माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे. कलेला कोणताही धर्म नसतो. एक कलाकार हा कलाकारच असतो. कोणतीही कला लोकांसमोर अशी सादर करावी की लोकांनी निःशब्द व्हायला हवं. १९५० च्या उत्तरार्धात ११ वर्षांच्या हैदर अली यांनी कथकली संगीत शिकण्यासाठी केरळ येथील कला मंडलम मध्ये प्रवेश घेतला. कथकली ही कला मंदिरात सादर केली जाते.
हैदर अलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नृत्यासाठी शिकवणी लावणे हे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. असे म्हणतात की एका हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबाने त्यांच्या शिकवणीचे पैसे भरले होते. श्री हैदर अली हे मुस्लिम असल्याने मंदिरात आपली कला सादर करू शकत नव्हते. पण असे जरी असले तरी श्री हैदर अलींना आपली कला सादर करता यावी म्हणून बऱ्याचशा मंदिरांनी उत्सवाच्या काळात कुंपणालगतची भिंत पाडून हैदर अलींसाठी रंगमंच तयार केला होता.

कोणताही गायक येसूदासांच्या गुरूवायुरर्पण वरील रचनांची बरोबरी करू शकत नाही. पण तरीही त्यांना गुरूवायुर मंदिरात गाण्यासाठी बंदी आहे. कारण ते हिंदू नाहीत. ही तर हैदर अलींसारखीच परिस्थिती झाली. नाहीतर श्रीम. मनसिया सारख्या भरतनाट्यम सादर करणाऱ्या नृत्यांगनेला केरळच्या कुडलमनिकम मंदिरात भरतनाट्यम सादर करण्यासाठी परवानगी नाकारली गेली नसती. नकाराचं कारण काय तर म्हणे त्या हिंदू नाहीत. त्या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत की आणि कोणी यामुळे मंदिर व्यवस्थापनाला काही फरक पडत नव्हता. आड येत होता तो त्यांचा धर्म.. अर्थात आता त्या कुठलाच धर्म मनात नाहीत.
मद्रास विद्यापीठातून भरत नाट्यमच शिक्षण घेतल्यानंतर मनसिया आपली कला सादर करतात. तसेच मुलांना शिकवतात. आणि आता त्या केरळ कलामंडलं मधून नृत्यातली Phd करत आहेत. “मी इस्लाम वर टीका का केली?” कारण त्यांचं म्हणणं आहे की नृत्य ही कला फक्त हिंदूंपुरती मर्यादित आहे. उद्या कोणीही उठून मला सांगितलं की अमुक एक कला ही फक्त त्यांची मक्तेदारी आहे. आणि म्हणून ती कला सादर करण्याचा मला अधिकार नाही. तर ते मला मान्य नाही. मनसिया शोभा वारियर यांना सांगत होत्या.
भरत नाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारची तुम्हाला भुरळ कशी पडली? कारण मुस्लिम समाजात असे खूपच कमी कलाकार आहेत जे शास्त्रीय नृत्य सादर करतात.?
माझी अम्मा( आई ) ही एक खरी मुस्लिम आहे. तिला टीव्ही वरील काही मुलींचे नृत्य पाहून भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आवडायला लागला. मग तिने माझी मोठी बहीण रुबियाला शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या गुरुजींकडे नेले. मी रुबियाचे नृत्य बघत बघतच मोठी झाले. त्यामुळे साहजिकच मी या नृत्य प्रकाराकडे खेचले गेले. सुरुवातीच्या दिवसातच आम्हा दोघी बहिणींना हा नृत्यप्रकार शिकण्यात गोडी वाटू लागली. पण आमच्यापेक्षा आमच्या पालकांनाच आम्हाला नृत्य शिकवण्यात जास्त रस वाटू लागला. आम्हालाही कलेचा हा प्रकार आवडतो आणि आम्हाला नृत्य करायलाही आवडतं. आम्ही इस्लाम धर्म पाळतो कारण आमचा जन्म त्याच धर्मात झाला आहे. आम्ही अत्यंत धार्मिक आहोत. आम्ही कधीच नमाज चुकवत नाही. आमच्या पालकांनी सुद्धा धर्मावरून कधी कोणामध्ये भेदभाव केलेला नाही.

