ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण अंतिम फेरीच्या जवळ जाणाऱ्या लढतीची आकडेवारी समोर आली. विजेत्याकडे मिस्ड शॉट्स होते. आणि अंतिम विजेतेपदासाठी अटीतटीची स्पर्धा सुरु होती. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. २३ वेळा खेळल्यानंतर सुद्धा प्रतिस्पर्ध्यावर दबाव कोणाचा होता तर रफेल नदाल चा. मी जेव्हा खेळ पाहायला बसलो तेव्हा एकूणच असं वाटत होत की रफेलला मेदवेदेव हरवूनच टाकेल. एक असा स्पर्धक ज्याच्याविरुद्ध खेळणं खूप कठीण आहे. जितकं अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून जिंकून परतणं कठीण होतं तितकंच.

त्याच्या ३६ व्या वाढदिवसाच्या काही महिने आधीच त्याच्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण झाली होती. २००३ पासून त्याला एकदाही दुखापत झालेली नाही. शेवटच्या सामन्यात पोचण्यासाठी जो ग्रँड स्लॅम च्या प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला अटीतटीची टक्कर देऊन इथपर्यंत पोचला. अशा व्यक्तीविरुद्ध जिंकणे सोपे नव्हते. पहिले २ सेट्स जिंकल्यानंतर तो आता उपांत्यपूर्व फेरीत पोचणार हे जवळ जवळ नक्की झालं होतं.
जर तो हरला असता तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नव्हते. फक्त ती बातमी वर्तमानपत्राच्या क्रीडाविषयक पानाच्या शेवटी छापली गेली असती. कारण त्यादिवशी सर्वात मोठी बातमी विराट कोहलीची होती. ही कदाचित एकाच ठिकाणी खेळली गेलेली सर्वात कठीण अंतिम फेरी म्हणावी लागेल. जेकोव्हिचने त्याला हरवलं होतं. पण ही अंतिम फेरी ग्रँड स्लॅम च्या स्पर्धेत सर्वात जास्त वेळ खेळली गेलेली अंतिम फेरी होती.

शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार हे सांगता येत नव्हतं. माझ्यामते नदाल ज्या सराईतपणे खेळत होता ते पाहून प्रतिस्पर्ध्यावर नक्कीच दबाव आला असावा. आणि त्यामुळेच त्याचे काही शॉट्स मिस्ड झाले असावेत. ज्यांनी हा सामना प्रत्यक्ष पाहिला त्यांनाच मी काय म्हणतोय हे नीटपणे कळू शकेल. एकेक पॉईंट मिळवण्यासाठी दोघे अटीतटीने खेळत होते.जसे काही रोम मध्ये एखाद्या हिंस्त्र जनावराशी लढतात तसे. किंवा अगदी अलीकडच्या काळातील फोरमन विरुद्ध अली ची लढाई. एखाद्या चाणाक्ष व्यक्तीलाच त्यांच्याकडून पॉईंट्स काढून घेणे जमले असते.
नदाल हा आतापर्यंतचा सर्वोत्तम टेनिसपटू आहे का? त्याचा खेळ पाहिल्यावर हा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरेल. पण तरीही विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेडररचीही वाहवा केली जातेच की. प्रेक्षक तर त्याच्याही खेळाचे चाहते आहेत. जेकोविच ला सुद्धा अनेक जेतेपदं मिळू शकतात. पण नदाल हा सर्वोत्तमच आहे. एकमेव आहे. त्याच्याशी कोणी खेळाडू स्पर्धा करू शकत नाही. कधी कधी असं वाटत की नदाल कदाचित परग्रहावरून आला असावा. अंतिम फेरीतील आकडेवारीतून लक्षात येईल की नदालचे जिंकण्याचे प्रमाण फेडरर बरॊबर ६:२ असे आहे. आणि जेकोविच बरोबर ५:४ असे आहे.
