जाहिरात नियामक मंडळाने जरी विविध नियम तयार केले असले तरी फसव्या जाहिराती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नियम कोण पाळणार हा मोठा प्रश्न आहे. FTC च्या green guides ची नियमावली २०१२ पासून बदललेली नाही. त्यात यावर्षी सुधारणा होण्याची शक्यता आहे. FTC च्या नियमावलीत आणखी काय सुधारणा हव्यात ह्यावर त्यांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तसेच काही समस्यांवर FTC भागधारकांना विचार करायला सांगत आहे. जसे की कार्बन ऑफसेट्स हवामानातील बदल, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंबाबत पुनर्वापराची हमी ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल यातील फरक स्पष्ट करणे. कारण २०१२ मध्ये तो केला गेला नव्हता. Green guides मध्ये आणखी कोणत्या प्रकारचे बदल करायला हवेत. जेणेकरून कंपन्यांचा TINA.ORG च्या यादीत समावेश करता येईल.
SAM.GOV ची फसवेगिरी
FTC ने एक नियम बनवला आहे ज्या अंतर्गत सरकारला जे लोक फसवतात, त्यांच्याकडून दंड म्हणून पैसे घेता येतील. अशी फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना २ बिलियन डॉलरचा गंडा घातल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. या नियमाला पाठिंबा देणाऱ्या प्रतिक्रिया वाचल्यावर TNA.ORG च्या लक्षात आले की काही कंपन्या बनावट संकेतस्थळे बनवून लोकांना फसवतात. सरकारी संकेतस्थळासारखे दिसणारेच हे संकेतस्थळ असते. चिन्ह इत्यादी… खरेतर हे नियमबाह्य आहे. म्हणूनच TINA.ORG ने त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.
बेकायदेशीर मालमत्तेचे समर्थन करणारे कलाकार

टॉम ब्रॅडी, शकवील, ओनिल, स्टीफन करी, नाओमी ओस्का, या सर्व कलाकारांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे. कोणती ? तर FTX meltdown शी संबंधित त्यांची जी बाजू आहे ती त्यांनी लावून धरली आहे. जी चुकीची आहे. विशेषकरून फ्लोरिडा राज्यातील कलाकारांनी कायद्याचे उल्लंघन करून जनतेला आभासी चलनाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. त्याबदल्यात नुकसान भरपाईची रक्कम कशी मिळाली? किती मिळाली याबाबत काहीच सांगितले नसल्याचा आरोप कलाकारांवर करण्यात आला आहे. FTX बंद पडणे हा कलाकारांबरोबरच ग्राहकांसाठी सुद्धा एक धडा आहे. FTX हा एक व्यापार मंच होता. FTX चे माजी प्रमुख बॅकमन फ्रॉइड यांच्यावर गुन्हेगारी तसेच तत्सम आरोप लावण्यात आले आहेत. ग्राहकांनी यातून काय शिकावे तर एखादा कलाकार आभासी चलनाची जाहिरात करत असला तरी प्रत्यक्ष गुंतवणूक करताना ग्राहकाने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. केवळ कलाकार सांगतात म्हणून गुंतवणूक करायला जाऊ नये. आणि कलाकारांनी काय शिकावे तर ते स्वतः त्या गोष्टीतील तज्ज्ञ नसतील तर त्यांनी डिजिटल मालमत्तेची जाहिरात करण्यापूर्वी दोनदा विचार करावा.
आकारमान कमी जास्त होणे.

आपण एखाद्या किराणामालाची वस्तू विकत घेतो तेव्हा त्याच्या आकारमानानुसार त्याची अमुक किंमत असेल असे आपण गृहीत धरलेले असते. पण काही वेळेस याच्या उलट होऊ शकते. म्हणजे वस्तूचे आकारमान लहान असेल आणि किंमत मात्र अव्वाच्या सव्वा असू शकेल असा प्रकार असतो. तेव्हा वरील प्रकार होतो. खरे तर आपण कमी प्रमाणात घेतलेल्या वस्तूसाठी सारखीच किंवा जास्त किंमत मोजत असतो. एक ग्राहक केंद्री संकेतस्थळ mouseprint.org हीच समस्या अनेक वर्ष मांडत आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच कंपन्या अशा प्रकारची फसवणूक करताना दिसतात. ऑगस्ट महिन्यात ५४% अमेरिकेतील लोकांनी श्रींकफ्लेशन? बद्दल वाचले. तर ४६ % लोकांनी काहीच वाचले नव्हते.
नियमांना धाब्यावर बसवणे

२०२२ साली TINA.ORG च्या एक गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी ३ कंपन्यांबद्दल लिहिले त्यातला २ MLM आहेत. या तिन्ही प्रचलित शब्द वापरण्याऐवजी तो शब्द वेगळ्या पद्धतीने वापरतात. उदा. COVID चे स्पेलिंग त्यांनी “CO^|D.” असे केले. म्हणजे त्या कंपन्यांनी स्वतःची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नियम मोडले आहेत. म्हणजे जर खरोखरीच कोणी कोविड विषयी इंटरनेट वर माहिती शोधली तर त्या व्यक्तीची दिशाभूल होणार हे नक्की. आणि त्या कंपन्या ज्यांनी अशा प्रकारची फसवणूक केली आहे त्या आपण पकडले जाऊ नये यासाठी प्रयत्न करत राहणार. असे प्रकार २०२३ मध्ये अजून बघायला मिळतील असे सध्या तरी वाटत आहे.
