आता कोविड 19 ची दूसरी लाट ओसरली आणि निर्बंध कमी झाले म्हणून लोकांनी निःश्वास टाकला आहे पण ह्या कोरोनामुळे एकूणच जीवनाची वीण उसवल्यासारखी झाल्याचे सतत जाणवते. दीड वर्षांपूर्वी जेव्हां कोरोनाची चर्चा सुरू झाली तेव्हां कोरोनाचे अक्राळविक्राळ रूप भारतीयांना कळले नव्हते पण मार्च २० मध्ये कोरोना भारतात आला आणि राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सर्वांना त्याची दाहकता जाणवू लागली. लॉकडाऊनचा प्रभाव दैनंदिन जीवनावर पडलाच पण स्थलांतरित मजूर व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची दैना उडाली. वाहतूकीची साधने बंदच झाल्याने स्थलांतरित मजूर कुटुंबकबिल्यासह आपल्या गावाकडे पायीच चालू लागले तर अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्यांंना १५…
Read More