सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाचा तुटवडा. पाम तेलाच्या उत्पादकांसाठी ठरणार फायद्याचा. पण ग्राहकांचा होणार तोटा.

रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. म्हणूनच ‘ओल्याबरोबर सुकेही जळते या म्हणीचे प्रत्यंतर क्षणोक्षणी येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी डिझेल आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीच्या बातमीनंतर आता पाळी आहे ती सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाची. चला बघूया सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे पाम तेलाच्या उत्पादकांचा कसा फायदा होणार आहे. सूर्यफुलाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे साहजिक पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव स्थितीमुळे सूर्यफुलाच्या बियांपासून बनत असलेल्या तेलाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत आहे. 

 

रशिया आणि युक्रेन या  दोन देशांमध्ये सूर्यफुलाच्या तेलाचं सर्वात जास्त उत्पादन होतं आणि ते इतर देशांना हे तेल पुरवतात. तेच सध्या युद्धात गुंतलेले आहेत. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर होते. देशाची दोन तृतीयांश खाद्य तेलाची गरज आयात केलेल्या खाद्य तेलावर भागते. त्यातले सर्वात जास्त म्हणजे ६०% पाम तेलच आयात केले जाते. भारतात रशिया आणि युक्रेन कडून २.५ मिलियन टन एवढे सूर्यफुलाचे तेल मागवले जाते.

सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी झालेल्या पुरवठ्यामुळे पाम तेलाच्या किंमती वाढल्या. कारण खाद्यतेलाच्या सर्वच कंपन्या किमतींवरून एकमेकांशी स्पर्धा करत असतात. त्यामुळे एका जरी खाद्यतेलाच्या पुरवठ्यात चढउतार झाला तरी बाकीच्या खाद्यतेलाच्या किंमती वाढतात किंवा कमी होतात. सूर्यफुलाच्या तेलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे आणखी दोन देश म्हणजे यूरोप आणि अर्जेंटिना. पण त्यांच्याकडून तेल मागवणे कठीण आहे कारण त्यांच्या देशामध्ये त्यांचे स्वतःचे खाद्यतेलाचे ग्राहक खूप आहेत.

अर्जेंटिनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तेलाच्या किंमती जास्त पण त्यामानाने उत्पादन कमी आहे. आणि शिपमेंटचा खर्च सुद्धा जास्त आहे. त्यामुळे तिथून आयात करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. भारताची संस्कृती अतिप्राचीन आहे. आणि भारतातील लोक म्हणजे अस्सल खव्वये आहेत. साधं पुराणपोळीवर तूप घेताना आपण मोजून मापून घेत नाही. शिवाय रोजच्या जेवणात आपला तेलाचा वापर जास्त असतो. त्यामुळे साहजिक आपल्या सारखा मध्यमवर्गीय ग्राहक कमी किंमतीच्या खाद्यतेलाकडे वळणार हे नक्की.

पाम तेलाबरोबरच ग्राहक सोयाबीनचे तेलही विकत घेऊ शकतात. मोहरीचे उत्पन्न जास्त झाले तर नजीकच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. रबी ( मोहरीची एक जात) चे पीक सध्या घेण्यात येत असून पुढील काही दिवसात ती बाजारात येईल. ताजी मोहरी एकदा का बाजारात आली की कदाचित खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमती कमी होतील. सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे पाम तेल महागले . मग सोयाबीन तेल तरी कसे मागे राहील. म्हणूनच युद्धाच्या सुरुवातीपासून सोयाबीन तेलाच्या किंमतीसुद्धा १० % पेक्षा जास्त वाढल्या आहेत.

दक्षिण अमेरिकेतील काही देश आणि इंडोनेशिया यांच्याकडून सातत्याने कमी होत असलेले सोयाबीन पिकाचे अंदाजखर्च आणि देशांतर्गत वाढलेला सोयाबीन तेलाचा वापर या सर्वांमुळे पाम तेलाच्या किंमती वाढलेल्या असू शकतात. एका अहवालानुसार इंडोनेशियाच्या सरकारने घरगुती तेलाच्या वाढणाऱ्या किंमती कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच ते तेल जास्त विकले जावे असे जाहीर केले आहे. आणि किती प्रमाणात विकले जायला हवे हे देखील सांगितले आहे. मलेशिया पेक्षा इंडोनेशिया मध्ये पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा खाद्यतेलाच्या किंमतीत फार फरक पडलेला नाही. २०२१ च्या मध्यात सरकारने रिफाइंड पाम तेलावरचे आयात निर्बंध डिसेंबर २०२१ पर्यंत हटवले होते.

ते आता २०२२ अखेरपर्यंत हटवण्यात आले आहेत. ( रिफाइंड  पाम तेल आणि त्याचे अन्य प्रकार रिफाईंड असोत वा नसोत रासायनिक पद्धतीने बनवलेले नसावेत.) २०२१ च्या उत्तरार्धात सरकारने पाम तेलावरची कस्टम ड्युटी मार्च २०२२ पर्यंत १७.५% वरून १२.५% वर आणली आहे. श्री दोराब मिस्त्री (गोदरेज इंटरनॅशनल चे डायरेक्टर ) यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले आहे की या वाढलेल्या किंमती बराच काळ तशाच राहू शकतात.२०२२  मध्ये आर्थिक मंदी ही येऊ शकते. त्यामुळे इतर वस्तूंबरोबरच पाम तेलाच्या किमतीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोजच्या वापरातील वस्तू डाळी, तेल यांच्या किंमती घसरू शकतात. कारण मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

Related posts

Leave a Comment