माझ्या असं वाचनात आलंय की तू आणि तुझी बहीण तुम्हा दोघीना तुमच्या समाजाकडून दुय्यम वागणूक मिळाली कारण तुम्ही नृत्य करता?
आम्हाला वाळीत टाकण्यात आलं|/कारण आम्ही नृत्य करतो. त्या दिवसात आम्ही मंदिरात कथकली नृत्य सादर करायचो. त्यावर त्यांचं मत असं की आम्ही हिंदूंचा कलाप्रकार सादर केला. त्यामुळे आम्ही इस्लामचा भाग असू शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आमच्याच धर्मातून बाहेरचा रस्ता दाखवला. थोडक्यात वाळीत टाकलं. त्या काळात आम्ही खूपच आस्तिक होतो. त्यामुळे साहजिकच त्यांचं वागणं आमच्या मनाला लागलं.
तुमच्यावर असा कठीण प्रसंग आला का की जिथे तुम्हाला तुमची कला आणि तुमचा धर्म या दोघांपैकी एकाची निवड करावी लागली?
हो, तो निर्णय खूपच कठीण होता. मशिदीतून काही लोक आमच्या घरी येत आणि सांगत की आम्ही लेखी माफीपत्र दिलं तर आम्हाला परत धर्मात घेतलं जाईल. किंवा आम्हाला नृत्य सोडावं लागेल. ते धमकीच द्यायचे. या दोन्हीपैकी एक निवडलं नाहीत तर तुम्हाला धर्मातून बेदखल करावं लागेल. एक दिवस ते अशी धमकी देऊन गेल्यानंतर अप्पा (माझे बाबा), माझी बहीण आणि मी असं तिघांनी मिळून महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मापेक्षा कला महत्वाची.
त्या दिवशी मला अजूनही आठवतं अप्पानी आम्हाला विचारलं. ” संपूर्ण आयुष्य या कलेसाठी वाहायला तयार आहात का? आम्ही म्हणालो.. “आम्हाला हेच तर हवंय”. आम्ही आमच्या आयुष्यतला हा सर्वात मोठा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे अम्माचा मृत्यू. तिच्या जाण्यानंतर आम्हाला ज्या काही यातना सहन कराव्या लागल्या त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. अम्मा( माझी आई) जेव्हा गेली त्यावेळी या लोकांनी मशिदी जवळ आम्हाला आईची कबर खोदण्यासाठीही जागा मिळू दिली नाही. मग शेवटी आम्हाला तिला तिच्या मूळ घरी (वडिलोपार्जित घरी)पुराव लागलं.
दुसरा एक प्रसंग असाच. नुकतंच आम्हा दोघींचं लग्न (निकाह) ठरला होता. तर पुन्हा मशिदीतून काही लोक आमच्या घरी आमचा माफीनामा न्यायला आले. तेव्हा त्यांनी आम्हाला धमकावलं म्हणाले..”धर्मगुरूंचा पाठिंबा नसेल तर तुम्हाला दोघीना निकाह करता येणार नाही.” ते पुढे असं ही म्हणाले ” जर तुला तुझ्या आई सारखं मरण नको असेल तर नृत्य करणं थांबव आणि माफीनामा लिहून दे.. आता मात्र हे सहन करण्यापलीकडचं होतं. मग आम्ही ठरवलं आता यापुढे आमची कलाच आमचा धर्म असेल. आता आम्ही आमच्या मृत्यनंतर आमचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करायचा असं ठरवलंय.

तुम्ही हिंदू व्हायोलिन वादकाशी लग्न केलंत..
हो, माझ्या बहिणीने देखील एका हिंदूंशी ( चेन्नई मधील तामिळ अय्यर) लग्न केलं. पण तो कलाकार नाही.
तुमच्या शेजाऱ्यांनीही तुम्हाला नृत्य करण्यापासून अडवलं का ?
एक वेळ अशी होती की ते आमच्याशी बोलत नव्हते. पण आता तशी परस्थिती नाही. मी आजही त्या जागेत राहते. आणि नृत्याची शिकवणी सुद्धा घेते. माझ्या नृत्यशाळेत आसपासचे, शेजारचे शंभरहून अधिक विद्यार्थी नृत्याचे धडे गिरवत आहेत. गोष्टी हळू हळू बदलतात यावर आता माझा विश्वास बसला आहे. आणि शेजाऱ्यांनीही मला स्वीकारलं आहे.
