स्वतः केलेला कायदा मोडणारा मेकॉले

भारताच्या संविधानात नमूद केलेल्या कायद्यांतून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. हे मेकॉले लाचखोरी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. १८३४ साली इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता ) ज्या ब्रिटिश राजकारण्याने तयार केली, त्यानेच एका प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी लाच दिली होती. एक मोठी गमतीची गोष्ट तामिळनाडूतल्या एका पुरातत्व शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. ती, म्हणजे बाबीगटन मेकॉले/जो एक प्रसिद्ध राजकारणी होता, त्याने एका प्रकरणातून सुटण्यासाठी लाच दिली होती आणि हे खुद्द त्याच्या एका अनुयायाने सांगितले आहे. ही फारशी कोणाला माहित नसलेली गोष्ट निलगिरी डॉक्युमेंट सेंटरने टाइम्स ऑफ इंडिया मार्फत या आठवड्यात प्रकाशात आणली आहे याचा अर्थ दोन प्रकारे लावला जाऊ शकतो.

एक म्हणजे इंग्लिश साहेबाने जबरदस्तीने लाच द्यायला लावली आणि दुसरा म्हणजे भारतीय दंड विधान संहिता ज्याने तयार केली तो ही या लाच प्रकरणात सामील होता. आज १८८ वर्षानंतर सुद्धा परिस्थिती सुधारलेली नाही. आजही आपण सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रॉफिक पोलिसाला सिग्नल तोडला तर दंड भरायला लागू नये म्हणून चिरमिरी रक्कम देत असतो. थोडक्यात कायदे मोडून शिक्षा भोगण्याऐवजी त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी पळवाटा शोधत असतो. मेकॉले प्रकरणानंतर इंग्रज अधिकारी हे लाच न स्वीकारणारे किंवा न देणारे प्रामाणिक आणि कायद्याचे पालन करणारे होते असे चित्र भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उदा भारतान आजही गोऱ्या फिरंग्यांच्या प्रामाणिकपणाचे न्याय करण्याच्या पद्धतीचे गोडवे गायले जातात. 

१८३४ मध्ये घडलेल्या उटी येथील मेकॉले लाच प्रकरणाचे लासलेस यांनी तपशीलवार वर्णन केले आहे. त्यावेळी मेकॉले हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कर्मचारी, इतिहासकार आणि राजकारणी होता. तेव्हा तो मद्रास ते उटी हा सात दिवसांचा प्रवास करून गव्हर्नर लॉर्ड विलियम बेंटिक यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिला होता. तेव्हा त्यांनी गव्हर्नरला ओटकमंड क्लबचे प्रमुख पद देऊ केले. या सोहळ्यानंतर मेकॉले ३ महिन्यापर्यंत उटीतच तळ ठोकून होता. त्या काळात त्याच्या पालखी धरणाऱ्याने तेथील स्थानिक महिलेशी सूत जुळवले होते. मेकॉलेला माहित नव्हते. पण मद्रासला परतायच्या मार्गावर अचानक गावकच्यांनी उटीच्या एका चर्च जवळ त्याचा रस्ता अडवला. मेकॉले कोण होता हे गावकऱ्यांना माहित नव्हते. 

त्यांनी पालखी धरणाऱ्याला पकडले आणि त्याच्या प्रेयसीशी लग्न करावयास सांगितले. अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. प्रकरण चिघळले. मेकॉले सकट सर्व जण तेथील जिल्हा कार्यालयात गेले. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने पालखी धरणाऱ्यासह सर्वाना अभयदान दिले. झाले. मेकॉले आणि इतर सर्व जण मद्रासकडे बिनधोकपणे निघून गेले. आणि गावकरी हताशपणे मागे फिरले. मी एकाला विचारले जो त्या गावकऱ्यांचा प्रमुख होता, काय झाले तिकडे? तो म्हणाला मेकॉले साहेब म्हणजे देवमाणूस आहेत. त्यांनी आम्हाला १०० रुपये देऊन प्रकरण मिटवायला सांगितले. त्या काळी १०० रुपये ही खूप मोठी रक्कम होती. साधारण एवढी की १०० एकर जमीन विकत घेता आली असती. आता हा प्रसंग गव्हर्नरच्या कानावर जाऊ नये, म्हणून प्रयत्न केला. तरीही तो त्यांच्या कानावर गेलाच . तोही एका नाव्ह्या मार्फत ज्याने मेकॉले आणि त्या पालखीधाऱ्याला उटीतुन बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. बेंटिकने याकडे दुर्लक्ष केले.

आणि टॉम मेकॉले मूर्ख टॉम म्हणून ओळखला जाऊ लागला. जो आधी हुशार म्हणून ओळखला जायचा. यावरून एवढंच लक्षात येत की माणूस छोटा असो वा मोठा, स्वतःच्या गळ्याशी प्रकरण आल्यावर त्यातून बाहेर पडायला कोणत्याही थराला जाऊ शकतो. ज्या प्रकरणासाठी मेकॉलेने लाच दिली, ते खाजगी प्रकरण होते. आणि इंडियन पिनल कोडशी त्याचा काही संबंध नव्हता. हे प्रकरण झाले तेव्हा इंडियन पिनल कोडचा मसुदा तयार होता. कणेरीमुक्कु गावातील अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. असे म्हटले जाते की मेकॉलेने जी १००  रुपयांची लाच गावकऱ्यांना दिली त्याबद्दल तो वर्षभराच्या शिक्षेस आणि दंडाच्या रकमेस पात्र होता. कोणत्याही माणसाला लाच देणे किंवा त्याच्याकडून लाच घेणे हा तेव्हाही गुन्हाच होता आणि आजही गुन्हाच आहे. पण मेकॉलेने स्वतःच्या पदाचा वापर करून स्वतःची सुटका करून घेतली. दोन दशकांआधी  असेच कायदा बनवणारे कायद्यातल्या पळवाटा काढून सुटायचे. कायदे फक्त नावापुरते होते. पण आता चित्र वेगळे आहे.

Related posts

Leave a Comment