रा. स्व संघाचे सरचिटणीस श्री दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की भारताच्या राजकारणात खूप बदल होत आहेत. यापुढेही होत राहतील. जसं की राजपथाचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ करण्यात आले. याचाच अर्थ आपला देश घराणेशाहीतून किंवा वसाहतवादाच्या परंपरेतून हळू हळू बाहेर येत आहे. सरचिटणीसांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुद्धा उल्लेख केला. एका व्याख्यान मालेचे उदघाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानाच्या कार्यालयातून येणाऱ्या पत्रांवर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक दिला जातो. राजपथाला आता कर्तव्य पथ म्हणून संबोधले जाणार असून पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला आहे असे होसबाळे यांनी सांगितले. ही…
Read More