विज्ञान हा एक सांघिक खेळ आहे.

कोणत्याही कामाची एकत्रितपणे केलेली सुरुवात ही फायदेशीर असते. आणि दीर्घकाळ टिकून राहते. स्पर्धेमुळे तात्पुरता यशाचा आनंद मिळतो पण तो दीर्घकाळ टिकणारा नाही. त्यामुळे नेहमी अशा लोकासीबत काम करा ज्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुमच्यासोबत स्पर्धार्ण करायला नव्हे.

फोटो पुरस्कार समारंभात भाषण करताना डॉ सुभाष बाबू

सुभाष बाबू सायंटिफिक डायरेक्टर (इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स इन रिसर्च इंडिया प्रोग्रॅम)
(ICMR NIRT ) यांना चैन्नई इथे ashford चे पदक देऊन गौरवण्यात आले. गेल्या ८२ वर्षात है प्रथमच एका भारतीयाला मिळाले आहे. याच बरोबर डॉ बाबू यांना २०२२ या वर्षीचा ‘Fellow of American society of tropical medicine and hygiene’ हा पुरस्कार मिळाला. त्यांनी या क्षेत्रात जवळजवळ 3 दशके केलेल्या संशोधनाच्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

“आपल्याला सुरुवातीलाच चांगला गुरु मार्गदर्शक मिळणे आवश्यक असते, त्याबाबतीत मी स्वतःला नशीबवान समजतो की माझा मार्गदर्शक मला लवकर भेटला. त्याचप्रमाणे आता मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना मला आनंद होतो आहे.” जर तुम्हाला विज्ञान आणि क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असेल तर माझ्या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे असतील सौ वारियर याना डॉ सुभाष बाबू सांगत होते.

फोटो- Baily K ashford पारितोषिक.

Q. पारितोषिक जिंकणारे तुम्ही पहिले भारतीय आहात. तुमच्या काय भावना आहेत? हे अनपेक्षित होत का ?.

अनपेक्षित नक्कीच नव्हतं. कारण माझ्या आधी माझ्या २ गुरूंनी हे पारितोषिक पटकावलं. मी फक्त त्यांच्या पावलावर पाऊल टाकल. ASTHM म्हणून मला सन्मानित करण्यात आलं. आजपर्यंत फारश्या माहित नसलेल्या क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल मला हे पारितोषिक देण्यात आलं. त्यामुळे माझ्यासाठी ते खास आहे. एका शास्त्रज्ञासाठी हा सर्वात मोठा सन्मान आहे.

Q. वैज्ञानिकांना पारितोषिक मिळणे कितपत फायद्याचे असते. पुरस्कार मिळाल्याचा तुम्हाला तुमच्या कामात कितपत फायदा होतो ?

नक्कीच असे पुरस्कार दिल्याने आम्हाला पुढे काम करण्याची प्रेरणा मिळते, उत्साह येतो. खर तर है एखाद्या जीवनगौरव पुरस्काराप्रमाणे असते. आम्ही आरोग्य क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेरही काम करत आहोत. त्यामुळे हा पुरस्कार मिला ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाची घटना आहे. आपल्याकडे भारतात जागतिक दर्जाच संशोधन केलं जाते हे कळल्यापासून बाहेरील लोक आपल्यासोबत करार करू इच्छितात.

फोटो क्षयरोग हा कुपोषणामुळे होतो. आणि भारतात याचे प्रमाण मोठे आहे.

Q. क्षयरोगासारख्या आजाराबाबत जनजागृती करणं हे तुमचं काम आहे. आकडेवारीनुसार भारतातल्या ४% लोकांना क्षयरोग आहे. भारत आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त का आढळून येतो. ? देशाची आर्थिक प्रगती आणि क्षयरोगासारखा रोग अस्तित्वात असणे यात काही संबंध आहे का ?

नक्कीच या दोघांचा परस्पर संबंध आहे. आणि तो सभोवतालच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी निगडित आहे. क्षयरोग हा हवेतून पसरणारा रोग आहे. जर तुमच्या आजूबाजूची व्यक्ती सतत खोकत असेल आणि तुम्ही त्याच्या सतत संपर्कात येत असाल तर त्या व्यक्तीचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो. भारतामध्ये आपण संसर्गजन्य रोगांना बळी पडतच असतो. कारण वाढती लोकसंख्या, छोट्याश्या जागेत १०-१२ जण एकत्र राहत असतात, सभोवतालचा अस्वर्ण परिसर यामुळे आजार होण्याचा संभव असतो, दुसरे कारण म्हणजे कुपोषण जे भारतामध्ये गरीब लोकांच्या वस्तीत सर्रास दिसून येतं. आपल्याकडे मधुमेह होण्याचं प्रमाणही जास्त आहे. त्याचबरोबर मद्यपान करणे, धूम्रपान करणे अशा सवयीही क्षयरोगाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरतात.

