पुण्यस्मरण – स्वातंत्र्यवीर सावरकर : एक अविस्मरणीय पुरुषार्थ !

swatantryaveer-savarkar-unforgettable-individual

हिंदू समाजाचे संघटन हा, तर स्वातंत्र्यवीरांचा ध्यास होता. अर्थात याबाबतचा त्यांचा विचार जेवढा मूलगामी होता त्यापेक्षाही तो कमालीचा व्यापक व चौफेर होता. हिंदू समाजाला श्रुतिस्मृतिपुराणोक्त काळातून अद्ययावत काळाकडे वेळ पडल्यास हाडाची कांडे करून आणलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचर्चा प्रवर्तते’ हे जेवढे खरे आहे तद्वतच शास्त्रचर्चा केल्याशिवाय राष्ट्रधारणेची व रक्षणेची सिद्ध-ताही अचूकतेने होऊ शकणार नाही हेही तात्यारावांनी वेळीच व सावधानतेने हेरलेले होते.

– सुरेश सावंत, भाजप नेते, पनवेल

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच जणूकाही अचाट साहस, अफाट धाडस, अतुलनीय देशप्रेम, जाज्ज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अनिवार स्वातंत्र्याकांक्षा, स्वदेश संरक्षण सिद्ध-तेची कमाल दूरदृष्टी, अविचल ध्येयनिष्ठा, प्रखर विज्ञाननिष्ठा, क्रियाशील वैचारिकता, प्रबोधनाचा प्रोत्साही कैवारी, अंधश्रद्ध-ांचा हाडवैरी, इतिहासाभिमानी, पण त्याचवेळी आत्यंतिक सुधारणावादी अशा विपुल व लक्षणीय गुणसंपदेची खाणच होय. अर्थात हे सर्व जरी निर्विवादपणे सत्य असलं तरी या सर्वांवर मात करणारं सावरकरांचं म्हणून एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्वंकष दृष्टिकोनातून अभ्यासांती व सखोल विचारांती मांडलेला ठोस, ठसठशीत, सार्थ, न्याय्य, वस्तुनिष्ठ व रास्त अशा प्राणवत ‘हिंदुत्वा’ चा विचार की, जो स्वीकारल्याशिवाय ंिहदुस्थानचे खरेखुरे हित साधले जाणे निव्वळ अशक्यप्रायच होय. मनोमन पटलेल्या या विचारसरणीचा त्यांनी सातत्याने व अखंडपणे प्रचार आणि प्रसार केला. याच कारणास्तव स्वातंत्र्यवीराचा उल्लेख होताच त्याचा त्या ‘डोळस हिंदुत्वा’चा विचार असा अलग बाजूला काढता येणारच नाही इतके ते त्या विचारांशी समरस झालेले असल्याने ‘सावरकर’ म्हणजे ‘जाज्ज्वल्य व प्रखर हिंदुत्व’ व ‘हिंदुत्व’ म्हणजेच ‘तात्याराव सावरकर’, असं हे अभिन्नत्व अन्य ठिकाणी क्वचित पाहायला मिळते. यास्तव स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक  ‘चालतं बोलतं, सार्थ हिंदुत्वच होय!’ असं म्हटलं, तर ते वावगे ठरणार नाही.

