श्रेष्ठ भारत !!

रा. स्व संघाचे सरचिटणीस श्री दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की भारताच्या राजकारणात खूप बदल होत आहेत. यापुढेही होत राहतील. जसं की राजपथाचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ करण्यात आले. याचाच अर्थ आपला देश घराणेशाहीतून किंवा वसाहतवादाच्या परंपरेतून हळू हळू बाहेर येत आहे. सरचिटणीसांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुद्धा उल्लेख केला. एका व्याख्यान मालेचे उदघाटन करताना ते बोलत होते.

पंतप्रधानाच्या कार्यालयातून येणाऱ्या पत्रांवर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक दिला जातो. राजपथाला आता कर्तव्य पथ म्हणून संबोधले जाणार असून पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला आहे असे होसबाळे यांनी सांगितले. ही व्याख्यानमाला ’भारतीय विचार संस्थान न्यास’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. आणि विषय होता. ’ भारत श्रेष्ठ बनाने मे प्रबुद्ध जन की भूमिका’.

श्री होसबाळे यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले की मार्क टूली नावाचा ब्रिटिश पत्रकार म्हणाला होता, भारतातले लोक सध्या ब्रिटिशांनी घालून दिलेल्या शासकीय यंत्रणेप्रमाणे काम करत आहेत. पण लवकरच त्यांनी स्वतःच्या गरजेप्रमाणे एक यंत्रणा बनवण्याची गरज आहे.

भारताला आता जागतिक स्तरावर वाखाणले जात आहे. आणि अमृत काल (येणारी २५ वर्षे) हाच श्रेष्ठ भारत घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने मिळवलेले यश हे जगासाठी एक सर्वोत्तम उदाहरण आहे. जागतिक स्तरावर पाचवा सर्वात मोठा देश म्हणून ओळख मिळाल्यावर जगभरातील अर्थतज्ज्ञ भारताकडे आता एक होऊ घातलेली आर्थिक महासत्ता म्हणून पाहत आहेत, असे होसबाळे म्हणाले.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे डायरेक्टर ऋषीकुमार शुक्ला यांनीही या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ते म्हणाले ‘जी-२० शिखरपरिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी भारताला मिळाली आहे. भारतासाठी आपली संस्कृती जगाला दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे.‘

Related posts

Leave a Comment