समर्थांचे शब्दसामर्थ्य

samartha-s-words

– डॉ. साधना सुधाकर गोखले

समर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती जी सदासर्वदा जागृत असे. मनोबोध, अभंगगाथा, करुणाष्टके, असंख्य पदे, सवाया, डफगाणी, पोवाडे, आरत्या, आख्यान काव्ये, आत्माराम, दासबोध असे समर्थांचे अफाट साहित्य असले तरी ‘आत्माराम’ दासबोध ‘माझे रूप स्वत: सिद्ध-’ असे त्यांनी स्वत:च म्हटले असल्याने प्रामुख्याने दासबोध ही त्यांची ‘वाङ्मयीन मूर्ती’ आहे. दासबोधात एकूण वीस दशके आहेत. प्रत्येक दशकाचे दहा समास असे वीस दशकांचे दोनशे समास आहेत. यातील ओवीसंख्या ७७५१ इतकी आहे. समर्थांनी जे जे अनुभविले ते ते सारे यातून व्यक्त झाले आहे. त्यांचे प्रतिपादन सरळ आणि मराठी रोखठोक आहे. विषय मांडण्याचा ओघ गतिमान आहे. या ओघात मराठी बरोबरच ंिहदी, उर्दू, पारसी, अरबी, संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करताना दिसतात. संपूर्ण दासबोधात या शब्दांची पखरण आहे. ओवी दिसते छोटी पण तिचा आशय मोठा असतो.

तत्कालीन समाजातील देवत्वाबद्दल व साधुत्वाविषयीच्या रूढ, भोंगळ कल्पना विवेकाच्या शस्त्रानेच कापून काढीत ‘खरा देव’ कोणता ते त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या अंतरंगात वास करणारा अंतरात्मा (आत्माराम) हाच खरा देव आहे हे त्यांनी ठासून सांगितले.

जो जाणेल भगवंत । तया। नाव बोलिजे संत।

जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी॥  ६.१.१६॥

चळेना  ढळेना देव। ऐसा ज्याचा अंतर्भाव ।

तोचि जाणिजे महानुभाव । संत साधु ॥ ६.१.१७ ॥

समर्थांच्या आणि अवघ्या महाराष्ट्राच्या सुदैवाने समर्थांची व शिवाजीराजांची भेट झाली. राजांनी समर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. ‘जाणता राजा’ असलेल्या शिवाजीराजांना समर्थांकडून आध्यात्मिक बळ प्राप्त होत राहिलेच. पण समर्थांचे ‘राजकारणसूत्र’ राजांच्या प्रयत्नांना पूरक होत राहिले.‘राजकारण बहुत करावे । परी कळोचि न द्यावे।’ हे समर्थांचे राजकारणसूत्र होते. समर्थ – शिवाजीराजांच्या चर्चा होत. विचारविमर्ष होई. पण या साऱ्या मसलतीत कमालीची सावधानता, गुप्तता बाळगली जाई.

अफझलखान मोठ्या प्रतिज्ञेने लष्करी, सामर्थ्यासह जेव्हा राजांकडे चाल करून आला तेव्हा समर्थांनी एक पत्र राजांकडे रवाना केले. वरवर पाहता त्या पद्ममय पत्रात आध्यात्मिक विचार मांडले होते. पण ते पत्र सुपूर्द करताना ‘पहिले अक्षर’ एवढाच गुप्त संदेश समर्थ शिष्याने दिला. त्याने पत्रातून निरोप दिला होता. ‘विजापूरचा सरदार निघाला आहे.’ तो अचूकपणे शिवाजीराजांना समजला. ते पुढील तयारीला लागले. पुढे अफझलखान भेटीआधी समर्थांकडून पत्र आले. वरवर साधे वाटणारे, पण त्यातून राजांनी भेटीला जाताना कोणती सावधगिरी बाळगावी याचे खुबीने मार्गदर्शन होते. पत्र असे होते –

