भाड्याच्या घरात राहताय? मग तुम्हाला तुम्ही देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर TDS भरावाच लागेल जे भाडेकरू ठराविक रकमेपेक्षा जास्त भाडं देत आहेत. त्यांनी त्या रकमेवर TDS भरण्याबाबत सुद्धा जागरूक असायला हवं. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरभाड्यावरचा TDS सुद्धा तुम्हाला घरमालकाला द्यावा लागेल. त्यामुळे TDS च काय पण कोणताही कर वेळेवर भरण्याकडे तुमचा कल असायला हवा.
आयकर नियमाप्रमाणे घरभाड्यावरच्या TDS चे दोन प्रकार आहेत.

१. व्यावसायिकाने भरलेलं भाडं (म्हणजे यात एखाद्याने भाड्याने ऑफिस घेतलं असेल तर त्याचा समावेश होतो.)
२. एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली ने भरलेलं भाडं आणि त्यावरचा TDS. व्यावसायिकाने ऑफिसच्या भाड्यावर भरावयाच्या TDS बद्दल कलम १९४ आयमध्ये सांगितलं आहे. तर एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अन डिव्हायडेड फॅमिलीने भरलेल्या भाड्याच्या रकमेवरील TDS बद्दल कलम १९४ IB ऍक्टमध्ये सांगितलं आहे.
TDS भरण्यासाठी तुम्ही पात्र आहात का ?

ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त भाडं भरणाऱ्या भाडेकरुंसाठी घरभाड्याच्या रकमेवर घरमालकाने TDS कापणे गरजेचे आहे. आणि TDS म्हणून कापलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करायला हवी. यामुळे घरमालकापेक्षा भाडेकरूवर टॅक्स भरण्याची जबाबदारी राहील. ज्या व्यक्ती किंवा HUF च्या पुस्तकांचे ऑडिट केले जात नाही आणि ज्यांची घरभाड्याची रक्कम किरकोळ आहे, त्यांचा TDS कापणे गरजेचे नाही. ज्या व्यक्ती किंवा HUF ५०,०००/- पेक्षा जास्त भाडं देतात त्यांच्यासाठी भाड्याच्या रकमेवर ५ % TDS कापणे गरजेचे आहे. जरी त्यांचे टॅक्स ऑडिट होत नसले तरी.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात किंवा भाडेकरूंचा करार जेव्हा संपणार आहे. त्याच्या शेवटच्या महिन्यात TDS ५ % कापला गेलाच पाहिजे. व्यक्तीकडे TAN असण्याची गरज नाही. व्यक्ती किंवा HUF व्यतिरिक्त टॅक्स ठरवणाऱ्यांकडे TDS कापण्यासाठी किंवा भरण्यासाठी डीडक्शन अकाऊंट नंबर असणे गरजेचे आहे. व्यक्ती किंवा HUF कंपनीला TDS कापण्यासाठी कायमस्वरूपी खाते क्रमांकाची गरज असते.
ज्या महिन्यात TDS कापला गेला त्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत TDS केंद्र सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे. TDS ज्या व्यक्तीने कापला असेल त्याने त्या कपातीचे चालान किंवा स्टेटमेंट २६QC स्वरूपात देणे गरजेचे आहे.
TDS प्रमाणपत्र न दिल्यास काय दंड होऊ शकतो.

१. अर्थसंकल्पामध्ये दिल्यानुसार जे भाडेकरू महिन्याला ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्त भाडं देतात त्यांच्यासाठी या नियमात बदल करण्यात आला आहे.
२. TDS ची रक्कम भरल्यानंतर १५ दिवसांच्या आत भाडेकरूने घरमालकाला TDS प्रमाणपत्र द्यावे.
३. १ एप्रिल २०२२ पासून नियमाप्रमाणे जर वेळेच्या आत TDS प्रमाणपत्र देण्यात आले नाही तर दिवसाला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.
४. सध्या या दंडाची रक्कम १०० रुपये आहे.
५. या दंडाची रक्कम TDS च्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

अनिवासी भारतीय (NRI) ला दिलेल्या घरभाड्यावरचा TDS जर तुमचा घरमालक अनिवासी भारतीय (NRI) असेल तर नियम थोडेसे बदलतात. अशा परिस्थितीत कलम १९५ नुसार घरभाड्याच्या रकमेवर ३०% TDS कापला जातो. जर NRI लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसत असेल तर त्याला भाड्याच्या रकमेतून होणाऱ्या उत्पनावर लागणाऱ्या टॅक्ससाठी आयकर विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.(३०% स्टँडर्ड डीडक्शन केल्यानंतर) अशा वेळेस भाडेकरूने प्रमाणपत्रात सांगितल्याप्रमाणे TDS कापावा. NRIच्या बाबतीत TDS रकमेच्या बाबतीत कोणतीही सूट नाही.
जर TDS वेळेवर कापला नाही तर १% सरळव्याज दराने व्याज दर महिन्याला भरावे लागते. जोपर्यंत TDS कापला जात नाही आणि सरकार दरबारी जमा केला जात नाही. श्री अवस्थींच्या मते ठराविक रकमेच्या मर्यादेपेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या भाडेकरूंनी TDS च्या बाबतीत जागरूक राहावे. त्यांना स्वतःला जर TDS च्या बाबतीत निर्णय घेता येत नसेल तर त्यांनी CA किंवा Tax Lawyer ची नेमणूक करावी.
जी व्यक्ती टॅक्स कापते त्यांनी सुद्धा TDS प्रमाणपत्र द्यायला हवे. दंडाची रक्कम देण्यापासून वाचण्यासाठी TDS प्रमाणपत्र वेळेवर द्यावे. फॉर्म १६सीच्या स्वरूपातील TDS प्रमाणपत्र TDS रक्कम जमा केल्याच्या १५ दिवसाच्या आत २६QC मध्ये सांगितल्या प्रमाणे द्यावे. TDS कापायला/भरायला उशीर झाल्यास भरावी लागणारी दंडाची रक्कम अर्थमंत्र्यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात वाढवली आहे.