Q.आर्थिक परिस्थिती हा खरंच एवढा मोठा मुद्दा आहे का ?

हो आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे बरेच लोक कुपोषणाला बळी पडतात. यासाठीच आम्ही बरीच वर्षे झगडत आहोत. आणि वास्तविक कुपोषण हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणावर आढळते. त्यामुळे त्यांना पोषक आहार देऊन कुपोषण आटोक्यात आणता येईल का ते आम्ही पाहत आहोत. मायक्रो बॅक्टरीयम टुब्रोकोलोसिस या विषाणूमुळे क्षयरोग होतो. क्षयरोग होण्याचे प्रमाण ४० % जरी असले तरी ज्यांच्या शरीरात विषाणू आहे त्यांना क्षयरोग होईलच असे नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, त्या लोकांना होत नाही. त्यामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणे हे आमचे ध्येय आहे. म्हणजे क्षयरोग होणारच नाही.

ज्यांना विविध प्रकारचे रोग मधुमेह HIV किंवा धुम्रपानासारखी व्यसने आहेत त्यांची प्रतिकारशक्ती कशी वाढवावी याचा आम्ही विविध प्रकारे प्रयत्न करत आहोत.

Q. कुटुंबातील हलाखीच्या परिस्थितीमुळे, कुपोषणामुळे क्षयरोग होतो असे जर असेल तर लहान वयापासूनच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात का ?

गरिबीमुळे क्षयरोग होण्याचा धोका असतोच पण लहान मुलांमध्ये या रोगाची लक्षणे लवकर दिसून येतात. त्यामुळे आपल्याला या समस्येचा सामना करण्यासाठी तयारीतच राहायला हवं सामाजिक आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असली तरी या रोगाचा सामना करण्यासाठी आपण केवळ सामाजिक आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही वैज्ञानिक नवनवे शोध लावत आहोत। जेणेकरून फक्त सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहायला लागू नये.

Q. तुमच्या संशोधनाबद्दल विस्तृतपणे सांगा ?

आपण चांगली वैद्यकीय उपकरणे वापरून कोणत्या मुलाना संसर्ग झालाय किंवा आजार बळावण्याची शक्यता आहे, ते शोधू शकतो. जर आजाराचे निदान लवकर झाले तर आपण उपायही लवकर कक शकतो आणि संसर्गाला वेळीच आळा घालू शकलो. दुसर म्हणजे सामाजिक स्तरावर असे लोक जर आपण शोधून काढले, ज्यांचा संसर्ग क्षयरोगात परावर्तित होऊ शकतो तर आपल्याला पूर्ण ४०% लोकावर उपचार करण्याची गरज नाही. जर तसे करता आलं तर फक्त रोग होण्याची तीव्र शक्यता असलेल्या लोकांनाच उपचार देता येतील. इतरांना नाही ते जास्त सोप्पे आहे. त्यातील ही काही उपकरणे जी आम्ही शोधली आहेत,

फोटो- क्षयरोगाचा उपचार कालावधी ६ महिन्यांचा आहे. एखाद्या रुग्णाला महिने त्याच त्याच गोळ्या घेणे अवघड असते.

Q. क्षयरोगाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी काय करायला हवं? लोकांनी, प्रशासकीय यंत्रणांनी, वैज्ञानिकांनी काय करायला हवं?

लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती व्हायला हवी. क्षयरोगाबद्दलची योग्य माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. लक्षणे दिसायला लागल्यावर ताबडतोब उपचार सुरु करायला हवेत. आणि उपचार पूर्ण करायला हवेत, अर्धवट सोडू नयेत. सरकारने योग्य ते उपचार, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून द्यायला हवीत, वैज्ञानिक म्हणून आमचीही भूमिका महत्त्वाची आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागणारी उपचार पद्धती आम्ही शोधत आहोत.

Q. एका अहवालानुसार दिल्लीमध्ये क्षयरोगाचे रुग्ण जास्त आहेत. वायुप्रदूषण आणि क्षयरोगाचा प्रादुर्भाव यांचा परस्पर संबंध आहे का ?

वायुप्रदूषण आणि क्षयरोगाचा प्रादुर्भाव याबाबतीत खूप कमी संशोधन झालंय. पण एवढं मात्र नक्की की घराबाहेरच्या प्रदूषणापेक्षा आतील प्रदूषण हेच क्षयरोगासाठी कारणीभूत आहे. दिल्लीतील वायुप्रदूषण हेच क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचं महत्वाचं कारण आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर फ्फुसांच्या कार्यक्षमतेवर प्प परिणाम होणार असेल प्रतिकारशक्ती कमी होणार असेल तर क्षयरोग होऊ शकतो.

