सिनियर्स टुडे ने १ ऑक्टोबरला डॉ कल्पना सारंगी (प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ, नानावटी रुग्णालयात डर्मेटॉलॉजी विभागाच्या प्रमुख) यांच्या उपस्थितीत साप्ताहिक लाईव्ह वेबिनारचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांनी जेष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या या विषयावरील प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच जेष्ठ नागरिकांनी आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ कल्पना सारंगी यांनी त्वचा या विषयात एम डी ची पदवी मिळवली आहे. त्या आघाडीच्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. तसेच नानावटी रुग्णालय येथे कॉस्मेटोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्या भारतातील काही मोजक्याच कॉस्मेटो डर्मेटोलॉजिस्ट पैकी एक आहेत.

१०० हुन जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये त्यांचे लेख छापून आले आहेत. तसेच त्यांनी टेक्स्टबुक अँड ऍटलास ऑफ डर्मेटो सर्जरी आणि मॅन्युअल ऑफ डर्मेटॉलॉजी सर्जरी या पुस्तकांसाठी सहलेखन केले आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय स्तरावरील २ सुवर्णपदके मिळाली आहेत.
गेल्या २ दशकांपासून लोकांमधील त्वचेबद्दलची जागरूकता वाढत चालली आहे. याचे सर्व श्रेय समाजमाध्यमे आणि वर्तमानपत्रांना जाते.
कोणते सॅनिटायझर वापरण्यास उत्तम आहे?
असे सॅनिटायझर ज्यात अल्कोहोल मिसळले नाही. किंवा ज्यात कोरफड घातलेली आहे. असे सॅनिटायझर वापरावे. किंवा सर्वात चांगले म्हणजे साबणाने आपले हात धुवावेत. कोविड आल्यापासून सर्वांनाच मास्क लावण्याची सवय लागली आहे. पण काही लोकांना त्यामुळे त्वचेचे विकार उद्भवतात. जसे की त्वचेवर पुरळ उठणे, ऍलर्जी येणे वैगरे.
जे लोक उष्ण प्रदेशात काम करताना मास्क लावतात. त्यांच्या त्वचेवर पुरळ उठते. हे सर्व त्रास मास्क घालण्यामुळे होतात. तुमची तब्येत उत्तम आहे की नाही हे तुमच्या त्वचेवरून कळते. त्वचेची उत्तम काळजी तेव्हाच घेता येते जेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेबद्दल सगळी माहिती असेल. तुमच्या त्वचेचा प्रकार, तुमच्या त्वचेला कशाची गरज आहे वैगरे. तसेच कोणताही साबण वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नाहीतर त्याची ऍलर्जी त्वचेवर उठते.
कधी कधी आपण उगीचच भारंभार उत्पादने आपल्या त्वचेसाठी वापरात असतो. ज्याची खरतर आपल्या

त्वचेला गरज नसते. अशी उत्पादने वापरल्याने त्वचा विकारांचा धोका संभवतो. आपल्या त्वचेचे एजिंग आपल्या वयाच्या पंचविशी पासूनच सुरु होते. एजिंग म्हणजे हळू हळू त्वचेचे पर्यायाने आपले वय वाढत जाणे. ज्या क्षणी आपण जन्मतो त्याक्षणी आपली त्वचा बाहेरील गोष्टींना प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. जो २ गोष्टींमुळे बदलू शकतो.
इंट्रिनसिक- यात गुणसूत्रांच्या समावेश होतो. मॉनेपोजच्या वेळी स्त्रियांमधील कॉलजेनची कमतरता.
एक्सट्रेनसिक– बाहेरच्या घटकांमुळे त्वचेवर होणारे परिणाम सूर्याची अतिनील किरणे, धूम्रपान, तणाव कमी पोषण, प्रदूषण या घटकांचा यात समावेश होतो.
वाढत्या वयाची काही लक्षणे-
कोरडी खडबडीत त्वचा, त्वचेवरील काळे डाग, मुरूम, त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होणे. त्वचेवर सुरुकुत्या पडण्याआधी तुम्ही ही लक्षणे तपासायला हवीत. त्वचेची योग्य ती निगा राखली तर ती दीर्घकाळ चांगली राहू शकते. नाहीतर लवकर खराब होते. वृद्धत्वामुळे रॅडिकल्स तयार होतात. तसेच ते उन्हामुळे, धूम्रपान आणि प्रदूषणामुळेही तयार होतात.
आपल्या देशात उन्ह हीच सर्वात मोठी समस्या आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा खराब होते असे नाही तर कॉम्प्युटरस्क्रीनच्या प्रकाशामुळेही त्वचा खराब होऊ शकते. खूप प्रकाश असलेल्या खोलीत बसणे, कॉम्प्युटर स्क्रीनकडे सतत पाहत राहणे, स्वयंपाकघरात उष्ण वातावरण असणे यामुळे सुद्धा त्वचेवर दुष्परिणाम होतात.

