बांगलादेश कडून कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली जाते

कोणत्याही बाबतीत व्यक्तीने सुवर्णमध्य काढायला शिकले पाहिजे. टोकाची भूमिका घेणे केव्हाही घातक ठरू शकते. जे व्यक्तीच्या बाबतीत तेच राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे.  १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशमधील अतिरेकी लोकांनी आर्टिसन बेकरी येथे हल्ला केला होता. ज्यात मुख्यत्वे परदेशी नागरिक आणि मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते.  बांगलादेशने याचे उत्तर अतिरेकी हल्ल्यातून दिले. २०१६ पासून अतिरेकी हल्ले कमी झाले असले तरी इस्लामिक गटांच्या हालचाली सुरु आहेत. तरुण कोवळ्या वयाच्या मुलांना शोधून त्यांच्या डोक्यात जिहाद बद्दल संकल्पना भरवून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या करवी छोटे हल्ले करवून दहशत पसरवणे आणि स्वतः नामानिराळे राहणे.  

प्रधानमंत्री श्रीम. शेख हसीना यांनी ४ जुलै २०१६ ला बेकरी हल्ल्यातील मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

 

जरी बांग्लादेश स्वतःला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणत असले तरी इस्लाम वरून राजकारण आणि हिंसा हा त्यांचा जुना इतिहास आहे. २०१६ मध्ये बेकरी वर झालेल्या हल्ल्यानंतर अतिरेकी हल्ले कमी होताना दिसत आहेत. पण तरीही मुस्लिमेतर जनता बांग्लादेशमध्ये सुरक्षित नाही. त्यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. तसेच दहशतवादी संघटनांकडून तरुण लोकांना प्रशिक्षण देणे सुरु आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल तर टोकाचीच करायची हे बांग्लादेशचे ठरलेले आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय मनोवृत्ती तशीच होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि इस्लामिक चळवळ यात तणाव वाढत आहे. कोविड १९, स्थलांतरित कामगार या सर्व मुद्द्यांमुळे या परिस्थितीला खतपाणी मिळत आहे. 

एकूणच बांग्लादेश सरकारने आणि बिनसरकारी संस्थांनी परस्परातील सहिष्णुता कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवे. आणि अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना शिक्षा केली पाहिजे. श्री मुबाशर हसन यांच्या या अहवालात बांगलादेशमधील अतिरेकी कारवायांचे विश्लेषण तसेच त्यावरील उपाय सांगण्यात आले आहेत. हा अहवाल दक्षिण आशिया प्रोग्रॅम इन्स्टिटयूट येथे सादर करण्यात आला. काही जणांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. 

लेखकांविषयी

श्री मुबाशर हसन हे वेस्टर्न सिडनीच्या मानवतावाद आणि विकास विद्यापीठाचे सभासद आहेत. ते बांगलादेशमधील इस्लामिक राजकारण या पुस्तकाचे लेखक आहेत. जिओफेरी मॅक्डोनाल्ड हे बांग्लादेश प्रोग्रॅमचे आंतरराष्ट्रीय रिपब्लिकन संस्थेचे अध्यक्ष आहेत. आता वॉशिंग्टन ला असतात. २०१९ ते २०२१ पर्यंत ते ढाका येथे राहत होते. आणि IRI चा कार्यक्रम ढाका येथे राबवत होते.

Related posts

Leave a Comment