मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे?
हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ.
मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले.
मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची कर्णधार होती. असे श्वसनाचे विकार तरुण मुलांना जास्त करून होत आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे साक्षीने सांगितले.
डिसेंबर महिन्यापासून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना श्वसन विकार होत आहेत. मग तो उच्चभ्रू असो वा मध्यमवर्गीय किंवा गरीब. श्री तेजस धायगुडे म्हणतात,‘मी आणि माझी बायको रोज सकाळी धावायलाजातो. मी धावायला जाणं बंद केलं कारण हवेची गुणवत्ता खराब होत चालली होती. माझी बायको त्यानंतर आठवडाभर जात होती. पण त्यानंतर तिनेही जाणे बंद केले. कारण तिलाही घशाचा त्रास व्हायला लागला.’ श्वसनविकारासंबंधी उपचार घ्यायला रुग्णालयात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण ३०% आहे. साक्षीचे डॉक्टर सांगतात की चेंबूर, माझगाव, मुलुंड, बांद्रा, कुर्ला संकुल, मुंबई इथे श्वसनसंस्थेचे आजार असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. ही सर्व मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होत असल्याची लक्षणे आहेत.
थंडी पडल्याने मुंबईकरांनी स्वेटर बाहेर काढले खरे पण जवळपास चार महिने मुंबई शहर धुक्यांनी वेढलेले असते. साल २०१९ ते २०२२ च्या दरम्यान मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा दर खराब पासून अतिवाईट सरासरी २८ इतका झाला आहे. त्यात मागच्या वर्षीपेक्षा १५०% वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या स्विस प्रणालीच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगर भाग सर्वात जास्त प्रदूषित आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान तर मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले.
थंडी सरल्यानंतर सुद्धा मुंबईतील हवेची गुणवत्ता १५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान खराब ते अति खराब होती. पूर्वी अरबी समुद्रामुळे मुंबईचे प्रदूषण कमी होत असे. पण आता तसे काही राहिले नाही. अंजु गोयल Earth science आणि climate change विभागाच्या प्रमुख यांच्या मते ला निना मुळे समुद्रावरून
जमिनीकडे येणारे वारे जे पूर्वी २-३ दिवसात यायचे ते आता ७ ते १० दिवसात येतात.
समुद्राचा पृष्ठभाग थंड होतो. आणि त्यामुळे हवेतील उष्णता जास्त प्रमाणात शोषली जाते. या थंडपणामुळे जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होतो. आणि वातावरणात धूलिकण जमा होऊन धुरके तयार होते. असे वातावरणातील बदल हे हळूहळू वाढणाऱ्या वायू प्रदूषणामुळे होत आहेत. २०१० सालापर्यंत मुंबईतील धूलिकणांपासून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण pm 2.5 म्हणजेच ७० च्या आसपास होते. ना जास्ती ना कमी. या हिवाळ्यात pm 2.5 ची सरासरी पातळी १०० पेक्षा जास्त होती. म्हणजेच पातळीत १५० ने वाढ झाली होती. जी २०१० च्या तुलनेत दुप्पट होती. शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामांमुळे हे सर्व होत आहे. बांधकाम प्रकल्प जसे की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर बांधकामे यामुळे धुळीत वाढ झाली आहे. अनेकांचे घर आणि शाळा सुद्धा अशा बांधकामाच्या कामांनी वेढलेले आहे.
हवेची गुणवत्ता ५० किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चांगली असते. ५१ ते १०० असेल तर समाधानकारक. १०० ते २०० च्यामध्ये मध्यम असते. जानेवारी आणि फेब्रुवारीतील बहुतेक दिवशी मुंबईची हवेची गुणवत्ता २०० ते ४०० च्या मध्ये होती. वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमुख कारणात पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका येणे यांचा समावेश होतो. लहान मुलांना जास्त धोका संभवतो कारण ते मोठ्या व्यक्तींपेक्षा ३ पट जास्त श्वास घेतात. त्यांच्या फुफुसांच्या भोवतीचे आवरण हे पातळ असते आणि बारीक धूलिकण त्यात चिकटून राहतात. त्यांची श्वास नलिका लहान असते. त्यामुळे साहजिकच दूषित हवा जास्त प्रमाणात शोषली जाते. आणि पुन्हा ती हवा बाहेर जाताना अडथळे निर्माण होतात.
