ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यापेक्षाही त्यामध्ये भाग घेणे अधिक महत्त्वाचे असते हे आधुनिक ऑलिंपिकचे जनक पेरेझ श बॅरन डी कुबटी॑न यांनी सांगितलेले तत्व भारताने आजपर्यंत तंतोतंत पाळले आहे. सव्वाशेपेक्षा जास्त जणांचे पथक पाठवणाऱ्या भारताला आजपर्यंत एकाही स्पर्धेत पथकांची संख्या दोन आकडीही गाठता आलेली नाही. यंदा दोन आकड्यांचा पल्ला गाठला तर ती आजपर्यंतची विक्रमी कामगिरी असेल. राजवर्धन सिंग राठोड याने २००४ च्या ऑलिंपिकमध्ये मिळवलेले रौप्यपदक आणि २००८ च्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्रा याने मिळवलेले ऐतिहासिक सुवर्णपदक ही दोन्ही पदके भारताच्या नेमबाजी क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरली आहेत. त्यानंतर नेमबाजीत भाग घेणाऱ्यांची संख्या भरपूर…
Read More