– सतीश सिन्नरकर परवाच सामाजिक क्षेत्रात देशभर वावरणाऱ्या एका वयस्क व्यक्तीची भेट झाली. हे सतत मुंबईचा उल्लेख बंबई करत होते आणि ऐकणाऱ्यांमध्ये कोणीच त्यांना अडवत नव्हते. शेवटी मी त्यांना मध्येच थांबवून मुंबई म्हणण्याची विनंती केली. ती त्यांनी लगेच स्वीकारली पण आजुबाजूच्या इतर अमराठी लोकांना मात्र तो माझा आगाऊपणा वाटला. अशीच एक भेट मुंबईतील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली. या संस्थेत २५०००विद्यार्थी आहेत. सर्व इंग्रजी माध्यम. मराठी शाळा होती. पण हळूहळू योजनापूर्वक बंद केली. पुरेसे विद्यार्थी नाहीत असे सांगत व स्थानिक मराठी अभिमानी नेत्यांचे ‘सहकार्य’ घेत दरवर्षी एकेक…
Read MoreTag: राजभाषा
मराठी भाषेची उपेक्षा
मराठी भाषेचा हा मागासलेपणा मात्र मुंबई महानगर पालिकेतील गुजराती, कन्नड, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फारच लवकर पडला. त्यामुळे मराठी भाषेला फालतू ठरवून दुसरी भाषा म्हणून या शाळांनी हिंदीसारख्या प्रगत भाषेचा अंगिकार केला व मराठीला हुसकून लावले. मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळाही हिंदीला पसंत करतात. असा हा महाराष्ट्रातल्या अन्य भाषांचा, भाषिकांचा महिमा आहे. अन्य प्रांतात त्या – त्या भाषांचा, मातृभाषांचा व इंग्रजीचाच अभ्यास होतो. उत्तर भारतात हिंदी – इंग्रजी व दक्षिण भारतात मातृभाषा आणि इंग्रजी अशी पसंती असते. महाराष्ट्रात इंग्रजी, हिंदी थोडीफार जागा मिळालीच तर मराठीला. – सुरेश सावंत भाजप नेते, पनवेल…
Read Moreमराठी आणि नवीन इंग्रज
– शरद मेस्त्री राष्ट्रीय एकात्मता ही केवळ महाराष्ट्रनेच राबवायची गोष्ट नाही. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मता एक भोंगळ गोष्ट आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने सतत लक्षात ठेवले पाहिजे. या देशातील सर्व स्तरावरील सत्ताधीश हे स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यातच गर्क आहेत; तेवढे ते मतलबी आहेत. त्यांना फक्त नेतृत्व टिकावयाचे आहे. एखाद्या तत्त्वाचा अंगीकार करणारी ही मंडळी नाहीत. वारा फिरेल तशी पाठ फिरवून मतलब साधणारी ही मंडळी आहेत. आणखी दहा वर्षांनी दुर्दैवाने खेळ पाहण्यापेक्षा आजच मराठी भाषेच्या अध्यापनाचा, माध्यमाचा आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती…
Read Moreमराठी भाषा दिन ( भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल! )
तांत्रिक आणि व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो किंवा नाही याला निश्चितच महत्त्व आहे. एखादी भाषा अभिजात असली, तरी ती लोकव्यवहारातून हद्दपार होणे शक्य असते. संस्कृत आणि लॅटिन भाषांची आज अशी अवस्था आहे. मराठी ही या प्रकारची अभिजात भाषा नाही. ती अभिजात असून, आजही लोकव्यवहारात टिकून राहिलेली भाषा आहे. खरे तर जी भाषा कालानुरूप स्वतःत योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकते, रूप पालटू शकते तीच टिकते. मराठीची अशी परिवर्तने झाली. तिने आपली रूपे पालटली. ती कर्मठांच्या आग्रहास बळी पडली नाही. सातवाहन राजवटीत संस्कृतच्या तोडीस तोड ठरलेली…
Read More