कोहिनूर हिऱ्यावर जगन्नाथ पुरीचा दावा

ओडिसा मधील एका धर्मादाय संस्थेने कोहिनूर हिरा हा जगन्नाथ पुरीत होता असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मध्यस्ती करायला सांगून तो हिरा इंग्लंड मधून परत आणायला सांगितला आहे. महत्वाचे म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या निर्वाणानंतर धर्मादाय संस्थेने हा खुलासा केला आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा राजा होईल. त्यामुळे १०५ कॅरेट चा कोहिनूर हिरा त्यांच्या बायकोला केमिलीला मिळणार, जी कॉन्सोर्टची राणी आहे.

जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ सेना या धर्मादाय संस्थेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. धर्मादाय संस्थेने त्या पत्रात म्हटले आहे की कोहिनूर हिरा हा खरे तर जगन्नाथाचा आहे. पण तो आता राणीजवळ आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून तो परत भारतात त्याच्या मूळ ठिकाणी आणावयास सांगितले आहे.

महाराज जसवंत सिंगांनी त्यांच्या इच्छापत्रात लिहिल्याप्रमाणे तो हिरा जगन्नाथाला दान केला होता. असे जगन्नाथ सेनेचे  प्रवक्ते श्री दर्शन पटनाईक यांनी त्या पत्रात म्हटले आहे. महाराज रणजित सिगानी अफगाणिस्तानच्या नादीर शाहला युद्धात हरवल्यानंतर हा हिरा जगन्नाथ पुरीला दान केला होता असा श्री पटनाईक यांनी दावा केला आहे.

पण तो काही लगेच हस्तांतरित करण्यात आला नाही. राजा रणजित सिंग यांच्या निधनानंतर १० वर्षांनी इंग्रजांनी तो हिरा रणजित सिंग यांचा मुलगा दुलीप सिंग यांच्याकडून हस्तगत केला. त्यावेळी इंग्रजांना माहित होते की कोहिनूर हिरा हा भगवान जगन्नाथाचा आहे. इतिहास संशोधक श्री अनिल धीर यांनी पी टी आय ला सांगितले.

श्री पटनाईक यांनी सांगितले की त्यांनी राणीला या संदर्भात पत्र पाठवल्यानंतर त्यांना बकिंगहॅम पॅलेस मधून १९ ऑक्टोबर २०१६ रोजी उत्तर आले होते. त्यात लिहिले होते की तुम्ही थेट युनाइटेड किंग्डम सरकार कडे फिर्याद करा. कारण राणी एलिझाबेथ त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात. स्वतः राजकारणात भाग घेत नाहीत. त्या पत्राची एक प्रत राष्ट्रपतींना पाठवलेल्या विनंती अर्जातही जोडली असल्याचे त्यांनी सांगितले. 

श्री पटनाईक यांना कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासंबंधी ६ वर्ष थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की त्यावेळी पटनाईक यांना लंडन ला जाण्यासाठी व्हिसा देण्यात आला नाही. तो जर दिला असता तर कोहिनूर हिऱ्याचा विषय लंडन सरकारशी चर्चा करून पुढे नेता आला असता.

महाराज रंजितसिंगांचे इच्छापत्र ज्यात त्यांनी तो हिरा जगन्नाथ मंदिराला दान केल्याचे म्हणले आहे. ते एका ब्रिटिश अधिकाऱ्यानेच प्रमाणित केले आहे. आणि ते नॅशनल आर्चिव्ज दिल्ली इथे ठेवण्यात आले आहे. असे धीर यांनी सांगितले. त्यामुळे कोहिनूर हिऱ्यावर आपला हक्क सांगणारे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि खुद्द महाराजांचे वारस असले तरी हिरा रणजितसिंग यांनीच जगन्नाथ पुरीला दान केला होता. हे जगन्नाथ सेनेचे म्हणणे ग्राह्य धरायला हवे असे श्री धीर म्हणाले.

२०१६ साली ओडिशातील बिजू जनता दल पक्षाचे नेते श्री भूपिंदर सिंग यांनी राज्यसभेत कोहिनूर हिरा  भारतात परत आणण्याविषयी प्रस्ताव मांडला होता. भाजप चे पुरीमधील खासदार श्री जयंत सारंगी यांनी देखील हा विषय सभागृहात मांडू असे सांगितले आहे. कोहिनूर हिरा लाहोर च्या महाराजांनी त्यावेळी इंग्लंड च्या राणीला दिला होता. त्यानंतर सुमारे १७० वर्षांपूर्वीपासून तो कोणालाही दिला गेलेला नाही. असे पुरातत्वीय विभागाने काही वर्षांपूर्वी आर टी आय ला दिलेल्या उत्तरात म्हणले आहे.

लेखक आणि इतिहासकार  विलियम दाम्पलियर यांनी त्यांच्या ‘कोहिनूर’ या पुस्तकात लिहिले आहे की छोट्या दुलीप सिंगाला आपण कोहिनूर हिरा उगाच राणी व्हिक्टोरिया ला दिला म्हणून वाईट वाटत होते. पण दुसऱ्या बाजूला तिला हिरा द्यावसाही वाटत होता. तर भारत सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की कोहिनूर हिरा भारतातून चोरीला गेला नव्हता. किंवा कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्याने जबरदस्तीने नेला नव्हता. तर पंजाब मधील राजे महाराजांनी तो ईस्ट इंडिया कंपनीला दिला होता. ज्याची किंमत २०० मिलियन डॉलर एवढी आहे. जगातला हा सर्वात मौल्यवान हिरा १४ व्या शतकात दक्षिण भारतात कोल्लूर च्या खाणीत खाणकाम करताना सापडला.

Related posts

Leave a Comment