फोटो – सांगलिंगठाह वय वर्षे ६३ त्याच्या तळावरून हैमूळ गावावर लक्ष ठेवताना.
लोकशाहीचे समर्थक असलेले गावकरी (सैनिक ) शस्त्रास्त्रे आणि अन्नासाठी भारतीय बांधवांवर अवलंबून आहेत. पाठीवर काडतुसांनी भरलेला पट्टा लावला आहे आणि हातात बंदूक धरलेली ती मुलगी लालहमान हैह तिचं बालपण तिच्याही नकळत हरवून बसली आहे. नुकतीच २ वर्षांपूर्वीच तर ती शाळेत शिकत होती. ज्या वयात मुली भातुकली किंवा तत्सम मुलींचे खेळ खेळतात. त्याच वयात तिला हातात बंदूक धरून लढाई साठी उभे राहावे लागत आहे. ती कधीकाळी मुलगी होती हे सांगणारी एकमेव खूण तिच्या शरीरावर उरली आहे. ती म्हणजे तिने हाताच्या बोटांना लावलेले जांभळे नेलपेंट.
वाळूने भरलेल्या पोत्यांच्या मागे लपून आता ती परिसराची आणि खोऱ्याची पाहणी करत असते. आणि तिच्या Walky-talky वर बोलत असते. Clear…Clear.. म्यानमारच्या फौजेची चौकी तिथून ५ मैलावर आहे. आणि तिथून सतत गोळ्यांचा वर्षाव होत असतो. पण निदान आज तरी जूनटाचे सैन्य हैमूल गावातून शांतपणे निघून जाईल अशी आशा आहे. फेब्रुवारी २०२१ साली म्यानमारच्या सैन्याने ज्याला तात्माडॉ सुद्धा म्हणतात, त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. आणि मग त्यांनी तेच केले जे राज्य करायला आलेला कोणताही शत्रू करतो. जसे की तेथील सरकार उलथून टाकणे, शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेल्या आंग सान सुय की यांना तुरुंगात डांबणे, इत्यादी.
सैनिकांनी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. राजकीय विरोधकांवर कारवाई केली. आंदोलकांवर अत्याचार केले. हे सगळे सुरु असताना पीपल्स डिफेन्स फोर्सने तेथील लोकशाही वाचवण्यासाठी बंड पुकारले. देशात आतापर्यंत साठ हजार PDF चे सैनिक तैनात आहेत. ते अनेकदा शत्रू सैन्याशी लढताना दिसतात. जवळपास अर्ध्या भूभागावर तरी त्यांचे नियंत्रण आहे. देशभरात या सैन्याकडून गनिमीकावा पद्धतीने लढलेल्या लढायांत प्रचंड मनुष्यहानी झाली आहे. सत्तांतर झाल्यापासून सुमारे २६०० नागरिकांना ठार करण्यात आले असून १६५०० जणांना अटक करण्यात आली आहे. जूनटाच्या सैनिकांनी नागरिकांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली आहे. आणि शहरांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. त्याचप्रमाणे आंदोलक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचा छळ केला जातो आहे.
फोटो- हैमूल मधील उठाव करणारे सैनिक भारताच्या सीमेजवळ.

