पाकिस्तानी युद्ध-नौका गाझीची पारध करणारे भारतीय नौकाधिपती नीळकंठ कृष्णन !

indian-naval-officer-nilkanth-krishnan

१९७१ च्या बांगलादेश युद्ध-ात भारतीय नौदलाने पाकिस्तानची गाझी पाणबुडी बुडवून आणि कराची धक्क्यावर (बंदरावर) छोट्या; पण वेगवान क्षेपणास्त्र नौकांनी आक्रमण करून अपूर्व कर्तव्याचे (कामगिरी) पालन केले (बजावले) होते.

नौदलासाठी छोट्या क्षेपणास्त्र नौका अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, हे बांगलादेश युद्ध-ाच्या काही वर्षे आधीच नौदल विकासाचा आराखडा सिद्ध- करणाऱ्या नावाधिपती (अॅडमिरल) कृष्णन यांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी संरक्षण खात्याकडे या नौका विकत घेण्याची जोरदार प्रशस्ती (शिफारस) केली होती. एवढेच नाही, तर पुढे या नौका विकत घेण्यासाठी प्रारंभिक बोलणी त्यांनीच रशियन आरमाराचे प्रमुख ग्रँड अॅडमिरल गॉर्शकॉव्ह यांच्याशी केली होती. त्यानंतर मुंबईत नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख असतांना त्यांनीच नौदलाकडून या बोटी वापरण्याचा सराव करून घेतला होता. त्याचा लाभ पुढे कराची बंदरावरील आक्रमणासाठी झाला.

तीच गोष्ट पाकिस्तानच्या गाझी पाणबुडीची ! १९७१ च्या युद्ध-ात विक्रांत ही भारताची विमानवाहू नौका या पाणबुडीचे लक्ष्य असणार, हे कृष्णन यांनी ओळखले होते. त्यावेळी ते विशाखापट्टण येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते आणि विक्रांत त्यांच्याच विभागात होती. विक्रांतला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांनी तिला विशाखापट्टण धक्यापासून अनेक किलोमीटर दूरबंगालच्या उपसागरात नांगरून ठेवले होते; पण आभास मात्र असा निर्माण केला होता की, ती विशाखापट्टण धक्क्यातच आहे. हेतू हा की, विक्रांतचा शोध घेत गाझी विशाखापट्टण धक्क्यात यावी. त्यांचे हे डावपेच यशस्वी झाले. गाझी विशाखापट्टण धक्क्यात आली आणि तेथे आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांची शिकार झाली.

नावाधिपती कृष्णन हे युद्ध- डावपेचांत तज्ज्ञ असलेले नौदल अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्ध-ात जर्मन नौदलाशी टक्कर घेणाऱ्या अचिलेस (जी पुढे आयएनएस दिल्ली या नावाने भारतीय नौदलात सम्मिलीत झाली) आणि सफॉक या ब्रिटिश युद्ध-नौकांवर त्यांना थेट युद्ध-ाचा अनुभव मिळाला होता. त्यामुळे पुढे भारतीय नौदलाचा विकास आराखडा सिद्ध- करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. तेव्हा त्यांनी नौदलात पाणबुड्या, विमानवाहू नौका आणि झटपट प्रहार करू शकणाऱ्या नौका आणण्यास प्राधान्य दिले.

बांगलादेशाच्या युद्ध-ाची पूर्ण आणि रीतसर आखणी

बांगलादेशाचे युद्ध- हे भारतीय नौदलाचे ठळक आणि दृष्टीस भरावे, असे पहिले काम ! एक कराची धक्क्यावरील आक्रमण सोडले, तर नौदलाला हे युद्ध- प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातच लढावे लागले.बांगलादेशामधून पळून जाऊ पहाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा सागरी मार्ग रोखणे, चितगाव धक्यात भारतीय सैन्य आणि युद्ध- सामग्री नौकेतून उतरवणे, या सैन्याला विक्रांतवरील विमानांकडून हवाई संरक्षण पुरवणे आदी महत्त्वाचे काम नौदलाला करावे लागले. त्याची पूर्ण आणि रीतसर आखणी नौकाधिपती कृष्णन यांनी केली होती. त्यामुळेच पूर्व पाकिस्तानातील पाक लष्कराचे प्रमुख महासेनापती (लेफ्टनंट जनरल) नियाझी शरण आले, तेव्हा त्यांची शरणागती सेनापती (जनरल) अरोरा यांच्यासह नौदलाकडून नावाधिपती कृष्णन यांनीही स्वीकारली होती.

भारतीय नौदलाच्या आधी पाकिस्तानी नौदलाने पाणबुड्या मिळवल्या होत्या. त्यामुळे नौदल विकासाचा आराखडा सिद्ध- करणाऱ्या कृष्णन यांना बरीच चिंता पडली होती. सागरी युद्ध-ात पाणबुड्या अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे त्यांचा वेळीच शोध घेऊन नाश करणे आवश्यक असते. त्यासाठी पाणबुडी शोध आणि विनाशाचे तंत्र अवगत करणे आवश्यक होते.

दुसऱ्या महायुद्ध-ातील पाणबुडी युद्ध-ाचा अनुभव असल्यामुळे कृष्णन यांनी यावर सांगोपांग विचार करून नौदलात पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर समाविष्ट करण्याची प्रशस्ती (शिफारस) केली आणि भारतीय नौदलात सुप्रसिद्ध- अशा ‘सी किंग हेलिकॉप्टरचा समावेश झाला.

 श्री. दिवाकर देशपांडे, ए सेलर्स स्टोरी,

लेखक ः व्हाइस अॅडमिरल एन. कृष्णन

Related posts

Leave a Comment