भगवंत हा परिपूर्ण आहे. तोच एक पूर्ण आहे. त्याच्या आपण जितके जवळ जाऊ तितके त्याचे गुण आपल्यात उतरतील. आपल्याला यश, श्री, धन, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य,औदार्य प्राप्त होईल. ही भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा आहे. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विकसित होणे, उत्क्रांत होणे हा निसर्गनियमच आहे. म्हणून प्रत्येकाने सतत विकासाची कास धरावी.
आजकाल व्यक्तिमत्त्व विकास हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेक लोक व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे आक्रमकता अंगी बाणवणे, समोरच्याला खाऊन टाकणे असे समजतात. या विषयाशी संबंधित अनेक कोर्सेस सध्या चालतात. ते चूक नाहीत पण या ठिकाणी आपण भारतीय जीवनधारणेतून व्यक्तिमत्त्व विकास म्हणेज काय हे बघू या.
भारतीय अध्यात्म ंिकवा समाजधारणा ंिकवा मूल्यपरंपरांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास या विषयाची आजवर कधीही लक्षात न आलेली दुसरी बाजू आपल्या आपल्या लक्षात येते.
संपूर्ण भारतीय आध्यात्म परमेश्वराशी एकरूपता साधण्यावर भर देते. भगवंत हा परिपूर्ण आहे. तोच एक पूर्ण आहे. त्याच्या आपण जितके जवळ जाऊ तितके त्याचे गुण आपल्यात उतरतील. आपल्याला यश, श्री, धन, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य,औदार्य प्राप्त होईल. ही भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा आहे.
विकास ही एक निरंतर प्रक्रीया आहे. विकसित होणे, उत्क्रांत होणे हा निसर्गनियमच आहे. म्हणून प्रत्येकाने सतत विकासाची कास धरावी. विकसित व्यक्ती समाजात यशस्वी म्हणून गणली जाते. त्याच्याकडे असलेल्या भौतिक संपत्ती-साधनांपेक्षा त्याचा आत्मविश्वास व विनयशीलपणामुळे तो उठून दिसतो. म्हणून प्रत्येकाने आपले मूल्यमापन स्वतःच करून आपल्या गुणदोषांचा ताळेबंद मांडावा. स्वयंस्फूर्तीने आंतरिक परिवर्तन घडवून आणावे. ते नैसर्गिक व कायमस्वरूपी होऊ शकते. विकसित व्यक्ती उठून दिसते ती तिच्या हवेहवेसे वाटणाऱ्या लोभसपणामुळे. असं माणूस आपल्या सहवासात असावं असं प्रत्येकाला वाटते. म्हणून सुरूवात आपल्या पासूनच करावी. व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक वर्ग आजकाल उपलब्ध आहेत. पण त्यांचा परिणाम तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नाहीसा होतो. शिकवलेल्या गोष्टी बाहेरून लावलेल्या मेकअपप्रमाणे काही दिवसांनी फिकट होतात व शेवटी मूळ स्वभाव शिल्लक राहतो.
तेव्हा सनातन भारतीय समाजधारणेनुसार व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय, हे आपण बघू या.
१) लवचिकपणा – हा आपण प्रथम क्रमांकाचा मानला आहे. कारण मूल्ये, सिध्दांत, तत्त्वे यांचा आपण स्वीकार आपल्यासाठी व आपल्यापुरता असतो. त्याला सर्वांनी मान्यता द्यावी असा हट्ट धरता कामा नये.
२) आधुनिकता – ङ्कअधुनाङ्ख या संस्कृत शब्दापासून आधुनिक हा शब्द आला असून अधुना म्हणजे ङ्कआताङ्ख ंिकवाङ्क सांप्रतकाळीङ्ख! सध्या प्रचलित असलेली वेषभूषा, जीवनपध्दती याप्रमाणे आपले आचरण असावे. त्यावर भूतकाळाचे, अंधविश्वासाचे ओझे नसावे. वर्तमानकाळावरच भविष्य आधारलेले आहे. काही जीवनसत्ये मात्र कालातीत असतात. याचे भान ठेवावे. ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही संकेत असतात. त्यांचे यथाशक्ती पालन करावे.
३) प्रामाणिकपणा – आपले आचरण हे नेहमीच पारदर्शक असावे. दिलेला शब्द, आश्वासन, व वेळ पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. शक्य नसेल तर आधीच कल्पना द्यावी. वेळ मारून नेण्यासाठी खोटे बोलू नये.
४) भाषाकौशल्य – आपले विचार अचुक शब्दांत, संयमी भाषेत व कमी वेळात मांडता यायला हवेत. तसेच समोरच्या व्यक्तिचे म्हणणे काय आहे हे शांतपणे समजून घेऊन त्याच्याशी सहमती वा असहमती, नम्रपणे दाखवावी.
५) सेवाभाव – प्रत्येक प्राणीमात्रांत परमेश्वराचा अंश आहे. तेव्हा सर्वांची सेवा,मदत करावी. मदत ही शारीरिक,मानसिक,आर्थिक, ( काया-वाचा-मने) असू शकते. ती आपल्या ऐपतीनुसार करावी. त्यात परोपकार केल्याचा भाव नसावा तर सेवाभाव असावा. ती परमेश्वराची अर्चनाच आहे.
६) कला – कलेची साधना करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यास कलेचे रसग्रहण करता येईल एवढी जुजबी माहीती असू द्यावी कलेने मन समृध्द होते. जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मानसिक आरोग्य लाभते.