उदंड झालेल्या देवळांच्या संदर्भात एके ठिकाणी तात्याराव सावरकर म्हणतात, ‘‘असलेल्या मंदिरांचे रक्षण करण्याची शक्ती ज्यांच्यात नाही, त्यांना आणखी नवीन देवळे बांधण्याचा अधिकारच नाही. ही शक्ती निर्माण करणे हा या (पतितपावन) मंदिराचा उद्देश आहे. आज केवळ महार, चांभार ंिकवा अस्पृश्य समाज तेवढा पतित नसून, परतंत्र असलेला, परक्यांचा दास झालेला सारा हिंदू समाजच पतित आहे. या साऱ्या पतित हिंदू राष्ट्राचा जो उद्ध-ार करील त्यालाच मी खरा ‘पतितपावन’ म्हणेन. आम्हा हिंदूंचे जे जे गेलेले आहे, ते सर्व जो परत मिळवून देईल त्यालाच मी ‘पतितपावन’ म्हणेन.’’ हिंदू समाजाच्या पुरुषार्थाचे खच्चीकरण करणाऱ्या सप्तबेड्या म्हणून ‘मंदिरप्रवेशबंदी, स्पर्शबंदी, शुद्ध-बंदी, व्यवसायबंदी, रोटी-बेटी बंदी, वेदोक्तबंदी आणि समुद्रबंदी’ या बेड्यांचा केवळ उल्लेख करूनच स्वातंत्र्यवीर थांबले नाहीत, तर त्या करकचून घट्ट बांधलेल्या कठीण बेड्या तोडायला त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन आपण ‘कर्ते सुधारक’ असल्याचा एक प्रकारचा दिमाखदार प्रत्ययच आणून दिला. १९३१ सालच्या सुरुवातीला संबंधित पतितपावन मंदिराचे बांधकाम पूर्ण होताच फाल्गुन शुद्ध- पंचमीला म्हणजेच दिनांक २२ फेब्रुवारी १९३१ या दिवशी या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. अर्थात ऐनवेळी तत्कालीन ब्रह्मवृंदांनी भागोजीशेट कीर यांना पूजेचा अधिकार नाही असा मुद्दा उपस्थित करून खोडा घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, पण सावरकरांना या सर्व संभाव्य अडथळ्यांची पूर्ण कल्पना असल्याने या संकटावरही मात करण्याची जय्यत तयारी आधीपासूनच करून ठेवल्याप्रमाणे तेथे उपस्थित राहिलेले दुसरे खास प्रगल्भ शास्त्री म्हणजे वेदशास्त्रसंपन्न गणेशशास्त्री मोडक आणि त्यांचे साहाय्यक यांनी सावरकरांच्या सूचनेनुसार मग अत्यावश्यक ते पौरोहित्य केले व भागोजीशेट कीर यांच्याच हस्ते वेदोक्त पूजा करवून आपला वज्रनिर्धार कृतीशीलतेनेच पुरा करून दाखविला.

स्वांतत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणीच. अर्थात १८८३ साली जन्मलेल्या तात्याराव सावरकरांना लहानपणापासूनच हौतात्म्याचे विलक्षण आकर्षण. क्रांतिकार्याची ऊर्जा त्यांना प्राप्त झाली तीच मुळात चापेकरबंधूंना झालेल्या अन्याय्य फाशीतूनच. याच कारणास्तव सावरकर नेहमीच म्हणत असत की, चापेकरांच्या फाशीतूनच, तर आम्ही जन्माला आलो. ब्रिटिशनिष्ठ काँग्रेसला ब्रिटिश घाबरणे सुतराम शक्य नाही हे सावरकरांच्या दूरदृष्टीने वेळीच हेरले होते. काँग्रेसच्या मवाळ राजकारण्यांशी सावरकरांचे सूत जमणे शक्यच नव्हते. याच कारणास्तव अंतिमत: व परिणामत: ‘अभिनव भारत संघटने’ सारख्या अलौकिक कार्याचा व्याप त्यांनी आत्मविश्वासाने व अविरत कार्यनिष्ठेने यशस्वीरीत्या सांभाळला. या संघटनेचे एक खास व लक्षणीय वैशिष्ट्य असे की, त्यात अपरिहार्य त्या दशहतवादाबरोबरच सैनिकीकरण व परराष्ट्रीय राजकारण या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयावरही भर दिला जायचा व त्यानुसार सर्वच संबंधितांचा कसून अभ्यास करवून घेतला जायचा. सैनिकीकरणावर उहापोह करताना सावरकर स्पष्ट करतात, ‘‘सैनिकीकरण म्हणजे इंग्रजांच्या हाताखालील हिंदुस्थानात असलेल्या हिंदी सैन्यात क्रांतीचा प्रचार वा फैलाव करणे आणि शक्य तेवढ्या क्रांतिकारकांनी सैन्यात भरती होणे होय. आमचे परराष्ट्रीय राजकारण म्हणजे इकडे ब्रिटिशांचे हाती आलेले ंिहदी सैन्य पोखरून ठेवण्याचे कार्य करीत असतानाच त्याचवेळी तिकडे विशेषत: युरोप आणि जपानमध्ये इंग्रजांच्या शत्रुस्थांनी असलेल्या ंिकवा किमानपक्षी इंग्रजांचे मित्र नसलेल्या राष्ट्रांतून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यार्थ प्रचार करून त्या महत्त्वाच्या कार्यार्थ तेथील जनतेची व सत्ताधारी वर्गाची सहानुभूती प्राप्त करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणे होय. ‘द्रष्टे सावरकर’ म्हणूनच या विचारसरणीला दाद देणे अपरिहार्य ठरत नाही काय?

आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले ते ‘अंिहसे’च्या लढ्याच्या प्रभावामुळेच मिळाले हा जो तत्कालीन काँग्रेसचा प्रभावी प्रचार चालायचा त्याचा रोखठोकपणे समाचार घेण्यासाठी २६ जानेवारी १९५० या प्रजासत्ताक दिनीच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा आढावा घेणारे एक महत्त्वाचे निवेदन सावरकरांनी प्रसिद्ध- केले. त्यात ते म्हणतात, ‘‘ही क्रांती रक्तहीन तर अजिबातच नव्हे. जणू काही आपले (अमोल) रक्त वाचावे म्हणून, ब्रिटिशांनी या देशातून काढता पाय घेतला!’’ अशा थाटात ही क्रांती रक्तहीन असल्याचे भासविण्यात येत आहे. आता हे खरे असेल की, हे भासविण्यात येत आहे. आता हे खरे असेल की, हे भासविणाऱ्या देशभक्तांनी व्यक्तिगत स्तरावर रक्ताचा एक थेंबही सांडला नसेल, पण संपूर्ण देशाचे काय? एकट्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात हजारो सैनिक व नागरिक लढता लढता मृत्युमुखी पडले. गेल्या पन्नास वर्षांत फासांचे दोर आपल्या हुतात्म्यांच्या ताज्या रक्ताने भिजत राहिले. त्यात पुण्याच्या चापेकरांपासून लंडनच्या उधमंिसहांपर्यंत अनेक होते.’’ खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच तर ५० वर्षांच्या दोन जन्मठेपींची काळ्यापाण्याची शिक्षा झाली व ती त्यांनी ज्या अंदमानात क्रूरकर्मा बारीसाहेबाच्या कडक व जबरदस्त कठोर देखरेखीखाली उपभोगली त्या अंदमानातील ते स्थळ आज असंख्य देशप्रेमींचे वंदनीय व आदरणीय असे प्रेरणास्थळ म्हणून मान्यता पावले आहे. ‘माझी जन्मठेप’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित पुस्तक म्हणूनच तर कोटी कोटी देशाबांधवांना ‘गीते’ समान वंदनीय वाटते.

ंिहदू समाजाचे संघटन हा, तर स्वातंत्र्यवीरांचा ध्यास होता. अर्थात याबाबतचा त्यांचा विचार जेवढा मूलगामी होता त्यापेक्षाही तो कमालीचा व्यापक व चौफेर होता. ंिहदू समाजाला श्रुतिस्मृतिपुराणोक्त काळातून अद्ययावत काळाकडे वेळ पडल्यास हाडाची कांडे करून आणलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचर्चा प्रवर्तते’ हे जेवढे खरे आहे तद्वतच शास्त्रचर्चा केल्याशिवाय राष्ट्रधारणेची व रक्षणेची सिद्ध-ताही अचूकतेने होऊ शकणार नाही हेही तात्यारावांनी वेळीच व सावधानतेने हेरलेले होते. याबाबत त्यांचे विचार इतके सुस्पष्ट आहेत की, त्यांच्यामते ंिहदू समाजाचे एकसंधत्व वा संघटन म्हणजे आहेत तसेच ंिहदूंना ठेवून त्यांची मोट बांधावी अशी त्यांची धारणा नव्हती. उलट ंिहदू समाज हा अंधश्रद्ध-ेच्या काळ्याकुट्ट अंधाराचा त्याग करून त्यातून बाहेर पडून डोळस विज्ञानाच्या तेजात न्हाऊन कसा निघेल व अखिल जगतालाच मार्गदर्शक कसा ठरू शकेल यासाठीच विचारवंतांनी व नेत्यांनी सदासर्वदा प्रयत्नशील राहावे म्हणून त्यांनी आपले सर्व शब्दभांडार उधळले व लेखणी झिजवली. अंदमानमध्ये कठीतम व शरीराची चाळण करणाऱ्या यमयातना भोगत असताना मुसलमानांची कट्टर धर्मांधता पाहून शुद्ध-ी चळवळीचा विचार त्यांच्या मनात केवळ स्फुरलाच नाही, तर तेथेच व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी त्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. ‘आसिंधु ंिसदुपर्यन्ता यस्य भारतभूमिका, पितृभू पुण्यभूश्चैव स वै ंिहदूरितिस्मृत:’ ही अत्यंत तेजस्वी व्याख्या त्यांना स्फुरली. अवघा ंिहदू समाज, त्याची सुसंस्कृत संघटना, त्याचे परमवैभव व त्याचा विजयोत्सव हाच तर त्यांच्या एकूण जीवनशैलीचा मूलाधार होता.

Related posts

Leave a Comment