झाय लिन डो जो सैन्यातील बॉम्ब इंजिनियर होता, तो ज्यावेळी भारतात परतला, तेव्हा त्याने सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे त्याला आंदोलकांना मारण्यासाठी आदेश दिले जायचे. आणि नागरिकांना मारण्यासाठी कशाप्रकारे जमिनीत बॉम्ब पुरले जायचे. तो पुढे म्हणाला “आम्हाला उठाव करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले जायचे. आणि मला खास आदेश होता की जोपर्यंत तळावरून कोणीही निघून जात नाही तोपर्यंत लावलेली स्फोटके निकामी करायची नाहीत. त्यामुळे आम्ही तिथून निघाल्यावर सुद्धा स्फोटके जिथे होती तशीच राहिली. ज्यामुळे हजारो निरपराध लोकांचे प्राण गेले.”
Mountain Eagle defence force ची लालहमनहैह ही सर्वात तरुण सैनिक आहे. Mountain Eagle defence force हा PDF चाच एक भाग आहे. ज्यात ३ डझन माणसे आणि हैमूल गावातील दोन बायका आहेत. त्या तरुण मुलींसाठी ही लढाई वैयक्तिक आहे. ऑगस्ट महिन्यात तिचा १७ वर्षांचा मित्र लालून आणि त्याच्या १४ वर्षांच्या भावाला जूनटाच्या सैनिकांनी ओलीस ठेवले होते.
जेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला लालमनहैह त्यांच्यासोबत होती. पण निशस्त्र. आणि म्हणूनच सैनिकांनी जेव्हा तिच्या मित्रांना खेचून नेलं, तेव्हा ती काहीही करू शकली नाही. रात्रभर त्या दोघांच्या नुसत्या किंकाळ्यांचे आवाज कानावर पडत होते. त्यांचा छळ केला जात होता. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी दुपारी बंदुकीच्या फैरींचे आवाज ऐकले. आणि काही घरे जळताना पाहिली. कारण जूनटा सैन्याने गावावर कब्जा केला होता. त्यांना दोघा भावंडांचे मृतदेह एका खड्यात पुरलेले मिळाले.
सीमेवरील रुग्णालयात जेव्हा त्या दोघांचे मृतदेह नेण्यात आले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी सांगितले की लालरुवातमावियाच्या शरीरावर जागोजागी छळ केल्याच्या खुणा दिसत होत्या. तर त्याच्या बहिणीवर बलात्कार करून अतिशय जवळून तिच्या डोक्यात ३ गोळ्या मारल्या गेल्या. यावरून जूनटा सैनिक किती अत्याचार करत असतील याची कल्पना न केलेलीच बरी!
“त्यांना नक्कीच खूप वेदना झाल्या असतील. त्यांची आई सांगत होती. त्या लांडग्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडलेले होते.”
फोटो- लालमनहैह म्यानमारच्या निरीक्षक चौकीवरून फौजेवर लक्ष ठेवताना.

लालनुईचा जूनटा सैनिकांशी निकराचा लढा सुरु आहे. ती रोज तिचे उठाव करणाऱ्यांच्या गणवेशातील फोटो इन्स्टाग्राम वर पोस्ट करत असते. तिच्या रोजनिशीत आपल्याला वाचायला मिळतं. Peoples defence force मध्ये भरती होणं हेच माझं भविष्य आहे. मी शरण जाणार नाही. रोज सकाळी उठल्यावर बंदुकीत गोळ्या भरताना लालमनहैहच्या मनात तिच्या जिवलग मित्रमैत्रिणींचे विचार सुरु असतात. ती सांगते ” मला आजही तो भितीदायक प्रसंग आठवतो. ज्या पद्धतीने त्यांना आमच्या पासून वेगळे केले गेले. मला माझ्या देशातील लोकांना या सैन्याच्या अत्याचारांपासून मुक्त करायचे आहे. आणि माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींबरोबर जे झालं त्याचा बदला घ्यायचा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींचे विचार सतत माझ्या मनात सुरु असतात. त्यामुळेच मला इथे उभे राहून लढायला प्रेरणा मिळते.
वर्षभरापूर्वी ९ जानेवारीला हैमूल गावात अशी बातमी पसरली की सरकारी सैन्य गावावर कब्जा करण्यासाठी येत आहे. यामुळे गावकरी सैरभैर झाले.
फोटो- हैमूल मधील उठाव करणारे सैनिक.

लालरीन डिका नावाचा गावकरी सांगत होता “लोकांना त्यांच्या अंगावर घातलेल्या कपड्यांखेरीज कोणतंही सामान घेऊन जायची संधी मिळाली नाही. आम्हाला माहित होतं की सैनिक आम्हाला मारून टाकतील कारण आम्ही गावकऱ्यांनीच सैन्याच्या विरोधात उठाव केला होता.” त्यानंतर त्यादिवशी जूनटाच्या सैनिकांनी गाव पेटवले. सगळी घरे पेटली. भारताच्या सीमेला लागून पश्चिमेला ३ मैलावर गावकऱ्यांनी तिया नदी ओलांडून मिझोराम मध्ये प्रवेश केला. हजाराहून जास्त म्यानमार मधील नागरिक आश्रयासाठी भारतात आले आहेत. आणि भारतीय सैन्याच्या तळावर राहत आहेत. भारत म्यानमार सीमा जरी बंद असली तरी मिझोरामच्या जनतेला म्यानमारमधील लोकांबद्दल आपुलकीची भावना आहे. ते त्यांना मदत करू इच्छितात. स्थानिक पोलिसांनी सीमेपलीकडून येणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केले आहे. तर मिझोरामच्या जनतेने त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे. स्थानिक आमदाराने दिलेल्या माहितीनुसार चाळीस हजारहून जास्त म्यानमार मधील लोक आता भारतीय सीमावर्ती भागातील ६० तळांवर राहत आहेत. “म्यानमारचे नागरिक आमचे बांधव आहेत. म्हणूनच आम्ही त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय केली आहे.” असे मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी सांगितले.
फोटो- मारिया आणि लालरीन डिका स्फोटके तपासताना

