भारताच्या संविधानात नमूद केलेल्या कायद्यांतून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. हे मेकॉले लाचखोरी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. १८३४ साली इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता ) ज्या ब्रिटिश राजकारण्याने तयार केली, त्यानेच एका प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी लाच दिली होती. एक मोठी गमतीची गोष्ट तामिळनाडूतल्या एका पुरातत्व शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. ती, म्हणजे बाबीगटन मेकॉले/जो एक प्रसिद्ध राजकारणी होता, त्याने एका प्रकरणातून सुटण्यासाठी लाच दिली होती आणि हे खुद्द त्याच्या एका अनुयायाने सांगितले आहे. ही फारशी कोणाला माहित नसलेली गोष्ट निलगिरी डॉक्युमेंट सेंटरने टाइम्स ऑफ इंडिया मार्फत या आठवड्यात प्रकाशात आणली…
Read More