केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सात नोव्हेंबर रोजी कोलाड येथे कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असतानाच विद्युतीकरणाचे कामही लवकरच सुरू होत आहे. त्याच बरोबर कोकण रेल्वेचे अन्य प्रकल्पही मार्गी लागत आहेत.कोकणातील दिघी आणि जयगड बंदरं कोकण रेल्वेशी जोडण्याच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. अलिबागला आरसीएफच्या रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याची कल्पनाही प्रत्यक्षात येऊ घातली आहे.उरण रेल्वेचं अनेक वर्षे रखडलेले काम सुरू होत असून रत्नागिरी किंवा राजापूर पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रकल्पावर रेल्वे गंभीरपणे विचार करीत आहे. थोडक्यात कोकणात रेल्वेचं जाळं विणण्याचं प्रभू यांनी नक्की केलेलं…
Read More