आयकर भरताना काही अडचणी आल्यास आयकर विभागा कडून मिळवा वैयक्तिक मदत.

आयकर (इनकम टॅक्स) भरताना तात्काळ मदत मिळावी यासाठी आयकर विभागाने को ब्राउजिंगचा पर्याय समोर आणला आहे. यालाच कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. यामुळे करदाते कर भरताना आयकर विभागाचे अधिकारी बघू शकतात. म्हणजे कर भरताना काही अडचणी, शंका असल्यास त्याचे तात्काळ निवारण शक्य आहे.

को ब्राउजिंग म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे आयकर भरणाऱ्या व्यक्तीला कशी मदत होईल ते पाहू. को ब्राउजिंग ला कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. ज्यामुळे आयकर विभागातील अधिकारी करदात्यांना कर भरताना मदत करू शकतात.

को ब्राउजिंग च्या सेवेमुळे आपण काय काय करू शकतो?

को ब्राउजिंग च्या सत्रात सहायता करणाऱ्या एजन्ट्स ना कर भरणाऱ्या व्यक्तीचा कॉम्पुटर स्क्रीन दिसू शकतो. ज्यामुळे आयकर(टॅक्स) चा फॉर्म भरायला आणि इतर फॉर्म्स भरणे तसेच रिफंडची रक्कम भरणे यासाठी सहायक एजन्ट मदत करू शकतील. ज्या योगे अगदीच आयकर न भारत येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आयकर भरणे सोप्पे होईल. को ब्राउजिंग मध्ये लाईव्ह चॅटचा समावेश आहे.

 

को ब्राउजिंग मुळे आपली सर्व माहिती एजन्ट्स ना पाहता येते का?

नाही, सहायता करणाऱ्या एजन्ट्स ना इतर कोणतीही माहिती दिसत नाही. तसेच सत्र सुरु कारण्यापूर्वीं कर भरणाऱ्या व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग ची परवानगी द्यावी लागते. जर मधेच करदात्याला सत्र बंद करावेसे वाटल्यास तशीही सुविधा देण्यात आली आहे.

आयकर भरणाऱ्या व्यक्तीने हे सत्र कसे सुरु करावे?

आयकर भरण्यासाठी मदत करणाऱ्या मदतनिसाच्या कॉम्पुटर वर एक पॉप अप येईल. मग एजन्ट कर भरणाऱ्या व्यक्तीशी बोलेल . आणि त्याला कोब्राउजिंगचा मेनू कुठे दिसतो ते सांगेल. त्यानंतर कर दात्याने OTP जनरेट करून तो एजन्ट सोबत शेअर करावा. मग एजन्टने CB  जनरेट करून तो एजन्ट सोबत शेअर करावा. मग एजन्टने बटनावर करावे. त्यामुळे तो को ब्राऊजर URL ला जाऊ शकेल त्यानंतर करदात्याकडून आलेला OTP एजन्टने स्क्रीन वर टाकावा आणि सत्र सुरु करावे. सत्र सुरु झाल्यावर एजन्ट करदात्याला मदत करू शकतो. करदाता त्याच्या शंकांचं निरसन झाल्यावर सत्र थांबवू शकतो. एकदा सत्र संपल्यावर एजन्टला करदात्याचा ब्राऊजर दिसणार नाही.

टॅक्स भरणारा व्यक्ती जेव्हा को ब्राउजिंग चे सत्र सुरु करतो. तेव्हा ते कसे काम करते?

को ब्राऊजरच्या प्रॉक्सीला रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यानंतर त्या रिक्वेस्ट मध्ये केलेल्या काही बदलांमुळे ती cobrowse.incometax.gov.in कडून आल्यासारखी वाटते. त्यानंतर ही रिक्वेस्ट ओरिजिनल ब्राऊजर कडे पाठवली जाते. जिथून को ब्राउजिंगचे सत्र सुरु करायचे असते. मग वेबसाईट वरून को ब्राऊजर प्रॉक्सीला मेसेज येतो. कोब्राऊजर प्रॉक्सी कडून रिक्वेस्ट मध्ये बदल केले जातात. जेणेकरून ती सगळी माहिती Inframe वर डाउनलोड करता येईल. ती माहिती Inframe मध्ये लोड झाल्यावर वापरणारा आणि सांगणारा दोघेही एकमेकांशी संवाद साधू शकतात. यानंतर फक्त युजरच्या ब्राऊजरशी संवाद साधला जातो. ओरिजिनल वेबसाईटला रिक्वेस्ट पाठवावी लागत नाही.

को ब्राउजिंग करताना कोणत्याही प्रकारची जास्तीची इन्स्टॉलेशन करावी लागत नाहीत. किंवा Plug-ins सुद्धा वापरावे लागत नाही. त्यामुळे प्रक्रिया पटापट होतात. वापरायलाही सोप्पे आहे. त्यामुळे अगदीच नवखे लोकही  वापरू शकतात.

को ब्राउजिंग आणि स्क्रीनशेअरिंग मधील फरक. को ब्राउजिंग- यामध्ये कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीच्या ब्राऊजरशी पटकन कनेक्ट करता येते. यामध्ये टॅक्स भरण्यासाठी मदत करणाऱ्या एजन्टला संगणकावरील फक्त सध्या सुरु असलेला स्क्रीन दिसतो. बाकी काही दिसत नाही त्यामुळे हे अधिक सुरक्षित आहे. एजन्ट टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीच्या संगणकावरील स्क्रीनवर क्लिक करून त्याला विविध गोष्टीत मदत करू शकतो. जसे की फॉर्म भरणे एखादी ओळ ठळक करणे ज्यामुळे समोरील व्यक्तीच्या शंका दूर होण्यास मदत होते. यामध्ये डेटा मास्किंग नावाचा पर्याय आहे. जेणेकरून करदात्याचे पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती एजन्ट पासून सुरक्षित राहील.  

स्क्रीनशेअरिंग- स्क्रीन शेअरिंग करण्याआधी एजन्ट आणि आयकर भरणाऱ्या व्यक्तीस zoom, google meet यासारखी बाहेरची सॉफ्टवेअर वापरावी लागतात. यामध्ये एजन्ट असलेली व्यक्ती आयकर भरणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण स्क्रीन पाहू शकते. ब्राउजिंग करताना एखादे नोटिफिकेशन आल्यास तेही पाहू शकते. स्क्रीनशेअरिंग मध्ये आयकर भरायला मदत करणारे एजन्ट कर भरणाऱ्या व्यक्तीच्या संगणकाच्या स्क्रीनवर कुठेही क्लिक करू शकत नाहीत. ते फक्त फोनवर सूचना देऊ शकतात. स्क्रीन शेअरींग मध्ये डेटा मास्किंग केलेले नसते त्यामुळे कर दात्याच्या स्क्रीनवरील सर्व माहिती एजन्ट पाहू शकतात.

Related posts

Leave a Comment