दर १० वर्षांनी आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे गरजेचे नाही.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आधारकार्डवरील माहिती दर १० वर्षांनी अद्ययावत करण्याविषयी कोणतेही पत्रक केंद्राकडे आलेले नाही. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितले की नागरिकांची अचूक माहिती (IDR) मध्ये नोंदवण्यासाठी आधारकार्ड धारकांनी १० वर्षातून एकदा तरी सर्व कागदपत्रे खऱ्या माहितीसह आधार केंद्रात देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची सर्व माहिती अद्ययावत राहील. 

आधारकार्ड बनवून झाल्यावर ठराविक वर्षांनी त्यातील माहिती अद्ययावत करणे हे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असू शकेल. असे श्री राजीव रंजन, श्री दिनेश चंद्र यादव  श्री संतोष कुमार यांचे म्हणणे होते. त्यावर मंत्र्यांनी आधार कार्डातील माहिती अद्ययावत करणेबाबत अजूनतरी कोणतीही सूचना केंद्राकडे आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर दिले.

मनीलाईफ आणि कॅग ने दिलेल्या माहितीनुसार UIDAI कडे असलेल्या माहितीमध्ये काही बनावट बायोमेट्रिक आणि बनावट कागदपत्र आहेत. जी UIDAI ने तपासलेली नाहीत. भारतात डेटा एन्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर चुका सापडतात. जसे की वेगवेगळ्या प्रमाणपत्रावर वेगवेगळी नावे असतात. नावात चूक असते. जन्मतारीख चुकीची असते. इत्यादी. आपल्याकडील ८०% नागरिकांच्या ओळखपत्रावर स्पेलिंग मध्ये चूक असते. उदा. Ramavati नाव असेल तर Ramwati Devi छापलेले असते वैगरे वैगरे.

मागील काही महिन्यात UIDAI ने नागरिकांचे बायोमेट्रिक करण्यासाठी जे शुल्क आकारले होते. त्याचा फेरविचार करण्याचा सल्ला कॅग ने UIDAI ला दिला होता. कारण बायोमेट्रिक यंत्रणा नीट काम करत नव्हती. आणि असे होण्याचे कारणही सापडत नव्हते. बायोमेट्रिक यंत्रणेतील त्रुटींसाठी आपण नागरिकांना जबाबदार धरू शकत नाही. 

वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ३.०४ कोटी बायोमेट्रिक पैकी ७३% लोकांना  बायोमेट्रिक करताना काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे पुन्हा बायोमेट्रिक त्यांना करावे लागले. आधारकार्डावरील माहिती सारखी अद्ययावत करावी लागते याचा अर्थ सुरुवातीला जेव्हा आधारकार्ड साठी नागरिकांकडून माहिती घेतली गेली तेव्हाच ती अपूर्ण किंवा चुकीची घेतली गेली. आधार कार्डाची सेवा सुरु होऊन एवढी वर्ष होऊनही अजूनही बरेच लोक आहेत. ज्यांची माहिती आधार कार्डवर अद्ययावत नाही. 

हे माहित असून सुद्धा CAG च्या म्हणण्यानुसार UIDAI ने पाहिलं आधारकार्ड जारी करून १० वर्ष उलटून गेली असली तरी किती कार्डधारकांच्या फॉर्म मध्ये चुकीची माहिती होती हे सांगता आलेलं नाही. बायोमेट्रिक करताना घेतलेली माहिती आणि जनगणना करताना घेतलेली माहिती एकमेकांशी जुळायला हवी होती. पण ती जुळत नसल्याचे दिसून आले आहे. आधी आधारकार्ड साठी कागदपत्र दिलेल्या लोकांना परत तीच माहिती विचारली तर त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडू शकतो.

  

माहिती अधिकाराच्या अंतर्गत हे दिसून आले आहे की दरवर्षी ८० ते ९० दशलक्ष लोकांच्या आधारकार्डामध्ये सुधारणा UIDAI कडून केली जाते. किंवा बरेच लोक त्यांच्या इतर ओळखपत्रावरील माहिती आणि आधारकार्डवरील माहिती सारखीच ठेवण्यासाठी सुद्धा आधारकार्ड अद्ययावत करतात. या प्रकारात कामानिमित्ताने इतर शहरात जाऊन राहणारे लोक पत्ता बदलायला येतात. लष्करातील लोक, सरकारी नोकरीतील लोक ज्यांच्या बदल्या होतात ते सुद्धा येतात. कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आधार कार्ड अनिवार्य आहे.  एखाद्या क्लबची सदस्यता घ्यायची असल्यास पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना सतत आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करावी लागते. किंबहुना तसे केल्यावाचून पर्याय उरत नाही.

जुलै २०२२ मध्ये राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेकर यांनी लोकसभा सभागृहाला दिलेल्या उत्तरात सांगितले की ३१ मे २०२२ पर्यंत UIDAI ने जवळपास ६० हजार बनावट आधारकार्ड  रद्द केली आहेत. आधार नोंदणी माहिती अद्ययावत करणे साठी पुरेश्या सोयी सुविधा देण्याबाबत श्री चंद्रशेखर म्हणाले. “UIDAI ने नागरिकांना त्यांच्या नावात सुधारणा करणे, जन्मतारखेतील चूक सुधारणे, पत्त्यात बदल करण्यासाठी माय आधार पोर्टल वापरायला सांगितले. हरवलेले आधार कार्ड परत मिळवण्यासाठी नागरिकांनी माय आधार पोर्टल वर https://myaadhar.gov.in /retrieve-eid-uid  या लिंकवर शोध घ्यावा. जवळच्या आधार केंद्रावर जाऊन सुद्धा नागरिक हरवलेल्या आधार कार्डाची चौकशी करू शकतात. किंवा आधार कॉल सेंटर १९४७ ला फोन करून आधारकार्डाची चौकशी करू शकतात. पण त्यासाठी नागरिकांनी त्यांची वैयक्तिक माहिती व्यस्थित  देणे गरजेचे आहे. अपूर्ण माहिती देऊ नये.

Related posts

Leave a Comment