पोटाचा आकार कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची आसने करावी लागतात. ही कॅलरीज जाळण्यासाठी स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, आणि पचनशक्ती सुधारण्यात उपयुक्त आहेत. वाढत्या वयानुसार, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनियमित व्यायामामुळे पोटाची चरबी वाढते. त्यामुळे आपल्याच शरीराबाबत आपल्या मनात न्यूनगंड तयार होतो. लोक नेहमी विचारतात की वाढलेलं पोट कमी करण्यासाठी योगाची मदत होऊ शकते का? वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम आणि आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे स्वयंशिस्तीची गरज असते. योगासनांमध्ये या सर्वांचाच समावेश होतो.
त्यामुळे योगासने ही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. स्नायूंवर योग्य प्रकारे ताण देण्यासाठी योगासनांमध्ये बरेच प्रकार सांगितले आहेत. खाली दिलेली काही आसने केल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. व्यायामशाळेत तुम्ही ज्या प्रकारे स्नायूंवर ताण देऊन काम करता त्याच्या अगदी उलट योगासनांमध्ये स्नायूंवर कमी ताण देऊन नैसर्गिक रित्या वजन कमी करण्यावर भर दिला जातो. पोटाचा आकार कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची आसने करावी लागतात. ही कॅलरीज जाळण्यासाठी, स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, आणि पचनशक्ती सुधारण्यात उपयुक्त आहेत.
वेळापत्रकानुसार खालील योगाभ्यास नियमितपणे करा.
1.) ताडासन (वृक्ष स्थिती) कसे करावे ?

दोन्ही पायांवर उभे राहा. आणि हात खांद्यापासून सैल सोडा. दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहा. जेणेकरून तुमचे वजन दोन्ही पायांवर सम प्रमाणात विभागले जाईल. हाताची बोटे एकमेकांना जुळवून हात खांद्यातून आभाळाच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे वरच्या दिशेला असू द्या. श्वास आत घ्या. दोन्ही खांदे वरच्या दिशेला स्ट्रेच करा. आणि पायांच्या बोटावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत थोडा वेळ थांबा. संपूर्ण शरीर ताणण्याचा प्रयत्न करा. अगदी खालपासून वरपर्यंत तेही तोल ढळू न देता. श्वास सोडताना पुन्हा हळू हळू पायावर उभे राहा. परत श्वास आत घ्या परत अंगठयावर उभे राहा. शरीराचा तोल सावरण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता.
2.) वीरभद्रासन (सैनिक स्थिती) – कसे कराल ?

दोन्ही पायात ३- ४ फुटांचं अंतर ठेऊन चटई वर उभे राहा. आणि जमिनीपासून सरळ हात वर करा. आणि एकमेकांना समांतर ठेवा. उजवा गुडघा जमिनीला समांतर वाकवा आणि डावा पाय सरळ ठेवा. श्वास आत घ्या. हात आभाळाकडे नेण्याचा प्रयत्न करा.छाती पुढे काढून पाठीत वाकण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेताना हात जास्तीत जास्त आभाळाकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि श्वास बाहेर सोडताना कमरेत जास्तीत जास्त वाकायाचा प्रयत्न करा. डाव्या बाजूसही हीच क्रिया परत करा.
3.) बालासन (बाळाची स्थिती) कसे कराल ?

गुडघ्यांवर उभे राहून टाचांवर बसा. आता दीर्घ श्वास घेऊन, तुमचे कपाळ जमिनीला टेकवा. तुमचे हात शरीराच्या दोन्ही बाजूस जमिनीला टेकलेले हवेत. दीर्घ श्वास घ्या. उजवा हात डाव्या खांद्याच्या खाली आणा. आणि उजव्या हाताच्या बोटांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या बाजूसही हीच कृती करा.
4.) बद्ध कोनासन (फुलपाखराची स्थिती) कसे करावे?

