मेजर ध्यानचंद म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात असलेले गोल नोंदविण्याचे मशीनच आहे हे उद्गार सामान्य हॉकीपटूचे नसून क्रिकेट क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्व सर डॉन ब्रॅडमन यांचे आहेत. त्यांच्या या शब्दातच जागतिक स्तरावर हॉकीचे जादूगार म्हणून बीरूद लाभलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय कौशल्याचा प्रत्यय येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १८५ सामन्यांमध्ये ५७० गोल करणे ही त्यांची खरोखरीच अद्वितीय कामगिरी आहे. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावरच भारताने हॉकीत सुवर्णयुग निर्माण केले होते. आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अलीकडेच हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न…
Read More