गेल्या ५ वर्षात ४० इंच आणि जास्त लांबीचा स्क्रीन असलेल्या  टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचा शेअर तिपटीने म्हणजेच ४०% पर्यंत वाढला आहे.

पूर्वीचे लोक टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आता टीव्ही सुद्धा इडियट बॉक्स न राहता स्मार्ट टीव्ही झालेला आहे. आणि आताच्या दिवसात सर्वसामान्य नोकरदारांच्या घरी सुद्धा फ्लॅट स्क्रीन असलेले एल सी डी/ एल इ डी टीव्ही बघायला मिळतात. त्यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीचे टीव्ही सेट्स बनवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यात आता सामान्य माणसाचे राहणीमानही सुधारू लागले आहे. साधारण एक ३२ ते ४० इंचाचा टीव्ही घ्यायचा ठरवला तर कोणालाही आपले खिसे चाचपावे लागत नाहीत. आणि आजकाल सर्वच एका स्मार्ट टीव्हीवर उपलबध आहे इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे……

Read More

गेल्या ५ वर्षात बँकांची थकबाकी ८.५८ लाख करोड म्हणजेच तिपटीने वाढली आहे.

जेव्हा कमर्शिअल बँकांच्या थकबाकीविषयी प्रश्न केला जातो त्यावेळेस आपण सामान्य माणसं असं समजतो की बँकांची फक्त मालमत्ता विकूनच थकबाकी वसूल करता येते.  पण प्रत्यक्षात तसे नाही.  असे केंद्र सरकार आणि बँकिंग रेग्युलेटरी चे म्हणणे आहे . सिबील ने दिलेल्या माहिती प्रमाणे ३१/०३/२०२२ पर्यंत ३०३५९ केसेस अशा होत्या ज्यांची थकबाकीची रक्कम १ कोटीपेक्षाही जास्त होती.   ही रक्कम ३१ मार्च २०१७ रोजी १७,२३६ खातेधारकांच्या विरुद्ध दाखल  केलेल्या केसेस च्या रकमेच्या (२,५८,२६६.९७) २.५८ करोड म्हणजेच तिप्पट आहे. थकबाकीदारांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ७९५४ खातेधारक असे आहेत ज्यांची थकबाकी १…

Read More