अन्न आणि पोषण सर्वेक्षणात ओडिशाचा पहिला क्रमांक !

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राज्यातील क्रमवारी जाहीर करण्यात आली असून ओडिशा त्यात सामान्य श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्रिपुरा विशेष श्रेणीत आले आहे. सामान्य श्रेणीत ओडिशानंतर उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तर विशेष श्रेणीत  ईशान्येकडील राज्य, हिमालयातील राज्य आणि बेटांचा समावेश होतो. त्रिपुरा नंतर हिमाचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम यांचा या यादीत समावेश आहे.

ही क्रमवारी  राज्यांनी त्यांच्याकडील अन्नाचे वितरण, प्रक्रिया यांच्या दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. या क्रमवारीचा उद्देश हा की कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी. ही क्रमवारी पहिल्यांदाच काढण्यात आली आहे. आता इथून पुढे ती दरवर्षी काढण्यात येईल.  ही यादी केंद्रीय अन्न आणि वितरण मंत्री श्री पियुष गोयल यांनी अन्न आणि पोषण सुरक्षा या विषयावरील परिषदेत जाहीर केली. 

राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असण्याच्या आणि त्यायोगे सहयोग करण्याच्या दृष्टीने ही यादी बनवली गेली. राज्य आपसातील काही चांगल्या गोष्टी शिकू शकतील आणि उपासमार आणि अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर तोडगा काढू शकतील असे श्री गोयल यांनी सांगितले.  या यादीमुळे यंत्रणेत सुद्धा पारदर्शकता येईल आणि खरी माहिती दिली जाईल. या परिषदेत इतर राज्यातील चांगल्या पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले.

Related posts

Leave a Comment