लताजी म्हणजे साक्षात देवी सरस्वती.

’लताजींचं आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरी सारखं होत. मी नेहमीच पुढच्या पिढीतील गायकांना त्यातून काही शिकण्यासारखं आहे का ते पाहायला सांगतो. मग ती कविता असो किंवा गीत! जेव्हा जेव्हा मी गायकांना गाणं गायला देतो तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘लक्षपूर्वक ऐका. जर लताजी असत्या तर त्या हे गाणं कस गायल्या असत्या?

 फोटो- श्री. सुभाष घई आणि त्यांची मुलगी मेघना हिने लतादीदींच्या हातांचे ठसे घेतले. श्री सुभाष घईनी त्यांचं पहिलं दिग्दर्शन क्षेत्रातील पाऊल टाकताना कालिचरण मधील एका गाण्याचं दिग्दर्शन लताजींसोबत केलं होतं. लताजींनी घईंच्या पुष्कळ चित्रपटात हिरोइन्ससाठी पार्श्वगायन केलं आहे. अगदी रीना रॉय, टीना मुनीम पासून ते माधुरी दीक्षित पर्यंत. श्री. घई म्हणतात, जेव्हा त्या गायच्या तेव्हा त्या थेट ईश्वराशी जोडल्या जात. वैश्विक शक्तीशी जोडल्या जात.

त्या खरोखरच एक शुद्ध व्यक्ती होत्या. आणि ही शुद्धता त्यांच्या गाण्यांमधूनही दिसत असे. कालिचरण हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट जरी १९७६ चा शत्रुघ्न सिन्हा यात पोलीस अधिकारी आणि गुन्हेगार अशा दुहेरी भूमिकेत होता. खूप सारी मारामारी त्यात असली तरी आज ५० वर्षांनंतरही त्या चित्रपटातील एक गाणं कमालीचं लोकप्रिय आहे. मागच्याच आठवड्यात मी ’जा रे जा ओ हरजाई’ हे गाणं एका टीव्ही वरील कार्यक्रमात आणि पार्टी मध्ये ऐकलं. हीच तर संगीताची ताकत आहे. लता मंगेशकर यांची आवाजाची जादू आहे.फोटो- रीना रॉय’ जा रे जा हरजाई गाण्यामध्ये अभिनय करताना.

ते माझं पहिलंच गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. लताजी स्टुडिओ मध्ये येऊन चहा पिता पिता संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याशी गप्पा मारत होत्या. आनंदजींनी आमची दोघांची ओळख करून दिली. गोड हसत त्यांनी हळूच विचारलं ‘हिरोईन कोण आहे?’’ आणि मग त्यांनी मला गाण्याची रूपरेषा विचारली. माझं मलाच आश्चर्य वाटलं. मी विचारात पडलो एक अशी व्यक्ती जिने आजपर्यंत फक्त प्रसिद्ध अभिनेत्रींसाठीच गाणं गायलं आहे. अगदी नर्गिस, मधुबाला ते वैजयंतीमाला, हेमामालिनी. तिने अचानक माझ्या चित्रपटातील हिरोईन विषयी का विचारावं? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला तेव्हा थोडी काळजी वाटली. कारण रीना रॉय ही अभिनेत्री तेव्हा अगदीच नवीन होती. पण कल्याणजीनी मला धीर दिला. आणि मग मी लताजींच्या सर्व प्रश्नांची त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तर दिली.

नंतर जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला कळलं की वर वर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांमुळे लताजींना गाणं समजून घ्यायला बरीच मदत झाली. पार्श्वगायन करताना अभिनेत्रीच्या आवाजाप्रमाणे आपला आवाज जुळवताना मदत झाली. आणि ते गाणे एका वेगळ्याच उंचीवर लताजींनी नेले.
फोटो- ऋषी कपूर आणि टीना मुनीम ’मै सोलाह बरस की’ चित्रपट कर्ज.

माझ्या साठी लताजी म्हणजे साक्षात सरस्वती. त्या फार मऊ पणे बोलतात. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि माया असते. मी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा नमस्कार करायचो. मला जेव्हा कळलं की माझं दिग्दर्शन त्यांना आवडलं. आणि त्यांनी ’कर्ज’ चित्रपट २-३ वेळा पहिला तेव्हा मला आनंद झाला. त्या म्हणायच्या’’ प्रत्येक वेळेस जेव्हा मी तुझा चित्रपट बघते तेव्हा तो मला जास्त आवडतो. तुला संगीताची चांगली जाण आहे’’ हे त्यांचं
बोलणं मी कधीच विसरणं शक्य नाही.