मुस्लिम समाजाने तुम्हाला ज्या प्रकारे वागणूक दिली. त्यानंतर तुम्ही धर्माऐवजी कलेची निवड केली. तुम्ही मंदिरात शास्त्रीय नृत्य सादर करता असे करताना हिंदू समाजाकडून तुम्हाला काही वाईट अनुभव वाट्यास आले आहेत का?
लोक माझ्या मदतीला धावून आले. एक कलाकार म्हणून मला आदर दिला गेला. मी केरळ मधल्या जवळजवळ सगळ्याच मंदिरात नृत्य सादर केले आहे. गुरूवायुर च्या मेळपाठूर सभागृहात सुद्धा मी नृत्य केले आहे. आमचे विद्यार्थी ‘अरंगेत्रम'( पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर सादर करायचे नृत्य) तिथेच करतात. मला वाटलं की गुरुव्योर मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेशास परवानगी आहे. मेळपाठूर सभागृह हे मंदिर परिसरात नाही त्यामुळे आम्ही तिथे नृत्य सादर करू शकतो.

तुम्हाला अजूनही राग येतो का? कारण केरळ मध्ये अशी काही मंदिरे आहेत जिथे हिंदू धर्म नसलेल्या व्यक्तींना प्रवेश नाही.
नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाही आणि मला वाईटही वाटत नाही. उलट प्रत्येक वेळेस त्यांनी मला आदरानेच वागवलं आहे. मी अ ब क ड शिकण्या आधी नृत्य शिकले आहे. म्हणूनच श्रीकृष्ण आणि महादेव दोन्ही माझ्यातच आहेत. साहजिकच एक कलाकार म्हणून मला त्यांना जवळून पाहावंसं वाटतं. त्यांची पूजा करावीशी वाटते. जशी येसूदास सरांना सुद्धा एकदा गुरूवायुर मंदिरात प्रार्थना करायची होती. पण अजून एकदाही मी जबरदस्तीने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी कोणताही धर्म मानत नाही. पण मी देवाला मानते. मला वाटत की देवावरचा विश्वास आणि धर्मावरचा विश्वास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
म्हणजेच तुम्ही देवाला सर्वोच शक्ती मानता का?
हो. एक अशी शक्ती जी माझं मार्गदर्शन करते. जेव्हा मी खचते तेव्हा हीच शक्ती मला पुन्हा उभं राहण्यासाठी बळ देते. अशी शक्ती जी माझ्या कलेत विराजमान आहे. माझी कला ही माझी शक्ती आहे. आणि कलेची साधना करणं ही माझी पूजा आहे. आम्ही सर्वच जण नृत्य करण्याआधी रंगभूमीला नमस्कार करतो. कारण रंगभूमी हे आमचं मंदिर आहे.
आणि आमची कला हे आमचं दैवत आहे. मी जर मंदिरात/मंदिर परिसरात नृत्य करणार असेन तर नृत्य करण्याआधी मी बाहेरूनच देवासमोर हात जोडते आणि त्याच्यासमोर नतमस्तक होते. एक अशी वैश्विक शक्ती आहे जिच्यासमोर मी नतमस्तक होते. मग ती कोणत्याही रूपात असू दे, कुठेही असू दे. माझी कला माझ्यासोबत नेहमी असते. आणि तेच माझं दैवत आहे. आणि रंगभूमी मंदिर आहे.
तुम्ही नास्तिक आहात असं बोललं जातं…
मी नास्तिक नाही. आणि जरी असते ते सांगण्याची मला भीती वाटत नाही. मी एखादा फॉर्म भरला तर त्यात मी माझा धर्म लिहीत नाही. मी धर्म मानत नाही. याचा अर्थ असा नाही की मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास आहे. माझ्या फेसबुक पोस्ट नंतर माझ्यावर हा आरोप झाला आहे. पण या आरोपामुळे मी अस्वस्थ नाही. मी अस्वस्थ आहे कारण लोकांना माझं म्हणणंच कळलेलं नाही.
माझ्या मते कलेला कोणताही धर्म किंवा जात नसते. कला ही कला असते. मी माझ्या कलेच्या माध्यमातून माझ्या नृत्यातून देवाची पूजा करते. जर मी श्रीकृष्ण किंवा महादेव यांना मानत नसते तर मी माझ्या विद्यार्थ्यांना नृत्य कसे शिकवू शकले असते?