नाना वस्त्रे नाना भूषणें । येणे शरीर शृंगारणे । विवेके विचारे राजकारणे। अंतर शृंगारिजे॥ शरीर सुंदर सतेज । वस्त्रेभूषणें केले सज्ज । अंतरी नसतां चातुर्यबीज । कदापि शोभा न पवे॥ (बीज म्हणजे चिलखत राजे आपण चिलखत घालूनच भेटीला जावे अन्यथा ते अयोग्य ठरेल) पुढे अफझलखानाचा स्वभावविशेष खुबीने सांगितला –

तुंड (तोंडाळ) हेकांड (हट्टी) कठोर वचनी । अखंड तोल (ताठा डौल) साभिमानी। न्याय नीति अंत:करणी । घेणार नाही। (त्याच्यापाशी नीतीची चाड नाही) तऱ्हे सीघ्रकोपी सदा। कदापि न धरी मर्यादा। राजकारण संवादा । मिळोंचि नेणे। ऐसे लौंद (लबाड) बेइमानी। कदापि सत्य नाही वचनी । पापी अपस्मार जगी। सदा राक्षस जाणावे॥ अशा सर्व बाजूंनी सूचना देत अखेरी शुभाशीर्वाद दिले – बरे ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजाभवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणे। (१८.६.१ ते १०)

समर्थांच्या शब्दसामर्थ्याचा हा ‘निखळ पुरावा’च आहे हो ना?

(लेखिका समर्थ साहित्याच्या अभ्यासिका आहेत.)

——————————————-

मराठी घराचे भूषण काही मराठी पुस्तके

मराठी राजभाषा दिनानिमित्त महानगरी

वार्ताहरने काही मान्यवर आणि साहित्य

रसिकांकडून  प्रत्येक मराठी घरात असायला

हवीत अशा ५० निवडक पुस्तकांची यादी

मागवली. अनेक जणांनी तशी यादी पाठवली.

