“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’

“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’ तर्फे आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी समर्पित करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बोरिवलीचे आमदार श्री. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विट्टी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कोरोना महामारीच्या या कठीण काळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावले आहे. या दरम्यान अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा डॉक्टरांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच “राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 1 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता बोरीवलीच्या विट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात हा ह्रुद्य कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. अथर्वच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला नेहमी मदत केली जाते. ग्रामीण भागात राहणार्‍या मुलींसाठी शिक्षण, शहीदांच्या परिवारांना सर्व प्रकारची मदत, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सुनील राणे सातत्याने करत आहेत.

Related posts

Leave a Comment