अयोध्या ः शिवसेना नेत्यांचा कपटीपणा! तेव्हा आणि आता…

शिवसेनेचे आमदार श्री संजय राऊत हे शिवसेनेने बाबरी मशीद फक्त १७ मिनिटात पाडली असे सांगून कपटीपणा करतायत. अगदी तसाच ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी स्व बाळासाहेब ठाकऱ्यांनी (ते हयात) असताना मशीद पाडल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊन केला होता. – सुजाता आनंद.

 

हे मी माझ्या सम्राट नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवसेनेमुळे मुंबई कशी बदलली? पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांच्यासाठी परत सांगते. तरुणपणी मी नॅशनल वायर या वृत्तपत्रासाठी काम करत होते. रविवारचा ओव्हर टाईम लागला होता. ६ डिसेंबर १९९२ ला आमच्या संपादकांनी मला सांगितलं अयोध्येतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेव. दंगली होतील असा त्यांचा अंदाज होता. पण मशीद तोडणार  नाहीत असं वाटत होत. मी टेलिफोन जवळ उभी होते. तेव्हा बातमी आली बाबरी पाडली. मी वेळ न घालवता बाळासाहेब ठाकरेंना फोन केला. ते गोंधळलेले वाटत होते. २० मिनिटात फोन करा. मी सामनाच्या ऑफिसमध्ये फोन करून बातमीची खातरजमा करून घेतो असे ते म्हणाले. २० मिनिटांनी मी परत त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले. ‘ शिवसैनिकांनी जर मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. 

कोणीतरी दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचे श्रेय ते कपटीपणाने स्वतःकडे घेत होते. कारण सुरुवातीला ते गोंधळलेले होते. कारण त्यांना माहित होते की एकही शिवसैनिक तिथे नव्हता. मग हळू हळू श्री सुधीर जोशी, श्री मनोहर जोशी, श्री प्रमोद नवलकर यांच्यासारखे नेते अयोध्येला जाऊन आले. पण विश्व् हिंदू परिषद, भाजप, बजरंग दल या पक्षांचे नेते तिथे अगोदरच होते. सगळ्या हॉटेल्स खोल्या आधीच बुक होत्या. शिवसेनेच्या नेत्यांना बाहेर तंबू टाकून राहायला सांगितले होते. त्यांनी बाळासाहेबांना फोन केला. त्यांनी शिवसैनिकांना ताबडतोब मुंबईला बोलावले. ठाकरेंचा गैरसमज झाला की भाजपचे नेते शिवसैनिकांना कामगारासारखे वागवतात. शिवसैनिक पुढच्याच ट्रेनने मुंबईत दाखल झाले. कलकत्त्यात थांबले. तेव्हा मोबाईलचा शोध लागला नव्हता. म्हणून बाळासाहेबांना त्यांच्याशी संपर्क करणे अवघड जात होते.

शिवसैनिक अयोध्येत असण्या नसण्याचा त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांना फक्त निवडणुकीतला फायदा दिसत होता.  दंगली झाल्या आणि त्याची चौकशी करण्यासाठी मुंबईत श्रीकृष्ण कमिशनची स्थापना करण्यात आली. आणि अलाहाबाद कोर्टाने बाळासाहेब ठाकऱ्यांना मशीद पाडल्याबद्दल समन्स बजावले. हा हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा उदय होता. अयोध्येचा मुद्दा त्यांनी नेहमीप्रमाणे मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा केला. त्यांना माहित होत की यावेळेस त्यांना मराठी माणसाकडून मतांपेक्षा जास्त काहीतरी हवं आहे. त्यामुळे मशीद पाडलेली नसतानाही त्याचे सर्व श्रेय त्यांनी घेतले. समन्स मिळाल्यानंतर ठाकरेंना वाटले की पुन्हा तुरुंगात जावे लागते की काय? यापूर्वी १९६९ मध्ये दक्षिणेतील लोकांविरुद्ध दंगली उठवल्या म्हणून त्यांना तुरुंगात जावे लागले होते. समन्सला उत्तर देता आले नाही पण त्यांनी या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी वकिलांची फौज उभी केली. 

तेव्हा मी युनाइटेड इंडिया न्यूज मधून इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात कामाला लागले होते. श्रीकृष्ण आयोगाची सुनावणी सुरु होती. मला आठवलं ६ डिसेंबर १९९२ ला ठाकरे मला काय म्हणाले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला. आणि म्हणाले ‘तू आमच्याबद्दल चुकीची माहिती छापली आहेस.’ मी असं काहीच केलं नाही बाळासाहेब. तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. मी तेव्हा नॅशनल वायर वृत्तपत्रासाठी काम करत होते. मीच तुम्हाला फोन केला होता. या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी… तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया दिली होती. मग आता का नाकारताय ? ठाकरेंच्या चांगलंच लक्षात होत मी कशाबद्दल बोलतेय. पण सोयीस्कर रित्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या विसरायच्या हेही त्यांना पक्के ठाऊक होतं.  त्यांनी मला मातोश्रीवर बोलावले आणि भाजप नेत्यांबद्दल अशी अर्वाच्य भाषा वापरली जी मी या आधी कधीच ऐकली नव्हती.

मशीद पाडली हे मान्य करायची हिम्मत त्यांच्यात नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत.  मी कोणालाही घाबरत नाही.(त्यांच्यावर केस चालू होती) म्हणून मी आरोप स्वीकारला. मग मी म्हटलं तुम्ही हे मला सांगण्यापेक्षा जनतेच्या समोर बोला. शिवाजी पार्कच्या सभेवेळी त्यांनी हेच केलं. ते म्हणाले ‘त्या ’हलकट’ सुंदरसिंग भंडारीला परिस्थितीचा सामना करता येत नाही म्हणून त्यांनी शिवसैनिकांवर आरोप लावले. आणि स्वतःची बाजू सावरली.’ श्रीकृष्ण आयोगाने शिवसेना प्रमुखांना आरोपी ठरवले तेव्हा मुंबई बजरंग दलाचे अध्यक्ष श्री शंकर गायकर यांनी मला फोन केला. आणि विचारले मशीद पाडण्याचं श्रेय तुम्ही त्यांना का देता? मी माझ्या माणसांसह मशिदीच्या वर उभा होतो आणि मीच ती पाडण्यात मदत करत होतो.

जर त्यावेळी तिथे एकही शिवसैनिक असता तर त्याच्यासाठी मी माझे प्राण दिले असते.. म्हणजे ठाकरेंचा नकार खरा होता. पण आता बाळासाहेब नाहीत, त्यांच्यावरचा आरोपही जुना झाला आहे. हिंदुत्व पुन्हा एकदा बाळसे धरत आहे. म्हणून आता शिवसेनेकडे निवडणुकीपूर्वी मुद्देच नाहीत. म्हणून श्री राऊत जुनी मढी उकरून काढत आहेत. आणि अंधारात तीर मारत आहेत. त्यांचा पक्ष देशाला कुठे नेऊन ठेवणार आहे कोणास ठाऊक?

Related posts

Leave a Comment