त्या सर्व याद्यांचे एकत्रीकरण करून काढलेली

अंतिम यादी खालीलप्रमाणे –

१) ज्ञानेश्वरी – संत ज्ञानेश्वर ७९) तराळ -अंतराळ – शंकरराव खरात
२) तुकाराम गाथा – संत तुकाराम ८०) माझ्या जन्माची चित्तरकथा – शांताबाई कांबळे
३) दासबोध – रामदास स्वामी ८१) जीणं आमुचं – बेबीताई कांबळे
४) गीताई – विनोबा भावे ८२) उलगुलान – भुजंग मेश्राम
५) भाऊसाहेबांची बखर ८३) लमान -श्रीराम लागू
६) यमुना पर्यटन – बाबा पद्मजी  ८४) ती फुलराणी – पु. ल. देशपांडे
७) माझा प्रवास – गोडसे भटजी  ८५) मोरुची मावशी – आचार्य अत्रे
८) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक  ८६) सखाराम र्बाइंडर – विजय तेंडुलकर
९) पण लक्षात कोण घेतो ? – हरी नारायण आपटे  ८७) तणकट – राजन गवस
१०) गीता रहस्य – लोकमान्य टिळक  ८८) किरवंत – प्रेमानंद गज्वी
११) माझी जन्मठेप – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर  ८९) रमाई – डॉ. यशवंत मनोहर
१२) बुद्ध- आणि त्याचा धम्म – डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ९०) एरंडाचे गुऱ्हाळ – ंिच. वि. जोशी
१३) श्यामची आई – साने गुरूजी  ९१) आवर्तन – सानिया
१४) कऱ्हेचे पाणी – आचार्य अत्रे  ९२) जेव्हा मी जात चोरली होती – बाबूराव बागूल
१५) राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे  ९३) आमचा बाप आन् आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव
१६) पानिपत – विश्वास पाटील  ९४) इंग्रजीमध्ये बोला पटकन – चाऊस सलिम
१७) स्वामी – रणजित देसाई  ९५) वाडा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
१८) मृत्यूंजय – शिवाजी सावंत  ९६) १८५७चा जिहाद – शेषराव मोरे
१९) संभाजी – विश्वास पाटील  ९७) उचल्या – लक्ष्मण गायकवाड
२०) छावा – शिवाजी सावंत  ९८) काय डेंजर वारा सुटलाय – जयंत पवार
२१) झाडाझडती – विश्वास पाटील  ९९) जाणीवा जाग्या होताना – अरुणा ढेरे
२२) व्यक्ती आणि वल्ली – पु. ल. देशपांडे  १००) ईट इज आल्वेज पॉसिबल – किरण बेदी
२३) ती फुलराणी – पु. ल देशपांडे  १०१) यू कॅन विन – शिव खेरा
२४) विशाखा ( काव्यसंग्रह) – कुसुमाग्रज   १०२) राऊ – ना. सं इनामदार
२५) ययाती – वि. स. खांडेकर   १०३) बटाट्याची चाळ – पु. ल. देशपांडे
२६) झोंबी, नांगरणी, घरंिभती – आनंद यादव  १०४) आकाशाशी जडले नाते – जयंत नारळीकर
२७) सलाम ( काव्यसंग्रह) – मंगेश पाडगावकर  १०५) कट्यार काळजात घसली – पुरुषोत्तम दारव्हेकर
२८) पडघवली – गो. नी. दांडेकर  १०६) शांतता कोर्ट चालू आहे – विजय तेंडुलकर
२९) गारंबीचा बापू – श्री. ना. पेंडसे  १०७) तुंबाडचे खोत – श्री. ना. पेंडसे
३०) तुंबाडचे खोत ( खंड १ व २) – श्री. ना. पेंडसे  १०८) ऑथेल्लो – कुसुमाग्रज
३१) कुण्या एकाची भ्रमणगाथा – गो. नी. दांडेकर  १०९) घाशिराम कोतवाल – विजय तेंडुलकर
३२) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर  ११०) धग – उद्ध-व शेळके
३३) माणदेशी माणसं – व्यंकटेश माडगूळकर    १११) मराठी साहित्य ठाव आणि उठाव – प्रा. राजेंद्र करनकाळ
३४) कादंबरीमय शिवकाल ( ५ कादंबऱ्यांचा संग्रह) – गो. नी. दांडेकर  ११२) प्रवर्तननिष्ठ समीक्षा – प्रा. डॉ. राजेंद्र करनकाळ
३५) वाऱ्याने हलते रान – ग्रेस  ११३) गोतावळा – शिरीष काणेकर
३६) काजळमाया – जी. ए. कुलकर्णी   ११४) आम्हीही इतिहास घडवला – ऊर्मिला पवार / मीनाक्षी भूज
३७) पैस – दुर्गा भागवत  ११५) सूड – बाबूराव बागूल
३८) रुचिरा – कमलाबाई ओगले  ११६) परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा – डॉ. श्रीपाल सबनीस
३९) रथचक्र – श्री. ना. पेंडसे  ११७) दलित साहित्य वेदना आणि विद्रोह – भालचंद्र फडके
