रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?

who-got-the-freedom

नेताजी सुभाचंद्र बोस भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजाराेंनी विविध प्रकारे प्रयत्न केले. कोणी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला तर कोणी क्रांतीचा मार्ग अवलंबला. पण सशस्त्र सेना उभारून देशाच्या उंबरठ्यापर्यंत धडक मारणारे आणि इंग्रज सरकारच्या उरात धडकी भरवणारे सुभाषचंद्र बोस हे एकमेवद्वितीयच.त्यांना यश मिळाले नसेल पण त्यांनी जी झेप घेतली ती केवळ अविस्मरणीय आहे. नेताजी सुभाचंद्र बोस हे एक महान देशभक्त होते. ब्रिटिश शासनापासून मुक्ती व पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांचे लक्ष्य होते. तुम्ही  मला रक्त द्या. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो, या घोषणेद्वारे स्वातंत्र्यसेनानींमध्ये स्वातंत्र्याचा महामंत्र फुंकणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय संस्कृतीवर…

Read More

देशभक्ती

deshbhakti

विनय, दिनेश आणि सुधीर ढाका जिल्ह्यातील राऊत भोग गावात ११ सप्टेंबर १९०८ रोजी जन्मलेले विनय कृष्ण बसू अॅक्शनच्या वेळी ढाक्याच्या मिट फोर्ड मेडिकल स्कूलमध्ये चवथ्या वर्षाचा अभ्यास करीत होते. सुधीर गुप्त ढाका जिल्ह्यातील सिमुलिया गावचे तर, दिनेशचंद्र गुप्तचा जन्म ढाका जिल्ह्यातीलच यशलम गावातला. या तिन्ही वीरांची गावं आता बांगलादेशात आहेत. धगधगत्या वातावरणात वावरणारे हे वीर कळत नकळत क्रांतिकार्याकडे ओढले गेले. ज्यावेळी चितगाव भागात सूर्यसेनांची सेना जीवावर उदार होऊन जुलमी सरकारशी दोन हात करीत होती. त्याचवेळी कलकत्ता शहरात आणि बंगालच्या इतर प्रांतात ‘बंगाल वॉलेंटियर्स’ काम करीत होते. हेमचंद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

हनुमान जयंती विशेष

hanuman-jayanti-special

पवनपुत्र हनुमान – सारंग कुलकर्णी काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमानजयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकीरामायणा मध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला.…

Read More

कोकणातील निसर्गनवल

nature-s-wonder-in-kokan

निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही. – आशुतोष बापट निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला…

Read More

नाशिकचे काळाराम मंदिर

kalaram-temple-of-nashik

दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट्य काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात…

Read More

आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा!

take-care-of-health-in-summer

टरबूज – उन्हाळ्यात सर्वांत उपयोगी फळ म्हणजे टरबूज. यात भरपूर पाणी असते. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते. सफरचंद – सफरचंदात सर्वांत जास्त फायबर असतात. या व्यतिरिक्त सफरचंदाच्या सालात एंटीऑक्सीडेंट घटक असतो. लोहही असते. यामुळे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे. खरबूज – खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हिटॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते. *सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा. *घरातून बाहेर निघताना सनक्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या. *डोळ्यांना सूर्याच्या तेज…

Read More

औषधी दुधी भोपळा

dudhi

दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहे. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व ‘क’ असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे. * हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. * दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात. * रोज…

Read More