पण आता बरेचसे गावकरी हैमूल मध्ये मिझोराम येथील लोकांनी दिलेल्या बंदुका घेऊन जूनटा सैन्याविरुद्ध लढा देण्यासाठी परत येत आहेत. त्यांची जुनी घरे ज्यांचा आता फक्त सांगाडा शिल्लक आहे. तिथे आता दारुगोळा ठेवलेला असतो. आणि सैनिक गस्त घालत असतात. तेथील शांतता आता फक्त पहारा देत असलेल्या सैनिकाच्या मोटरसायकलच्या आवाजाने दुभंगते. ते फक्त मालमत्तेचं संरक्षण करत नाहीत तर त्यापलीकडे जाऊन संरक्षण करतात. हे गाव फक्त तेथील रहिवाशांसाठीच नाही तर संपूर्ण म्यानमारसाठी महत्वाचे आहे.
भारतातील औषधे ज्या मार्गाने बाहेर पाठवली जातात तो मार्ग याच गावातून जातो. आणि त्या मार्गाचे रक्षण करणे तसेच तिथे कोणत्याही प्रकारची तस्करी न होऊ देणे याची जबाबदारी गावकऱ्यांवर आहे. म्यानमारचा एक निष्कासित नेता जो सध्या मिझोरामची राजधानी आयझॉल इथे राहत आहे, त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की तो भारतात राहणाऱ्या एका समूहाचा सदस्य होता, जो बंडखोरांना मदत करत होता.
हैमूल मधील बंडखोर समूहाचा प्रमुख मारिया म्हणाला की आता आम्ही सर्वच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहोत. जर आमचा भारताशी संपर्क तुटला तर मात्र काही खरं नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी गावाभोवती स्फोटके लावली आहेत. म्हणजे जूनटाचे सैनिक आले की त्यांना कळेल.
फोटो- कमांडर मारिया त्याच्या wacky talky वर संदेश प्राप्त करताना.

भारतातून माल घेऊन येणाऱ्या ट्रक चालकांकडून आंदोलन करणारे देणग्या घेतात. उठाव करणाऱ्यांपैकी एक जण सांगत होता. त्यांची जे द्यायची इच्छा असेल ते आम्ही घेतो. त्यांच्यापैकी बरेच जण दयाळू असतात. महिन्यातून एकदा तरी उठाव करणारे लोक त्यांच्या कुटुंबाला भेटायला रात्रीच्या वेळी हैमूल मधून मिझोरामला जातात. पण आता या लढ्याकडे थोड्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने अन्न आणि बाकीच्या वस्तूंचा पुरवठा कमी होत आहे. आंदोलन करणारे बंदुका स्वतः बनवतात. पण भविष्यात ते किती काळ तग धरू शकतील याची खात्री नाही.
“आम्ही नवीन बंदुकांऐवजी जुन्या बंदुकांनी लढत आहोत” ६३ वर्षीय सांगलीथांग यांनी आपली गंजलेली बंदूक दाखवत सांगितले. उठाव करणाऱ्यांपैकी फक्त अर्ध्या लोकांना कसे लढायचे याचे प्रशिक्षण मिळाले आहे. तर फक्त काही जणांकडे बंदुका आहेत. त्यांची संदेश यंत्रणा सुद्धा नीट काम करत नाही. त्यामुळे PDF च्या नियंत्रणाखाली नेमका किती भाग आहे हे त्यांना माहित नाही.
कधीतरी या लढाईत विसाव्याचे क्षण येतात. त्यावेळी मग कोणी व्हॉलीबॉल खेळतं, तर कोणी पत्ते, तर कोणी गिटार वाजवताना दिसतो. पण हे सगळं जरी असलं तरी त्यांच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. मारिया म्हणतो ” आम्ही सर्व लोकशाही साठी लढत आहोत आणि सर्व ताकदीनिशी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू.”