४०) १८५७चे स्वातंत्र्यसमर – वि. दा. सावरकर  ११८) दलित साहित्य उद्गम आणि विकास – डॉ. योगेद्र मेश्राम
४१) मुसाफीर – अच्युत गोडबोले  ११९) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे
४२) रणांगण – विश्राम बेडेकर  १२०) ंिहदू संस्कृती आणि स्त्री – डॉ. आ. ह. साळुंखे
४३) पूर्वरंग – पु. ल. देशपांडे  १२१) आई रिटायर होते – अशोक पाटोळे
४४) बहिणार्बाइंच्या कविता – बहिणावाई चौधरी  १२२) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
४५) कल्याणी – ज्योत्स्ना देवधर  १२३) निळी पहाट – प्रा. रा. ग. जाधव
४६) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर  १२४) गिधाडे – डॉ. योगेंद्र मेश्राम
४७) रानवाटा – मारुती चितमपल्ली  १२५) उध्वस्त व्हायचंय मला – मल्लिका अमर शेख
४८) पितामह – राजीव पटेल  १२६) मोगरा फुलला – गो. नी. दांडेकर
४९) इडली, ऑर्कीड आणि मी -विठ्ठल कामत  १२७) मृण्मयी ( काव्यसंग्रह) – इंदिरा संत
५०) अग्निपंख – अब्दुल कलाम  १२८ ) गीत रामायण – ग. दि. माडगूळकर
५१) एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर  १२९) जिप्सी ( काव्यसंग्रह) – मंगेश पाडगावकर
५२) शाळा – मिंिलद बोकील  १३०) रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानेटकर
५३) माझा साक्षात्कारी हृदयरोग – अभय बंग  १३१) Fतुचक्र – दुर्गा भागवत
५४) ब्लास्फेमी – तेहमिना दुराणी  १३२) रणांगण – विश्राम बेडेकर
५५) अमृतवेल – वि. स.खांडेकर  १३३) थँक्यू मि. ग्लाड , अकरा कोटी गॅलन पाणी- अनिल बर्वे
५६) केशराचे शेत – मारुती चितमपल्ली  १३४) एका रानवेड्याची शोधयात्रा – कृष्णमेघ कुंटे
५७) असे घडले सहस्रक – संकलित  १३५) नर्मदे हर – जगन्नाथ कुंटे
५८) पुनर्जन्माचे गूढ – स्वामी आनंद Fषी  १३६) बलुतं – दया पवार
५९) एक झाड दोन पक्षी – विश्राम बेडेकर  १३७) उपरा – लक्ष्मण माने
६०) युगांत -इरावती कर्वे  १३८) अक्करमाशा – शरणकुमार ंिनबोळे
६१) संपूर्ण चातुर्मास – संकलित  १३९) कळ्यांचे निश्वास – विभावरी शिरूरकर ( मालतीबाई बेडेकर)
६२) फास्टर फेणे – भा. रा. भागवत  १४०) कोल्हाट्याचं पोर – किशोर शांताबाई काळे
६३) गुणकारी आहार – डॉ. वाखरू  १४१) एमटी आयवामारू – अनंत सामंत
६४) डॉक्टर,  मी काय खाऊ ? – मालती कारवारकर  १४२) बायपासचे दिवस – अनंत सामंत
६५) तीरे तीरे नर्मदा – अमृतलाल वेगड  १४३) आंधळ्याच्या गायी, हंस अकेला – मेघना पेठे
६६) वामन परत न आला – जयंत नारळीकर  १४४) पंचतारांकित – प्रिया तेंडुलकर
६७) शोध कुंभपर्वाचा – विश्वास साक्रिकर  १४५) ब्र – कविता महाजन
६८) नादवेध – अच्युत गोडबोले / सुलभा पिशवीकर  १४६) नॉट विदाऊट माय डॉटर – बेट्टी मोहम्मदी
६९) धार आणि काळ -नरहर कुरुंदकर  १४७) हॅनाची सुटकेस -ल़ेविन केरेन
७०) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे  १४८) ब्लास्फेमी – तेहमीना दुर्राणी
७१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर  १४९) माझं लंडन – मीना प्रभू
७२) राजर्षी शाहू महाराज – धनंजय कीर  १५०) इथे ओशाळला मृत्यू – वसंत कानेटकर
७३) सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुद्ध- – आ. ह. साळुंखे  १५१) मी दुर्गा खोटे – दुर्गा खोटे
७४) बाबा आमटे – बी. जी. बापट  १५२) वालाँग-एका युद्ध-कैद्याची बखर – शाम चव्हाण
७५) प्रकाशवाटा – प्रकाश आमटे  १५३) रक्त आणि अश्रू  – पु. भा. भावे
७६) तो मी नव्हेच – आचार्य अत्रे  १५४) संगीत शारदा – गो. ब. देवल
७७) झेंडुची फुले – आचार्य अत्रे  १५५) भारताचा शोध – पं. जवाहरलाल नेहरू
७८) फकिरा – अण्णाभाऊ साठे