पाय पसरून बसा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळतील असे समोरासमोर आणा. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याना स्पर्श करा. ताठ बसा आणि दोन्ही मांड्या फुपाखराच्या पंखांप्रमाणे हलवा. श्वासोच्छ्वासाबरोबर दोन्ही पाय अशाच प्रकारे मांड्यातून हलवत राहा.
5.) जानू शिर्षासन – कसे करावे

उजवा पाय लांब करून जमिनीवर बसा. डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आणि दोन्ही हात हवेत लांब करा. दीर्घ श्वास घेताना कमरेत वाका आणि उजव्या पायाच्या दिशेने हात न्या. उजव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत थोडावेळ थांबून मग विश्रांती घ्या. डाव्या बाजूसही हीच क्रिया करा.
6.) हलासन – कसे कराल?

शवासनात जमिनीवर झोपा. जमिनीशी लांब साधतील अशाप्रकारे पाय वर उचला हाताचे तळवे कमरेखाली ठेवून कोपर वाकवा. हाताच्या साहाय्याने पाय डोक्यावरून नेऊन १८० डिग्री चा कोन करा. आणि तुमच्या पायाचे अंगठे जमिनीला टेकतील असे पहा. थोड्यावेळ अशा स्थितीत थांबा आणि मग विश्रांती घ्या.
7.) अधोमुख श्वानासन

गुडघे आणि हात जमिनीला टेकवा. गुडघे जमिनीपासून वर न्या. दोन्ही पाय ताठ करा. आणि कंबर वरच्या बाजूला न्या. खांदे सरळ ठेवा आणि हाताचे तळवे जमिनीला टेकलेले राहू द्या. तुमचे डोके दोन्ही खांद्यांच्या मधून बाहेर काढा. शरीर उलट्या V च्या आकारात आणा. दीर्घ श्वास घेऊन थोडावेळ तसेच थांबा. मग विश्रांती घ्या.
8.) भुजंगासन (कसे कराल)

पोटावर झोपा. तोंड खाली करा. दोन्ही हात वाकवून तळवे छातीच्या जवळ आणा. तळवे जमिनीवर दाबून शरीराचा वरचा भाग वर उचला.( म्हणजे डोकं, मान, खांदे आणि छातीचा वरचा भाग ) श्वासोच्छ्वास सामान्य ठेवा. ही स्थिती ३० सेकंद ठेवा.
9.) सेतुबंध सर्वांगासन

पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा. आणि कंबर जमिनीपासून वर उचला. तळवे कमरेच्या खाली सरळ आणि मान आणि डोके जमिनीवर असू द्या. अशा स्थितीत थोडावेळ थांबा मग विश्रांती घ्या.
10.) धनुरासन (कसे करावे)

पोटावर झोपा. गुडघे अशा पद्धतीने वाकवा की तुमच्या दोन्ही हातांनी पायाच्या घोट्याना स्पर्श करता यावा. दीर्घ श्वास घ्या. छाती आणि कंबर वर उचला. असे २० सेकंदापर्यंत राहा हळू हळू श्वास सोडा. विश्रांती घ्या. या आसनांचा रोज सराव करावा. तसेच योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. बाकीच्या व्यायामप्रकारासारखेच योगासने केल्यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही योगासने करायची सोडून दिलीत तर तुम्हाला खाण्यातून मिळणाऱ्या कॅलरीज कमी होणार नाहीत. त्यामुळे मधल्या भागातील चरबी वाढत राहील. वरील व्यायाम प्रकारांमुळे सर्व शरीराला व्यायाम तर होतोच पण पोटावरील जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.
इशारा – वरील सर्व माहिती माहित असावी म्हणून दिली आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे यावर अवलंबून राहू नये. किंवा या माहितीच्या आधारे सल्ला देऊ नये. तुमच्या तब्येतीच्या सर्व प्रश्नांविषयी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला कधीही टाळू नये. तसेच येथे काही वाचलेत म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. जर तुम्हाला काही वैद्यकीय किंवा मानसिक आजार असेल तर डॉक्टरांना फोन करा. जवळच्या हॉस्पिटल मध्ये जा. जर तुम्ही या दिलेल्या माहितीवर अवलंबून राहणार असाल तर जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. इथे दिलेल्या माहितीवरून रुग्णाला सल्ला दिलात तर तो त्याला मानवेलच असे नाही.
