६ लाख आधार कार्ड रद्द!

६ लाखाच्या आसपास आधार कार्ड रद्द करण्यात आली असून आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीने नवीन आधार कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ९८१.६९ करोड एव्हढा खर्च केला आहे. ओळख प्रमाणपत्र (UIDAI) ला नागरिकांना युनिक आयडी देण्याचे काम सोपवले होते. पण त्यांनीच ‘बनावट आधार कार्ड’ आहे या कारणावरून ३१ मे २०२२ ला ६ लाख आधार कार्ड रद्द केली आहेत, असे लोकसभेत सांगण्यात आले. ३१ मे २०२२ पर्यंत बनावट किंवा इतर काही कारणावरून रद्द झालेल्या आधार ओळखपत्रांची संख्या ५,९८,९९९ एवढी आहे.

बनावट आधार कार्ड बनवण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय केले आहेत. तसेच यंत्रणेत सुधारणा करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. आधार कार्डासाठी नवीन नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना आता बायोमेट्रिक आवश्यक केले आहे. तसेच आता बायोमेट्रिक करताना जसे अंगठ्याचे ठसे द्यावे लागतात. तसेच आता चेहरा हे देखील ओळखीचे प्रमाण म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. आधार नोंदणी, सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या सेवा पुरवण्याच्या दृष्टीने UIDAI त्यांच्या रेजिस्टार मार्फत नोंदणी व सुधारणा करण्याच्या सेवा नागरिकांना पुरवत आहे.

३० जून २०२२ पर्यंत देशभरात ५७ हजार आधार केंद्र कार्यरत आहेत. तसेच ३४,५०० मोबाईल वरून नंबर आणि ई-मेल आयडी सुधारणा करण्यासाठी अर्ज केले आहेत. तसेच ५ वर्षाखालील मुलांची आधार नोंदणी करण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. UIDAI ने त्यांच्या ‘माय आधार पोर्टल’ वर नागरिकांना त्यांच्या नावात बदल, जन्मतारखेत बदल, आदी सुविधा पुरवल्या आहेत. हरवलेले आधार कार्ड परत मिळवण्यासाठी नागरिक त्यांची माहिती खाली लिंक वर टाकू शकतात.

https://myaadhar.uidai.gov.in/retrieve uid-eid किंवा जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड हरवल्याची तक्रार करू शकतात. किंवा १९४७ या क्रमांकावर फोन करू शकतात. हरवलेले आधार कार्ड परत मिळवण्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती व्यवस्थित द्यायला हवी.

Related posts

Leave a Comment