मी त्यांच्याकडे ’ सोलह बरस की’ हे गाणं घेऊन गेलो होतो. तेव्हा पुन्हा त्यांनी मला हिरोईन विषयी विचारलं.यावेळेस मी तयारच होतो. मी त्यांना सांगितलं की टीना मुनीम नावाची तरुण मुलगी आहे. त्यांनी आनंदाने ते गाणं १६ वर्षांच्या मुलीच्या निरागस आवाजात गायले.
फोटो- माधुरी दीक्षित ओ रामजी या रामलखन मधील गाण्यामध्ये. लताजींचं पार्श्व् गायनामध्ये विशेष प्राविण्य होतं. त्यामुळेच जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल रामलखन मधील ‘ओ रामजी बडा दुख दीना’ हे गाणं माझ्याकडे घेऊन आले. तेव्हा लताजींशिवाय इतर कोणीही या गाण्याला न्याय
देऊ शकत नाही. मग त्या अगदी नव्या गायिका अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक कोणीही असो, असे मी सांगितले. आम्हाला सूर, ताल, धून या सगळ्यापलीकडे गाण्याला घेऊन जाणारा आवाज हवा होता.

मी लताजींचाच आवाज वापरायचा यावर ठाम होतो. लक्ष्मीजी माझ्याशी सहमत झाले. पण म्हणाले की ‘’ती खूप व्यस्त आहे. आपण जर तिच्यासाठी थांबलो तर चित्रपट रिलीज करायला आणि रेकॉर्डिंगला आपल्याला उशीर होईल.’’ लताजीज्या स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग करत होत्या तिथे मी गेलो. आणि त्यांना म्हणालो ‘’मला तुमचं व्यग्र वेळापत्रक माहितेय. पण माझ्या चित्रपटात एक गाणं आहे जे फक्त तुम्हीच गाऊ शकता.’’ हिरोईन होती आणखी एक नवीन मुलगी माधुरी दीक्षित. ’’ जर तुम्ही हे गाणं करणार नसाल तर मी रेकॉर्डिंग करणार नाही.

मी गाण्याची सिच्युएशन बदलेन’’ मी त्यांना प्रांजळपणे कबुली दिली. त्यांनी माझ्या शब्दाबरहुकूम सगळं केलं. मी त्यांना स्वतः भेटायला आलो हे पाहून त्यांना बरं वाटलं. त्या गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तयार झाल्या. ’ ओ रामजी’ हे गाणं क्लासिक आहे. मला खात्री आहे अजून १०० वर्ष तरी हे गाणं विस्मरणात जाणार नाही. ही लता मंगेशकर यांची प्रतिभा होती. त्यांच्या गाण्याच्या जवळपासही कोणी नवीन गायक फिरकू शकत नव्हता तरी देखील त्या नेहमी नवीन गायकांना संधी द्यायच्या. फोटो श्री. सुभाष घई त्यांच्या पत्नी श्रीमती. रेहाना सोबत, मुली मुस्कान आणि मेघना आणि सोबत लता मंगेशकर.

त्यांच्या असंख्य गाण्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. जणू काही खजिनाच. फक्त मला एकाच गोष्टीच वाईटवाटतं की माझं संगीत विद्यालय’ विसलिंग वूड्स ’ लताजी पाहू शकल्या नाहीत. पण आम्ही त्यांच्या नावाने२०१९ पासून विसलिंग वूड्स मध्ये तरुण गायकांना शिष्यवृत्ती देतो. मी माझी पत्नी रेहाना, मुलगी मेघना आणि तीन विद्यार्थ्यांसह त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती चालू करण्याबाबत लताजींची परवानगी घ्यायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्या म्हणाल्या की संगीत विद्यालयाला भेट द्यायला त्यांना नक्कीच आवडलं असतं पण त्यांच्या घरापासून ते ठिकाण खूपच लांब
असल्यामुळे आणि प्रकृतीच्या कारणामुळे त्या येऊ शकत नाहीत.

माझी मुलगी मेघना शेवटपर्यंत त्यांच्या संपर्कात होती. आम्ही त्यांच्या हाताचे ठसे घेऊन संगीत विद्यालयाच्या’हॉल ऑफ फेम’ मध्ये फ्रेम करून ठेवले. माझ्यासाठी लताजी प्रेमाचं प्रतीक होत्या. जो कोणी त्यांना भेटायचा तो त्यांच्या आणि त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पडायचा. कारण त्यांचं गाणं दैवी सुरांनी भरलेल होतं. त्यांनी आपल्या कलेचा बाजार मांडला नाही. त्यांनी कलेचा आदर केला. म्हणूनच
त्या देवी सरस्वतीचं मूर्त स्वरूप होत्या.

आजच्या गायकांना तंत्रज्ञानामुळे वरदान मिळालं आहे. ते तुकड्या तुकड्यात गाणं रेकॉर्ड करतात. थोड्या प्रसिद्धीनंतर पैसे मिळवण्यासाठी ते कार्यक्रम करतात. मी लताजींना ५-६ मिनिटांचं गाणं एका श्वासात ब्रेक न घेता रेकॉर्ड करताना पाहिलं आहे. त्या स्टुडिओ मध्ये यायच्या एकदा गाणं ऐकायच्या, संगीतकारांशी चर्चा करायच्या, गाण्याचा सराव करायच्या आणि सगळं गाणं एकदाच गायच्या. ‘लताजींचं आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरी सारखं होत. जेव्हा त्यांच्या मनात लताजींविषयी विचार येतो तेव्हा त्या ते गाणं वेगळ्या पद्धतीने गातात. लता मंगेशकर २८ सप्टेंबर १९२९ ते अनंत काळापर्यंत.

Related posts

Leave a Comment