हेल फायर क्षेपणास्त्र- दहशतवाद्यांना अचूक टिपण्यासाठी अमेरिकेचा हुकमी एक्का.

अल कायदा अतिरेकी संघटनेचा मुख्य आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेने त्याच्या सेफ हाऊस वर केलेल्या हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेकडे असलेल्या हेलफायर क्षेपणास्त्राच्या वापरामुळे विस्फोट ही झाला नाही आणि जीवित हानीही टळली.  

 

फोटो- अमेरिकी हवाई दलाचे एम क्यू -१ प्रिडेटर विमान ज्यात ११४ हेलफायर क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. २००५ च्या हवाई कवायतींमध्ये यांनी केलेलं सादरीकरण हे जमिनीच्या एकदम जवळून केलेलं होतं. 

ओसामा बिन लादेन नंतर अल कायदाचा प्रमुख असलेल्या जवाहिरीचे वय ७१ वर्षे होते. ज्याचा काबुल येथील सेफ हाऊस मध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.१८ वाजता २ हेलफायर क्षेपणास्त्रांनी खात्मा केला. हा हल्ला अतिशय काळजीपूर्वक करण्यात आला. जेणेकरून आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत. जवाहिरीच्या कुटुंबापैकी कोणालाही इजा झाली नाही. आणि एकही नागरिक या हल्ल्यात मेला नाही असे बायडेन यांनी सांगितले. 

हेल फायर क्षेपणास्त्र अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे की त्यामुळे आपले लक्ष्य अचूक साधता येते. तेही कोणतीही जीवितहानी न होता. हेलफायर क्षेपणास्त्र हे पाच फुटापेक्षा लांब असतं. त्याचे वजन १०० पौंड (४५ किग्रॅ पेक्षा जास्त) हे इतके विध्वंसक आहे की याने हल्ला केल्यास गाड्या उध्वस्त होतात. आजूबाजूला डेब्रिसचे ढिगारे होतात आणि परिसराची हानी होते. या क्षेपणास्त्रामुळे कोणाही रहिवाशाला धोका न पोचवता शत्रूला मारता येते. २०१९ च्या अहवालानुसार केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पेंटागॉन यांनी त्यांच्या संरक्षणासाठी याचा वापर केला होता.

हेलफायर क्षेपणास्त्रात विविध प्रकार आहेत. त्यांच्या युद्धक्षमता मार्गदर्शक प्रणाली वेगवेगळ्या आहेत. हेलफायर आर ९ एक्स क्षेपणास्त्र कमीत कमी नुकसान करत शत्रूवर तुटून पडते. हे हेलफायर श्रेणीतील अगदी आधुनिक क्षेपणास्त्र आहे. आर ९ एक्सला फ्लायिंग जिनसुस हे टोपण नाव आहे.  ज्याच्या तलवारीसारख्या पात्यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेतला जातो. हे टोपण नाव १९७० ते १९८० च्या दशकात टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या सूरीच्या जाहिरातीमुळे दिले गेले. ज्यात या सुरीने झाडाची फांदी आणि टोमॅटो कापताना दाखवले गेले होते. या क्षेपणास्त्राला निन्जा बॉम्ब असेही म्हणतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा बाराक ओबामा होते तेव्हा या क्षेपणास्त्राचा शोध लावला गेला. जेव्हा अमेरिकेला अफगाणिस्तान, पाकिस्तान, सीरिया, सोमानीया यावर हल्ले करायचे होते पण त्यावेळी होणारी अमेरिकेची जीवितहानी टाळण्यासाठी या क्षेपणास्त्राचा शोध लावला गेला. नाहीतर जागतिक पातळीवर अमेरिकेची प्रतिष्ठा धोक्यात आली असती. २०११ सालापासून या क्षेपणास्त्रावर काम सुरु होते. अशाच प्रकारचे दुसरे क्षेपणास्त्र अल कायदाचा मुख्य ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी वापरले गेले होते.

असे जरी असले तरी हे क्षेपणास्त्र क्वचित वापरण्यात येते. आणि विशिष्ट परिस्थितीत वापरले जाते. फक्त तेव्हाच जेव्हा एखाद्या अतिरेकी संघटनेच्या म्होरक्याला मारायचे असते. आणि बाकीची हत्यारे वापरली तर नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी भीती असल्यास हे क्षेपणास्त्र वापरण्यात येते. पण जेव्हा एकट्यालाच मारायचं असेल तर आर ९ एक्स हे उत्तम क्षेपणास्त्र आहे.

जानेवारी २०१९ मध्ये येमिनी किल्ल्यात १७ अमेरिकी सैनिकांचे प्राण घेणाऱ्या जमाल अल बडवीला मारायला अमेरिकी सैन्याने हे क्षेपणास्त्र वापरले होते. येमेन मधल्या या हल्ल्याची जबाबदारी पेंटागॉन ने घेतली होती. यात कोणत्याही विशिष्ट युद्ध सामग्रीचा वापर केला नव्हता. फेब्रुवारी २०१७ मध्ये ईजिप्शियन नागरिक असलेल्या आणि अल कायदाशी निगडित असलेल्या अतिरेक्याला सुद्धा केंद्रीय गुप्तचर संस्थेने अमेरिकी विमानातून हेच क्षेपणास्त्र डागून संपवले. 

त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी मात्र घेतलेली नाही. या क्षेपणास्त्राविषयी कमालीची गुप्तता पाळली गेल्याने त्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. जसे की ते तयार करायला किती वेळ लागला. केंद्रीय गुप्तचर संस्था, पेंटागॉन आणि प्रत्यक्ष क्षेपणास्त्र बनवणारी कंपनी लॉक हिड मार्टिन कॉर्प यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला आहे. हेलफायरची क्षमता काळानुसार वाढली आहे. आता ते लांबचे लक्ष्य ही अचूक साधू शकते. तसेच त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवरही आता काम करण्यात येत आहे. जेणेकरून पुढच्या अभियानाच्या वेळी त्याची सुधारित आवृत्ती दिसेल. 

Related posts

Leave a Comment