स्टार्टअप्सच्या ६० हजार नोकऱ्या धोक्यात

स्टार्ट अप पासून सुरुवात केलेल्या ६०,००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि एकीकडे भारत २०० युनिकॉर्न कंपन्या सुरु करण्याच्या तयारीत आहे. अपुऱ्या पैश्यांअभावी बरेचसे स्टार्टअप्स बंद पडले असून ६०,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील तरुणांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण जास्त आहे. २५ शहरातून १२२ स्टार्टअप्स युनिकॉर्नस बनण्यासाठी तयार आहेत.(ज्यांचे भांडवल १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त असते) पण खरी गोष्ट ही आहे की अनुदानाअभावी स्टार्टअप्स बंद पडत असून तिकडे काम करणारे तरुण बेरोजगार होत आहेत.

१२ हजार स्टार्टअप्सने तरुणांना बाहेरचा रस्ता दाखवला.  त्यात ओला, ब्लिंक इट, बायजु (व्हाईट हॅट जुनियर, टॉपर) अन अकॅडमी, वेदांतू, कार्स २४, मोबाईल प्रीमियर लीग, लिडो लर्निंग, ट्रेलो, फार आय फर्लांको यांचा समावेश होतो. तज्ज्ञांच्या मते ५० हजार जणांना कॉस्ट मॅनेजमेंट आणि रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली काढून टाकण्यात आले. तर काही स्टार्टअप्स पैसे वसूल करण्याच्या मार्गावर आहेत. काही मोठ्या कंपन्यांनीही हीच पद्धत वापरली जसे की ओला, वेदांतू, कार्स २४ आणि MPL.

जागतिक अर्थव्यवस्थेचा या स्टार्टअप्स वर नक्कीच परिणाम होत असला पाहिजे. त्यामुळेच त्यांना मिळणाऱ्या अनुदानावर परिणाम होत आहे. आर्थिक मंदीमुळे सुद्धा काही स्टार्टअप्सनी कॉस्ट कटिंग आणि कामगारांना कमी करणे सुरु केले आहे. शॉर्ट रन मध्ये जरी स्टार्टअपच्या वाढीला अडथळे येत असले तरी भविष्यात त्यांना चांगला  फायदा होणार आहे. बायजुज ने ६०० तर व्हाईट हात जुनिअर मधून ३०० जणांना काढण्यात आले. या सर्वांचे कारण म्हणजे आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा आता पुन्हा प्रत्यक्ष सुरु झाल्या आहेत.

Related posts

Leave a Comment