्तीबरोबर त्याच्या सहकाऱ्यांचे असलेले संबंध दर्शवतो.‘ त्या म्हणाल्या. बहुतेक सगळ्याच अधिकाऱ्यांमध्ये इतिहास बदलण्याची ताकद असते. कारण त्यांना तो माहित असतो. आधुनिक काळातील सैनिकांना आपल्या देशाविषयी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींविषयी माहिती असली पाहिजे. त्यांना सेनेबद्दलच मानसशास्त्र, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र माहित असायला हवं. त्यांना सैन्यातील बदलांची माहिती असायला हवी. कारण बदल हा जीवनाचा भाग आहे. नेतुत्व गुण महत्वाचा आहे. पण त्याबरोबर हा गुण त्या व्यक्तीमध्ये नैसर्गिक रित्या असणं महत्वाचं आहे. कोणीही ऐरागैरा सैन्याचं नेतृत्व करू शकत नाही.
३९ वर्षानंतर आज इंदिराजींनी सांगितलेला प्रत्येक गुण असलेला माणूस सैन्याचा प्रमुख होतो आहे. जनरल मनोज पांडे आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कर्नल थायमा उद्दापा (निवृत्त) यांनी घठएउ आता (छखढघ) मधून इटेक इलेक्ट्रिकल केले आहे.१९८२ साली बॉम्बे सॅपर्सला त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी रॅपिड इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. आणि एप्रिल २००७ मध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी खखच इंदोर मध्ये नोकरी केली ते मणिपाल उडपी इथे राहतात. संपर्कासाठी त्यांचा इमेल आयडी र्ज्ञींीर्वीरिऽसारळश्र.ल-ेा
