“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’ तर्फे आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी समर्पित करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बोरिवलीचे आमदार श्री. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विट्टी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोरोना महामारीच्या या कठीण काळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावले आहे. या दरम्यान अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा डॉक्टरांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच “राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने…
Read MoreDay: July 10, 2021
मुंबईची विकास वाहिनी
मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, विकास गंगोत्री, शिक्षण, उद्योग, सेवाक्षेत्र ह्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रणी असणारी मुंबई. मुंबईच्या चाकरमान्यांना इप्सित स्थाना पर्यंत पोहचवणारी मुंबई लोकल. मुंबईची लोकल ही मुंबई ची जीवन वाहिनी आहे. विकास वाहिनी आहे. कारण रोज नोकरीधंद्या निमित्ताने लोक प्रवास करतात आणि लोकल ट्रेन हा वहातुकीचा सोपा, कमी खर्चिक व वेळ वाचवणारा पर्याय आहे. लाॅकडाऊनचे निमित्त देऊन सर्व सामान्य माणसाकरता ह्या प्रवासावर जी बंदी आणली आहे ती आज सर्वस्वी चूक आहे. नोकरी किंवा चरितार्थाकरिता नाइलाजाने बाहेर पडणारा माणूस लाॅकडाऊनला कुरवाळून बसू शकत नाही. लोकलबंदीचा निर्णय त्याच्या बोकांडी मारल्या…
Read More