कुडलमनिकम मंदिरात तुम्हाला मिळालेल्या वागणुकीविषयी तुम्ही फेसबुक पोस्ट का लिहिली?
ते आता म्हणत आहेत की केवळ हिंदू कलाकारांना तिथे आपली कला सादर करण्यासाठी अर्ज करता येईल पण मी जेव्हा अर्ज केला तेव्हा मला याची कल्पना नव्हती. मला जर माहित असत तर मी अर्जच केला नसता. मी कोणताही धर्म मानत नाही मग मी अर्ज कसा करू?
हिंदू कलाकार आणि इतर धर्माचे कलाकार असा फरक एखाद्याने करणं किती योग्य आहे?
नक्कीच नाही. मी नेहमीच म्हणते की कलेला कोणताही धर्म नसतो. परमेश्वराचं शुद्ध स्वरूप म्हणजे कला. कलाकार हा कलाकारच असतो. त्याला इतर कोणतीही ओळख लागत नाही. कलेला धर्म मानणारी, तिच्यावर श्रद्धा असणारी मी एकटीच नाही. जगात इतरही असे कलाकार तुम्हाला सापडतील. मग तुम्ही इतर गोष्टीवरून कलाकारांमध्ये भेदभाव का करता? असाल तुम्ही हिंदू कलाकार पण हिंदू धर्मामध्येच अनेक जाती पोटजाती नाहीत का? मी माझ्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणलं आहे त्यांनी कलाकाराच्या गुणांकडे पाहावं कलाकार कोणत्या धर्माचा आहे याच्याशी त्यांचा संबंध नाही.
कुडलमनिकम मंदिरात तुम्ही हिंदू कलाकार नाही हे त्यांना माहित होते तर मग त्यांनी तुम्हाला पहिल्या फेरीत का निवडले?
ही निवड प्रक्रिया जवळपास महिन्याभराहून अधिक काळ सुरु होती. माझी निवड सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर झाली.आणि रीतसर नावही पाठवले गेले. आठवड्याभरानंतर त्यांनी मला फोन केला. आणि मला सांगितले की तुम्ही हिंदू नसल्याने तुम्हाला इथे कार्यक्रम करता येणार नाही. मी म्हणाले सर, मी पूजा करायला मंदिरात येत नाही.
नृत्य सादर करायला येत आहे. त्यांचा पुढचा प्रश्न होता की तुम्ही हिंदू व्यक्तीशी लग्न केले आहे का? तुम्ही हिंदू धर्म स्वीकारला आहे का? मी म्हणलं मी धर्मच मानत नाही तर धर्मांतराचा प्रश्न येतो कुठे? फोन ठेवण्यापूर्वी ते फक्त एवढच म्हणाले माफ करा हिंदू कलाकारांव्यतिरिक्त इथे कोणीही आपली कला सादर करू शकत नाही.

तुम्हाला कलाकार म्हणून हा अपमान वाटला का?
हो नक्कीच. जर ते म्हणाले असते की तुम्ही अतिशय वाईट नृत्य करता तर मी ते मान्य केलं असत. पण केवळ मी हिंदू नाही म्हणून त्यांनी मला नकार कळवला. हे एक कलाकार म्हणून अपमानास्पद आहे.हेच करायचं होतं तर त्यांनी पत्रकात माझं नाव छापण्यापूर्वी करायला हवं होतं. आता ती वेळ आली आहे जेव्हा या वाईट प्रथा बंद करायला हव्यात. मी इस्लामला विरोध केला कारण त्यांचं म्हणणं होतं की नृत्य ही हिंदूंपुरती मर्यादित कला आहे. उद्या कोणी उठून मला सांगितलं की अमुक कला त्यांची मक्तेदारी आहे आणि ती सादर करण्याचा मला अधिकार नाही. तर ते मला मान्य नाही.
अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या आधी आले आहेत का?
असं बघा. मी माझे सगळ्यात जास्त नृत्याविष्कार हे मंदिरातच सादर केले आहेत. या प्रसंगानंतर त्या सर्व मंदिरांकडून मला पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. श्री हैदर अलींनी सांगितलेली गोष्ट मी पुन्हा सांगते. कलेला कोणताही धर्म नसतो. पण दुर्दैवाने आजही गोष्टी बदललेल्या नाहीत.
