नवी दिल्ली- सरकारने IAS ऑफिसर फैझल शाह यांचा राजीनामा मान्य करून त्यांना त्यांची नोकरी परत दिली आहे.त्यांचे पुढचे पोस्टिंग लवकरच जाहीर करण्यात येईल. फैझल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण केली. त्यांनी केलेल्या टि्वट्स मध्ये म्हटले आहे की २०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून राजकारणात जायचे ठरवले. ‘माझ्या आयुष्यातले ८ महिने (जानेवारी १९ ते ऑगस्ट १९) हे खूप तणावपूर्ण होते. एका केसवर काम करत असताना मी इतक्या वर्षात जे कमावले ते सर्व मला गमवावे लागले.
नोकरी, मित्र, माझं नाव सगळं गमावलं. पण मी आशा कधीच सोडली नाही. माझीच तत्वं आड आली पण माझा स्वतःवर विश्वास होता, की मी एकदा केलेल्या चुका परत करणार नाही. पण आयुष्याने मला दुसरी संधी दिलीय. मला त्या ८ महिन्यांच्या आठवणी पुसून टाकायच्या आहेत. कालपरत्वे हळू हळू सगळ्याच पुसल्या जातील याची खात्री आहे.’ दुसरी संधी म्हणजे काय हे जरी फैझलने सांगितलं नसलं तरी मागच्या एक वर्षापासून सुरु असलेल्या हालचालींवरून ते सरकारी नोकरीत परत येणार असं दिसत होतं. फक्त IAS ऑफिसर म्हणून की जम्मू काश्मीरच्या सरकारला सल्ला देणाऱ्या समितीवर सदस्य म्हणून हे माहित नाही.

‘आयुष्याबद्दल सांगण्याचा विचार हा सुंदर आहे. प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी. आयुष्यात येणाऱ्या अडचणींमुळे, बसणाऱ्या धक्क्यांमुळे तुम्ही कणखर होत जाता. भूतकाळाच्या सावल्यांपल्याडच जग खूपच सुंदर आहे. मी पुढच्या महिन्यात ३९ वर्षांचा होणार आहे. एक नवी सुरुवात करायला उत्सुक आहे.’ त्यांनी टि्वट केले. फैझलने राजीनामा देऊन २०१९ मध्ये जम्मू काश्मीर पीपल मोमेन्ट हा पक्ष स्थापन केला. पण दुर्दैवाने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावर त्यांना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सुटकेनंतर मात्र त्यांनी राजकारण सोडले आणि सरकारी नोकरीत परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. त्यांनी काश्मीर मध्ये लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांनाच राजकारणातून बाहेर पडावे लागले. प्रशिक्षण आणि मनुष्यबळ या भागांव्यतिरिक्त सगळीकडून मिळालेल्या अहवालानुसार सरकारने त्यांना परत IAS पद देण्याचे ठरवले आहे. जम्मू काश्मीरच्या लोलब या छोट्याश्या गावातून आलेल्या फैझल यांनी २००९ मध्ये UPSC मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचे वडील २००२ च्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या लोकांच्या उत्साहाबद्दल फैझल बोलत होते. त्यांना दिल्ली विमानतळावर १४-१५ ऑगस्ट १९ च्या रात्री डांबून ठेवले गेले होते. आणि त्याच स्थितीत श्रीनगरला पाठवण्यात आले. ६ महिने स्थानबद्धतेत काढल्यानंतर पहिल्यांदा शेर काश्मीर आणि MLA हॉस्टेल मध्ये केलेल्या कार्यक्रमाबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यातून त्यांची ४ महिन्यांनी सुटका झाली.

सुटका झाल्यावर लगेच त्यांनी सर्व टि्वट्स काढून टाकले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांवर जम्मू कश्मीर सरकारसंबंधी काही लिहिले नाही. जून २०२१ मध्ये मोदीजी तिथल्या नेत्यांना भेटले. फैझलने टि्वट केले की प्रधानमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे काश्मिरी जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मी ज्यांना ज्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की लवकरच काहीतरी चांगलं घडणार आहे असं वाटतंय. हा दुरावा कदाचित कायमचा मिटेल.
ऑगस्ट २०२० मध्ये फैझलने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, राजीनामा दिला हे खरतर वाईट केले. त्यामुळे लोक मला एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देणारा म्हणून चिडवतील. असंही म्हणतील की पदाचा नीट उपयोग करू शकलो नाही. काश्मीरमधील राजकारणाविषयी मी मांडलेल्या काही मतांमुळे मी देशद्रोही ठरलो. त्यामुळे सिव्हिल सर्विसेस मध्ये ज्या तरुणांना जायचे आहे त्यांचे खच्चीकरण झाले. आणि त्याचबरोबर माझे सहकारी अस्वस्थ झाले. करण त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने बाहेर पडताना पाहिले.
