एक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. 

गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही.

फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस.

१९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास केला होता. मला आठवतं १९९३ च्या जुलै महिन्यात मला ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयाने आयरिश प्रश्नी सल्लामसलत करण्यासाठी उत्तर आयर्लंडला भेटीचे निमंत्रण दिले होते. (ब्रिटिशांनी त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवरती एखाद्या भारतीय व्यक्तीचा सल्ला घेतल्याचे हे एकमेव उदाहरण असेल.)  मला पहिल्यांदा ब्रिटिश गृहमंत्रालय लंडन इथे जावे लागले. आणि मग मी बेलफास्टला गेलो. सगळ्यात शेवटी मला बीबीसी रेडियो तर्फे त्यांच्या २४ तास चालणाऱ्या कार्यक्रमात कार्यक्रमात मुलाखतीसाठी बोलवले गेले. त्यावेळी बीबीसी रेडिओ चांगलाच प्रसिद्ध होता. आणि दूरदर्शन अजून भारतात यायचा होता. 

मला चांगलंच आठवतंय की माझ्या संग्रहित मुलाखतीत मी उत्तर आयर्लंडच्या समस्या आणि आपल्या भारतातील काश्मीर  समस्या यांची तुलना  केली होती. आणि माझी खात्री आहे की काश्मीर बद्दल मी जे काही बोललो होतो तो भाग वगळून ही मुलाखत प्रसारित केली गेली. भविष्यात बीबीसीने मला त्यांच्या तज्ज्ञांच्या शिष्ट मंडळावर नेमले. काश्मीर प्रश्नावर माझा अभ्यास सुरु होता. त्याचाच भाग म्हणून मी श्रीनगर इथे गेलो होतो. आणि नेमका त्याचवेळी अतिरेक्यांनी हजरतबल मंदिरावर कब्जा केला.  हजरतबल मंदिर काश्मिरातील पवित्र स्थानांपैकी एक असून इथे पैगंबराचे अवशेष असल्याचे सांगितले जाते. १९८४ साली अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर केलेल्या हल्ल्याची झलक पुन्हा एकदा भारतीय सैन्याला दाखवायची असा अतिरेक्यांचा मनसुबा होता.

२१ ऑक्टोबर १९९३ साली बीबीसी ने प्रसारित केलेल्या उर्दू बातमीपत्रात असे दाखवले गेले की हजरतबल मंदिराला भारतीय सैन्याने आग लावली. श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यात त्यावेळी क्रफयू लागला होता. आणि काय घडामोडी सुरु आहेत हे जाणून घेण्यासाठी बरेचसे काश्मिरी लोक रेडिओ ऐकत होते. तेव्हाची रेडिओ सर्विस होती बीबीसी. नेहमीप्रमाणे खोट्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या आणि लोक रस्त्यावर निदर्शने करू लागले. मी भारतीय सैन्याच्या XV Corp या मुख्यालयाशी संपर्क साधला आणि मला लंडन बीबीसीशी संपर्क करून द्या असे सांगितले. (पण त्यावेळी हे काम नक्कीच सोप्पे नव्हते. मी बीबीसीला फोन करून त्यांच्या तज्ज्ञ मंडळात मी असल्याचे सांगितले. आणि म्हणालो की हजरतबल मंदिर जाळल्याची खोटी बातमी प्रसारित केली गेली आहे. पण बीबीसीने सोयीस्कररीत्या यावर प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्याच दिवशी सीमा सुरक्षा दलाची फौज बिजबेहरा ( श्रीनगरच्या सीमेवरील गाव) इथून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. स्वसंरक्षणासाठी गोळीबार करण्याव्यतिरिक्त सैनिकांकडे पर्याय नव्हता. त्या हल्ल्यात ५१ काश्मिरी नागरिक मृत्यमुखी पडले. बीबीसी वर काश्मिरी लोकांची हत्या केल्याचा ठपका आहे.

बीबीसी तुम्हाला काय सांगणार नाही?

या सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या कारण बीबीसी पुन्हा तशीच वागत आहे जशी या आधी वागली होती. गुजरात मध्ये २००२ साली झालेल्या दंग्यांचे मुडदे पुन्हा उकरून वर काढणे म्हणजे भारताची किंवा मोदीजींची प्रतिमा खराब करण्यापेक्षाही लोकांमध्ये हिंदूंबद्दल भीती निर्माण करण्याचा उद्देश या पाठीमागे आहे. कोणताही शाळेत जाणारा मुलगा ज्याने थोडाबहुत इतिहास वाचला आहे तो सुद्धा हेच सांगेल की गेल्या ७५ वर्षात भारतात ज्या दंगली झाल्या त्या किती दुर्दैवी होत्या. या सगळ्या घटनांमध्ये भारतीय सैन्यालाच नेहमी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलवावे लागले आहे. 

सामान्यतः अहमदाबाद इथे ३ हजार प्रशिक्षित सैनिक उपस्थित असतात. पण फेब्रुवारी २००२ ही सामान्य वेळ नव्हती. भारतीय सैन्य आणि लष्कराची नेमणूक सीमेवर केली गेली. कारण पाकिस्तान कधीही युद्ध सुरु करेल अशी स्थिती होती. भारतीय सैन्याला पोहोचायला उशीर झाला. गोध्रा येथील घटना ज्यामुळे दंगली झाल्या तिचा थेट संबंध सीमेवरील परिस्थितीशी होता. पण बीबीसी आणि मोदींवर आरोप करणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खरं काय घडलं हे बीबीसी कधीच बाहेर येऊ देणार नाही.

२४ ऑक्टोबर २००२ साली अतिरेक्यांनी अह्मदाबादेतील अक्षरधाम मंदिरावर हल्ला केला त्यावेळी ३३ भाविक मारले गेले. २६ जुलै २००८ रोजी पुन्हा अहमदाबाद इथे बॉम्ब हल्ला झाला. त्यात २०० लोक मारले गेले. पण मोदीजी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा एवढे सगळे होऊनसुद्धा मुस्लिमांविरुद्ध एकही दंगल उसळली नाही.  गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. 

ब्रिटिशांनी आपल्याकडील लोकशाहीची बदनामी केली आहे. त्यांच्या दांभिकपणाचा निषेध करायची वेळ आता आली आहे. १९५२ साली भारतानेच पहिल्यांदा आपल्या नागरिकांना नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानंतर १९६८ साली अमेरिकेने दक्षिणी राज्यातील कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार दिला होता. आणि त्यानंतर ब्रिटिशांनी १९६८ साली उत्तर आयर्लंड मधील कॅथलिक्सना मतदानाचा अधिकार दिला होता. एकूणच भारतीयांनी आता बीबीसीच्या दुट्टपीपणाविरुद्ध उभे राहण्याची वेळ आली आहे.

Related posts

Leave a Comment