”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.”

”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.” रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ज्यांनी हिंदूंचा नायनाट करण्यासाठी हजारो वर्ष घालवली. ते आता स्वतःच आपापसात भांडत आहेत. आणि हे एखाद्या राज्यापुरतं मर्यादित नसून जगभरात सुरु आहे. रा.स्व. संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ११ व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिम्मित असलेल्या कार्यक्रमानंतर केलेल्या भाषणात रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत बोलत होते. ”हिंदू समाज इतका बलशाली आहे की त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. हिंदू समाजात सर्वाना सामावून घेण्याची वृत्ती आहे. कोणताही भेदाभेद तेथे नाही.” 

“ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला ते स्वतः च संपले आहेत.आमचा धर्म ५००० वर्षांपासून अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच तो सनातन आहे. त्याला कोणीही धक्का लावू शकले नाही. आम्ही इतके सामर्थ्यशाली आहोत की आमच्या पुढे उभं राहण्याची कोणाची टाप नाही. हिंदू धर्मात सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आहे. त्यांनी आमच्या धर्माचा विनाश करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आणि जर हिंदू धर्म नष्ट करायचाच असता तर तो मागील १००० वर्षातच झाला असता. पण तो पुरून उरला आहे.” मोहनजी म्हणाले.

“ज्यांनी १००० वर्षे हिंदूंचा नायनाट करण्यात व्यर्थ घालवली तेच आता जगभरात भांडत आहेत. हिंदू मात्र शतकानुशतके टिकून आहे. आणि त्यांची भरभराट होत आहे. काही जण घाबरले आहेत पण ते हे विसरले आहेत की आपण कोण आहोत”?  त्यांनी आमच्या धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तेच तोंडघशी पडले. आजही सनातन भारताच्या काही खुणा येथे पाहावयास मिळतात.”

“इतके अत्याचार झाले, अडथळे आले. तरीही मातृभूमी आमच्या सोबत आहे. आपल्याकडे भरपूर साधनसंपत्ती असताना आपण का घाबरतो ? कारण आपण कोण आहोत तेच आपण विसरलो आहोत. आपण स्वतःला हतबल समजतो कारण त्याच पद्धतीने आपण जीवनाकडे बघतो आहोत.” “हिंदूंचे हित जपणे म्हणजेच राष्ट्रहित जपणे आणि ते पहिल्यांदा करायला हवे” श्री. मोहन भागवत ”आपल्या देशावर वेळोवेळी परकीय आक्रमणं झाली. एवढे अत्याचार सहन करूनही आज हिंदू समाज ८०% आहे.ज्यांची देशावर सत्ता आहे आणि जे राजकीय पक्ष चालवतात ते हिंदूच आहेत. हा आमचा देश आहे. आमची पुरातन मंदिरं इथे आहेत. आणि अजून नवीन बांधली जात आहेत. आमच्या 

पूर्वजांकडून आम्ही जे शिकलो ते आजही कायम आहे. आपला परिवार, जात, पात, भाषा, अस्मिता जपण्यापेक्षा हिंदू धर्माचे हित आणि राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायला हवे. हिंदूंचे हित तेच राष्ट्राचे हित ते आपण जपलं तर आपण अधिक बलशाली होऊ आणि कोणतीच कमीपणाची भावना आपल्यामध्ये नसेल. आम्ही अशा कोणत्याच गोष्टींना  बळी पडणार नाही. ज्यामुळे आम्हाला आपसात भांडावं लागेल. आम्ही आनंदी आणि समाधानी राहू.” भागवतजींच्या मते फ्रेंच क्रांतीनंतर जगामध्ये समरसतेविषयी फक्त बोललं जातं. पण भारत असा देश 

आहे की जिथे हजारो वर्षांपासून समरसता आचरणात आणली जाते. संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिम्मित भागवतजींनी केलेल्या भाषणापूर्वीच काही दिवस प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी मूचिन्तन येथील चिन्ना जेयर आश्रमात श्री संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फुटी पुतळ्याचे अनावरण केले. ‘समतेचा पुतळा’ असेच याचे वर्णन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात समता आणि एकात्मता नांदू लागेल अशी आशा आहे.

Related posts

Leave a Comment