त्वचेवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी काय करावे.
दुपारच्या कडकडीत उन्हात बाहेर जाणे टाळा. सकाळी ९ ते १० च्या मधील ऊन त्वचेच्या पोषणासाठी योग्य असतं. त्यात त्वचेसाठी लागणार ड जीवनसत्व असतं. दुपारी बाहेर जायचंच असेल तर टोपी किंवा छत्री सोबत ठेवा. ज्यांची त्वचा नाजूक आहे अशांनी संस्क्रिम वापरावं. UV, UVV हे घटक असलेली क्रीम वापरावी. तसेच बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे, टोपी छत्री वापरावी.
तुम्हाला जर सतत बाहेर काम करावे लागत असेल तर तुमच्या क्रिम मध्ये SPF ३० किंवा ५० असायला हवं.
त्वचेवर ऍलर्जी आली असल्यास खालील उत्पादने वापरावीत.
- क्लीन्जर
- टोनर
- मॉस्चरायझर
- स्किन फ्रेंडली व्हिटॅमिन्स
- डिमेलनायझिंग एजन्ट (त्वचेवर डाग असतील तर)
- डोळ्याखाली काळ्या वर्तुळांवर लावायला क्रिम
- अँटी एजिंग प्रॉडक्ट
त्वचेचं वय वाढत जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती तुम्ही थांबवू शकत नाही. पील्स मुळे सुद्धा त्वचा विकार बरे होऊ शकतात. उदा. गोल्डन ग्लोव्ह पील ऑफ वैगरे वैगरे. पील्स मुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. पील्स चे ३ प्रकार असतात. सुपरफिशियल पील, डीप पील आणि मिडीयम पील असे प्रकार आहेत. पील सर्वांनीच वापरणं गरजेचं आहे. अगदी वयाच्या १५ व्या वर्षी मुरुमांसाठी ते वापरता येतं. आणि वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा वापरता येतं.

वाट्लीनियम टॉक्सिन ही साधी कॉस्मेटिक उपचार पद्धती आहे ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीश्या होऊ शकतात. हे उपचार दर सहा महिन्यांनी घ्यावे लागतात. ही उपचार पद्धत वयाच्या २५ ते ६५ वयापर्यंत कोणीही घेऊ शकतं. डर्मल फिलर्स मध्ये हायलुरोनिक ऍसिड बाहेरून देण्यात येते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ही बटोक्स पेक्षा थोडी महाग पद्धत आहे. यामुळे तुमचे वय १० ते १५ वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटते.
या सर्व उपचार पद्धतींमुळे काय काय कमी होण्यास मदत होते. कपाळावरील सुरकुत्या, गालावरील सुरकुत्या तर काही वेळा ओठांवरील डाग सुद्धा यामुळे निघून जाऊ शकतात. लेझर बीम ने त्वचेवरील नाजूक भागांवर काही परिणाम झाले असल्यास ते काढून टाकण्यास मदत होते. जसे की त्वचेवरील बारीक लव काढण्यासाठी, सुरकुत्या घालवण्यासाठी, टॅटू काढून टाकण्यासाठी, त्वचेवरील फोड, पुळ्या घालवण्यासाठी वैगरे वैगरे.