——————————————————————

टोपणनावाने लिहिणारे साहित्यिक

नाव    टोपणनाव
अरुण टिकेकर    (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
अशोक जैन   (कलंदर)
आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
आनंद साधले     (दमयंती सरपटवार)
आनंदीबाई कर्वे   (बाया कर्वे)
कृष्णाजी लक्ष्मण सोमण    (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
केशव नारायण देव    (पतितपावनदास)
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे    (गंगाधरराव देशपांडे)
गणेश दामोदर सावरकर   (बाबाराव सावरकर)
गणेश वामन गोगटे     (लीला)
गोपाळ गोविंद मुजुमदार   (साधुदास)
गोपाळ हरी देशमुख    (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
चंद्रकांत सखाराम चव्हाण    (बाबूराव अर्नाळकर)
चं.वि.बावडेकर    (आलमगीर)
जयवंत दळवी     (ठणठणपाळ)
तुकारामतात्या पडवळ  (एक हिंदू)
दत्ता टोळ     (अमरेंद्र दत्त)
डॉ. दामोदर विष्णू नेने     (दादूमिया)
दिनकर शंकरराव जवळकर  (आग्यावेताळ)
द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)
न.र. फाटक (अंतर्भेदी), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
नरसिंह चिंतामण केळकर  (अनामिक; आत्?मानंद)
नागोराव गोविंद साठे    (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
नारायण जोशी      (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
नारायण दामोदर सावरकर    (जातिहृदय)
नारायण विनायक कुलकर्णी   गोविंदसुत
परशराम गोविंद चिंचाळकर      गोविंदसुत
प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई)  (सदाराम)
प्रवीण टोकेकर (ब्रिटिश नंदी)
पांडुरंग सदाशिव साने    (साने गुरुजी)
बाळकृष्ण अनंत भिडे   (बी)
महादेव मल्हार जोशी    (स्वामी सच्चिदानंद)
मा.गो. वैद्य      (नीरद)
मीनप्पा व्यंकटेश केलवाड   गोविंदशर्मा
मुक्ताबाई दीक्षित       (कृष्णाबाई)
रविन थत्ते   (रविन मायदेव थत्ते)
रामकृष्ण माधव चोणकर (हरी माधव समर्थ)
राम गणेश गडकर    (बाळकराम)
रामचंद्र चितळकर   (सी रामचंद्र)
रामचंद्र जोशी   (साखरेबाबा)
वा.रा.कांत    (कांत)
विठ्ठल वामन हडप   (केयूरक)
विष्णु भिकाजी गोखले    (विष्णुबाबा ब्रह्मचारी)
शंकर दाजीशास्त्री पदे   पिनाकी, भ्रमर, शंकर
श्रीधर व्यंकटेश केतकर   गोविंदपौत्र
सतीश जकातदार (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
अनंत फंदी    अनंत भवानीबावा घोलप
कांत    वा.रा. कांत
काव्यशेखर भास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमर   कृष्णाजी लक्ष्मण सोमण
कुंजविहारी   हरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधव  स.अ. शुक्ल
कुसुमाग्रज    विष्णू वामन शिरवाडकर
केशवकुमार     प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत   कृष्णाजी केशव दामले
गोविंदाग्रज    राम गणेश गडकरी
ग्रेस  माणिक गोडघाटे
चक्रधर    श्रीचांगदेव राऊळ
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती वासुदेव गणेश टेंबे
दित्जू/माधव जूलियन       माधव त्र्यंबक पटवर्धन
नारायणसुत श्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजन वसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंध  रा.श्री. जोग
नीरजा नीरजा साठे
पठ्ठे बापूराव   श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)
पद्मविहारी   रघुनाथ गणेश जोशी
पद्मा   पद्मा गोळे
पी.सावळाराम     निवृत्तिनाथ रावजी पाटील
मुक्ताबाई/मुक्ताई   मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तेश्वर मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंत    मोरेश्वर रामचंद्र पराडकर
रघुनाथ पंडित   रघुनाथपंडित चंदावरकर/तंजावरकर; रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे
रमेशबाळ बाळ  सीताराम मर्ढेकर
रामदास  नारायण सूर्याजी ठोसर
विंदा करंदीकर   गोविंद विनायक करंदीकर
विसोबा खेचर   विसोबा चाटे
विहंगम बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाख त्र्यं.वि. देशमुख
साने गुरुजी     पांडुरंग सदाशिव साने
स्वरूपानंद     रामचंद्र विष्णू गोडबोले
होनाजी    होनाजी सयाजी शेलारखाने

 

 

 

 

 

                                

——————

Related posts

Leave a Comment