जे तरुण हिंसाचारात आणि जाळपोळीत सहभागी झाले असतील अशा तरुणांची लष्करात भरती नाही!

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात इंदोर रेल्वे मार्गावर विरोध दर्शवणारा तरुण वर्ग हा प्रसंग आहे १७ जून २०२२ चा.
लष्कर प्रमुखांनी २ वर्षानंतर चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आता लष्कराचे काम आहे. केंद्र सरकारने अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निदान या प्रक्रियेत तरी राजकारण मध्ये आणू नये. अन्यथा लष्कराची तसेच देशाची मोठी हानी होईल.” लेप्ट. जनरल के हिमालय सिंग फॉर्मर जनरल ऑफिसर कमांडिंग १६ कॉर्पस.
या हिंसाचाराचा विरोध झालाच पाहिजे म्हणजे लोकांना कळेल की लष्कराला आणि देशाला हे मान्य नाही. ज्यांनी पूर्वी जाळपोळ केली आहे, हिंसाचार केला आहे अशा तरुणांना भरती करून घेऊ नये. त्यांच्यासाठी लष्करात जागा नाही. जर असे जाळपोळ करणारे तरुण भरती करून घेतले तर पुढे जाऊन देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. असे तरुण शोधून भरती प्रक्रियेतून त्यांचे नाव बेदखल करण्यात यावे. या सगळ्या प्रक्रियेत सुद्धा राजकारण मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे न झाल्यास उत्तम. मला स्वतःला जरी या योजनेच्या कार्यपद्धतीविषयी काही शंका असल्या तरी देशाच्या दृष्टीने ही योजना उत्तम आहे. यामुळे भारतीय सैन्यात दीर्घ कालीन टिकणारे बदल होतील.

सिकंदराबाद रेल्वे स्थानकात जमावाने रेलरोको केला आणि रेल्वे च्या सामानाची मोडतोड करून विरोध दर्शवला.
मी मघाशी या योजनेच्या कार्यपद्धतीविषयी काही मुद्द्यांबद्दल सांगत होतो पण लवकरच सैन्याकडून त्याचे निरसन केले जाईल. एकंदर योजना बघता खूपच चांगली आहे असे वाटत असले तरी आता फक्त ती कागदावरच राहू नये ही इच्छा. आता भारतीय सैन्याने त्यांच्या अग्निवीरांना योग्य ते प्रशिक्षण देऊन एकीचे महत्व सांगून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करायला हवे. तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्या.
पण चार वर्षानंतर अग्नीवीर काय करणार याची योजना नसल्याने आंदोलने होत आहेत. काही राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की नंतर त्यांना सरकारी नोकरीत घेण्यात येईल. पण त्याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही. मघाशी म्हणल्याप्रमाणे यात राजकारण आणले जाऊ नये. पण काही राजकीय पक्षांनी तसे संकेत दिले आहेत. जे या घडीला हानिकारक ठरू शकतात. काही राजकीय पक्ष या गोष्टीचा पक्षासाठी फायदा करून घेऊ इच्छितात. देशाच्या कोणत्याही महत्वाच्या निर्णयाबाबतीत त्यांनी स्वतःवर संयम ठेवायला हवा.

या तरुणांना वयाच्या २२ व्या वर्षीच सैन्यात भरती व्हायची संधी मिळत आहे. जेव्हा इतरांची कारकीर्द सुरूही झालेली नसते. अशा वयात या तरुणांना सैन्यात ४ वर्षे काम करून १२ लाख रुपये मिळतील. आणि या अनुभवाचा पुढे जाऊन त्यांनाच फायदा होईल. हे सगळे मुद्दे समाजमाध्यमांवरून सांगितले गेले पाहिजेत.