मुंबईमध्ये सुदधा जास्त लोकसंख्या आहे. तिथे सुद्धा क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. झोपडपट्टी राहणान्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वायुप्रदूषण हे क्षयरोग होण्याचे एकमेव कारण नाही. 

Q. पुरस्कार समारंभाच्या वेळी ASTHM च्या अध्यक्षांनी तुम्ही डायबेटीस टाईप २ आणि Anti TB थैरेपीच्या संशोधनाबद्दल सांगितल. डायबेटीस टाईप २ आणि Anti TB उपचार पदहत यातील फरक सांगाल का ?

टाईप २ डायबेटीस हा भारतात पसरतो आहे. आणि क्षयरोगाच्या संसर्गात सुद्धा भारत प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे ही खूपच मोठी अडचण आहे. मधुमेहामुळे क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असते. ज्याना मधुमेह आहे त्यांना उपचार घेतल्यानंतर सुद्धा परत क्षयरोग होऊ शकतो. डायबेटीस असेल तर टीबी वरील उपचार परिणाम करत नाहीत. परत टीबी होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

मधुमेह असणाऱ्यांनी क्षयरोग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आम्ही लोकांना हे समजावून सांगतो की मधुमेह आणि क्षयरोग याचे आपल्या शरीरावर एकत्रित काय परिणाम होतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते, आणि आपण ती कशी वाढवू शकतो. उदा मेटफोर्मीन या मधुमेहावरील औषधामुळे क्षयरोग आटोक्यात येऊ शकतो.

फोटो- National TB Elimination programme अंतर्गत क्षयरोगाविषयी जनजागृती गेल्या काही वर्षापासून सुरु आहे..

Q. Helminth Infections च्या क्षेत्रातील संशोधनाबद्दलही पुरस्कार सोहळ्यात सांगितलं गेलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहिती प्रमाणे भारतातील २४० मिलियन मुलांना Parasatic Intestenial Worm हा संसर्ग होऊ शकतो. परत आर्थिक सामाजिक परिस्थिती गरिबी याला कारणीभूत आहेत का ?

आम्ही या विषयावर खूप संशोधन केलं. अशा प्रकारचा (आतड्याचा संसर्ग ) आम्हाला गरीब मुलांमध्ये आढळून आला. नाकावाटे तोंडावाटे हा संसर्ग होण्याची शक्यता असते. जिथे शौचालयात स्वच्छता पाळली जात नाही. किंवा घराबाहेर शौचालय असते किंवा उघड्यावर व्यवस्था असते. तेव्हा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

हा संसर्ग मुलांसाठी खूप भयानक आहे. त्यामध्ये त्यांची वाढ खुंटते. ऍनिमिया (रक्ताची कमतरता), होऊ शकतो. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वाढही खुंटते. याला आम्ही गरिबीचे आजार म्हणतो.

Q. या संसर्गजन्य रोगांचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत अजून बराच काळ जावा लागेल का ?

हो पण आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. National TB elimination programme अंतर्गत आम्ही 0 हो/ प क्षयरोगाविषयी जनजागृती करत आहोत..

Q. ते शक्य आहे का ?

याला वेळ लागण्याची शक्यता आहे. जगभरातील टीवीच्या केसेस पैकी २७% भारतात आहेत. है लगेच संपणारै काम नाही. त्यामुळेच आम्ही आमचे ध्येय गाठायला जोमाने काम करत आहोत.

Q. भावी शास्त्रजांना काही सांगू इच्छिता का ?

मला मिळालेलं यश हे माझ्या टीम मुळे मला मिळाले आहे. आमच्या सहकार्यामुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे मिळालं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मला कामात मदत केली त्या सर्वामुळे मिळालं आहे. विज्ञान हे एका सांघिक खेळासारखं आहे. त्यामुळे एकत्रितपणे काम करणे फायद्याचे आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. स्पर्धेमुळे तात्पुरत्या यशाचा आनंद मिळतो. पण तो दीर्घकाळ टिकणारा नाही. अशा लोकांसोबत काम करा ज्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल. तुमच्यासोबत स्पर्धा करायला. नव्हे. आपल्याला करियर मध्ये उत्तम मार्गदर्शक मिळणं महत्वाचं असत. त्याबाबतीत मी नशीबवान आहे.

Q. तुम्ही कोणाचे मार्गदर्शक व्हाल का ?

हो मार्गदर्शक व्हायला मला नक्कीच आवडेल, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी माझ्या संस्थेचे दरवाजे कायम उघडे असतील.

Related posts

Leave a Comment