सिनियर्स टुडे ने १ ऑक्टोबरला डॉ कल्पना सारंगी (प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ, नानावटी रुग्णालयात डर्मेटॉलॉजी विभागाच्या प्रमुख) यांच्या उपस्थितीत साप्ताहिक लाईव्ह वेबिनारचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांनी जेष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या या विषयावरील प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच जेष्ठ नागरिकांनी आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ कल्पना सारंगी यांनी त्वचा या विषयात एम डी ची पदवी मिळवली आहे. त्या आघाडीच्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. तसेच नानावटी रुग्णालय येथे कॉस्मेटोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्या भारतातील काही मोजक्याच कॉस्मेटो डर्मेटोलॉजिस्ट पैकी एक आहेत. १००…
Read MoreCategory: Lifestyle
गेल्या ५ वर्षात ४० इंच आणि जास्त लांबीचा स्क्रीन असलेल्या टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचा शेअर तिपटीने म्हणजेच ४०% पर्यंत वाढला आहे.
पूर्वीचे लोक टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आता टीव्ही सुद्धा इडियट बॉक्स न राहता स्मार्ट टीव्ही झालेला आहे. आणि आताच्या दिवसात सर्वसामान्य नोकरदारांच्या घरी सुद्धा फ्लॅट स्क्रीन असलेले एल सी डी/ एल इ डी टीव्ही बघायला मिळतात. त्यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीचे टीव्ही सेट्स बनवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यात आता सामान्य माणसाचे राहणीमानही सुधारू लागले आहे. साधारण एक ३२ ते ४० इंचाचा टीव्ही घ्यायचा ठरवला तर कोणालाही आपले खिसे चाचपावे लागत नाहीत. आणि आजकाल सर्वच एका स्मार्ट टीव्हीवर उपलबध आहे इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे……
Read Moreयुजर्ससाठी ‘कलरफुल’ धमाका! फेसबूक आणणार नवं फीचर
गेल्या काही दिवसांत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की फेसबुक युजरफ्रेंडली होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स आणून बदल करण्याच्या प्रयत्नात फेसबुक आहे. फेसुबकचे हे फीचर्स युजर्सच्याही पसंतीस उतरत आहे. आता फेसबुक आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच युजर्सना काहीतरी हटके अनुभवता येणार आहे. फेसबुक आपल्या कॉमेंट बॉक्सवर अधिक काम करत आहे. तेव्हा काही दिवसांत युजर्सना कॉमेंटच्या मागे रंगीबेरंगी बॅकग्राऊंड ठेवता येणार आहे. स्टेटस अपडेट करताना जसा रंगीबेरंगी बॅकग्राऊंड, थीम वॉलपेपर ठेवण्याचा पर्याय युजर्सला देण्यात आलाय, तसाच तो कॉमेंट करताना देखील देण्यात येणार…
Read Moreअसा आरोग्यदायी चहा तुम्ही कधी प्यायलात का?
उत्तम आरोग्यासाठी विशिष्ट पेय अतिशय उपयुक्त असतात. चहा, कॉफी जास्त पिऊ नये असा सल्ला अनेक जण देतात. मात्र विशिष्ट प्रकारे तयार केलेला चहा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टीबाबत आपण अनेकदा ऐकलंही असेल. त्याचा आस्वादही अनेकांनी घेतला असेलच. पण स्वयंपाकघरातील आरोग्यदायी पदार्थांपासून तयार केलेला चहा शरीरासाठी उपयुक्त असतो. आलं, हळद आणि लिंबू यांचे मिश्रण असलेला चहा यकृत आणि इतर अवयवांसाठीही चांगला असतो. यकृत हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून त्याची काळजी घेणे गरजेचे असते. रक्त शुद्ध करण्याचे काम यकृताकडून केले जाते.
Read More… या सुकामेव्यामुळे वजन घटण्यास मदत
सुकामेवा म्हटले की, तब्येत सुधारणारे घटक असे आपल्याला अगदी सहज वाटते. अशक्तपणा कमी करण्यासाठी तसेच वजन वाढविण्यासाठी होणारा सुकामेव्याचा वापर आपल्याला माहिती असतो. मात्र वजन घटविण्यासाठीही सुकामेवा उपयुक्त असतो. सुकामेव्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि तो महाग असतो, असा आपला सामान्य समज असतो. मात्र वजन कमी करण्यामध्येही सुकामेवा अतिशय महत्त्वाचा ठरतो असे देबिका चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे परिमाण वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. पाहूया सुकामेव्यातून शरीराला कोणती पोषणमूल्ये मिळतात…
Read More