घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाहीत. हा आपला गैरसमज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.
आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपऱ्यात ठेवावे.
आपल्या शयनकक्षात खरकटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.
कुटुंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.
कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.
घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.
शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशीजवळ लाल चंदन ठेवून झोपावे.
जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.
दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्य द्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.
घरातील जिन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.
दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करुन झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.
नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.
घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद शिंपडावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.
जर संतती सुख नसेल, मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्य प्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.

पाण्याने येतो घरात पैसा
कधी-कधी कितीही मेहनत घेतली तरी घरात पैसा टिकत नाही किंवा आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो. त्यासाठी घरातील पाण्याचा प्रवाह ही जबाबदार असू शकतो. पाहू पाण्यावर काय उपाय केल्याने पैसा येतो.
घरात अंडरग्राउंड वॉटर टँक किंवा बोरवेल उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेत असलं पाहिजे.
घरात उत्तर-पश्चिम दिशेला वॉटर टँक असल्यास त्याला कवर करावे. येथे धातूच्या कुंड्यात गोल पानं असलेलं झाड लावून ठेवावे.
स्थिर पाण्याने धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून डेकोरेशनसाठी ड्राइंग रूममध्ये स्थिर पाण्याचे पॉट ठेवण्याऐवजी फाउंटेन लावले तर योग्य राहील.
जर घरात पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून पूर्वीकडे असेल तर पैशात वाढ होईल.
घरातील सर्व नळ व्यवस्थित असले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या लीकेजमुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.
